TRENDING:

Weekly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ! होळीनंतर येणार डबल गुडन्यूज, पण..

Last Updated:
Weekly Horoscope: मार्च महिन्याचा पहिला आठवडा होळीने सुरुवात होत आहे. या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती राशीचक्रावर परिणाम दाखवेल. पहिल्या आठवड्यातील ग्रहस्थितीवरून सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/7
सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ! होळीनंतर येणार डबल गुडन्यूज
सिंह - सिंह राशीसाठी हा आठवडा नशिबाची साथ देणारा असेल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला यश मिळेल. तुमच्या बुद्धिमत्तेने तुम्ही कठीण कामं सुद्धा चुटकीसरशी पूर्ण कराल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना हवी तशी नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. समाजात तुमचा प्रभाव वाढेल.
advertisement
2/7
सिंह राशीच्या लोकांच्या वरिष्ठांच्या मदतीने जुन्या समस्या सुटतील आणि तुमचं कौतुक होईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील आणि बँकेतली पुंजी वाढेल. उत्तरार्धात कामाच्या पद्धतीत थोडे बदल करावे लागतील. व्यापाऱ्यांनी पैशांचे व्यवहार करताना थोडी काळजी घ्यावी. भावंडांशी प्रेम टिकून राहील. घरात एखाद्या यशामुळे सेलिब्रेशनची तयारी होईल. प्रेमात असलेल्यांची जवळीक वाढेल.लकी कलर: नारंगी, लकी नंबर: 3
advertisement
3/7
कन्या - कन्या राशीसाठी हा आठवडा थोडा संमिश्र असेल. सुरुवातीला तब्येत थोडी नरम-गरम राहू शकते. ठरवलेल्या कामात उशीर झाल्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होईल आणि चिडचिड वाढेल. आरोग्य आणि नात्यांच्या बाबतीत थोडा ताण येऊ शकतो. मुलांशी काही कारणावरून खटका उडू शकतो. पैशांच्या बाबतीत हात आखडता घ्या, नाहीतर आर्थिक ओढाताण होईल. नोकरी करणाऱ्या महिलांना घर आणि ऑफिसमध्ये ताळमेळ राखताना दमछाक होईल.
advertisement
4/7
कन्या - उत्तरार्धात तुमची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी तुम्हाला जास्तीची मेहनत घ्यावी लागेल. व्यापारात मंदी जाणवू शकते. प्रेमाच्या बाबतीत अति-उत्साह दाखवणं महागात पडू शकतं, त्यामुळे सावध राहा. वैवाहिक आयुष्यात थोडी वादावादी झाली तरी नातं टिकून राहील.लकी कलर: तपकिरी, लकी नंबर: 1
advertisement
5/7
तूळ - तूळ राशीच्या लोकांना कष्टाच्या मानाने थोडं कमी फळ मिळाल्यासारखं वाटेल, ज्यामुळे मन थोडं उदास होईल. कामातले अडथळे आणि घरच्यांचा पाठिंबा न मिळणं यामुळे चिंता वाढेल. यशासाठी कोणताही चुकीचा रस्ता निवडू नका, नाहीतर मोठी अडचण येऊ शकते. व्यवसायात असाल तर जिथे पैसा अडकून पडेल अशा ठिकाणी गुंतवणूक करू नका. अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. नोकरीत स्वतःची कामं दुसऱ्यावर सोडू नका. नवीन नोकरी असेल तर बॉसचा मूड ओळखून काम करा, नाहीतर सर्वांसमोर ओरडा खावा लागेल. वडिलांच्या आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.लकी कलर: पांढरा, लकी नंबर: 1
advertisement
6/7
मकर - मकर राशीच्या लोकांवर महादेवाच्या कृपेसोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वादही बरसेल. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली आर्थिक ओढाताण आता संपेल. व्यापारात गुंतवलेल्या पैशातून अनपेक्षित नफा मिळेल, जो तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल.
advertisement
7/7
वृश्चिक - आठवड्यात उत्तरार्धात परिस्थिती थोडी सुधारेल, पण मेहनत वाढवावी लागेल. जमीन किंवा घरगुती वादात तडजोड केली तर बरं होईल, नाहीतर प्रकरण लांबत जाईल. नात्यात जुन्या गोष्टी उकरून काढण्यापेक्षा एकमेकांना माफ करायला शिका.लकी कलर: निळा, लकी नंबर: 3
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ! होळीनंतर येणार डबल गुडन्यूज, पण..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल