TRENDING:

New Year Surya: 2026 वर्षाचा राजा सूर्य! नवीन वर्षात घरी आणाव्या सूर्याशी संबंधित या लकी वस्तू

Last Updated:
Sun God 2026: ज्योतिषशास्त्रानुसार सन 2026 हे सूर्याचं वर्ष मानलं जात आहे. प्रत्येक वर्षाचे पंचागानुसार ग्रहांचे मंत्रिमंडळ तयार होते, त्यानुसार वर्ष 2026 चा राजा सूर्य आहे. हिंदू धर्मात सूर्याला शक्ती, ऊर्जा, नेतृत्व आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक मानलं जातं. या वर्षी घरात सूर्याशी संबंधित वस्तू ठेवल्यास जीवनात यश, मान-सन्मान आणि समृद्धी वाढते. सूर्याचा प्रभाव फक्त आरोग्य आणि करिअरपुरताच मर्यादित नसून तो घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंदी वातावरण निर्माण करतो. त्यामुळे 2026 मध्ये सूर्याची ऊर्जा वाढवणाऱ्या गोष्टी स्वीकारणं खूप शुभ मानलं जातं. नवीन वर्ष 2026 मध्ये घरात कोणकोणत्या सूर्याशी संबंधित वस्तू आणणं फायदेशीर ठरेल आणि त्यातून जीवनात कोणते लाभ मिळू शकतात. याबाबत सविस्तर माहिती ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी दिली आहे.
advertisement
1/8
2026 वर्षाचा राजा सूर्य! नवीन वर्षात घरी आणाव्या सूर्याशी संबंधित या लकी वस्तू
1.सूर्यदेवांची मूर्ती किंवा फोटोसन 2026 मध्ये सूर्यदेवांची मूर्ती किंवा फोटो घरात आणणं खूप फायदेशीर मानलं जातं. ही मूर्ती किंवा फोटो घराच्या पूर्व दिशेला ठेवा. यामुळे घरातील लोकांना मान-सन्मान मिळतो आणि करिअरमध्ये प्रगती होते. घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मक वातावरण टिकून राहतं.
advertisement
2/8
2.तांब्याचं सूर्यचिन्हतांब्याचं सूर्यचिन्ह घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवर लावा. रोज त्यावर गंगाजल शिंपडा आणि कुंकवाचा टिळा लावा. हा उपाय घरात चांगली ऊर्जा निर्माण करतो आणि कामधंद्यात यश मिळण्यास मदत करतो.
advertisement
3/8
3.तांब्याच्या इतर वस्तू -2026 मध्ये सूर्याची शक्ती वाढवण्यासाठी तांब्याच्या वस्तू जसं की लोटा, ग्लास किंवा शोभेच्या वस्तू घरात ठेवा. यामुळे घरात धन-संपत्ती वाढते आणि शांतता व समाधान टिकून राहतं.
advertisement
4/8
4.सात घोड्यांची सूर्यरथाची तस्वीर -सात घोड्यांच्या सूर्यरथाची तस्वीर घराच्या पूर्व दिशेला लावणं शुभ मानलं जातं. ही तस्वीर ज्ञान आणि ऊर्जेचं प्रतीक आहे. ती ठेवल्याने समाजात मान वाढतो आणि घरात आनंदी वातावरण राहातं.
advertisement
5/8
5.रोज सूर्याला पाणी अर्पण करा -सकाळी अंघोळीनंतर उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करणं खूप लाभदायक असतं. तांब्याच्या लोट्यात पाणी घेऊन त्यात लाल फूल, रोळी आणि अक्षता घालून सूर्याला अर्पण करा. यामुळे जीवनात यश आणि सुख-शांती मिळते.
advertisement
6/8
6.रविवारी दान करा -रविवारच्या दिवशी गूळ, गहू, धान्य किंवा पैसे दान करणं चांगलं मानलं जातं. यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आणि घरात समृद्धी येते.
advertisement
7/8
7.मंत्राचा जपसूर्याला पाणी देताना ॐ सूर्याय नमः किंवा ॐ घृणि सूर्याय नमः या मंत्रांचा जप करा. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आयुष्यातील अडथळे कमी होतात.
advertisement
8/8
8.पूर्व दिशेकडे तोंड करून पूजा करासूर्याला पाणी अर्पण करताना आणि पूजा करताना पूर्व दिशेकडे तोंड करून उभं राहा. ही दिशा सूर्याची शक्ती जास्त आकर्षित करते. त्यामुळे घरात सुख-समृद्धी आणि चांगली ऊर्जा पसरते.सन 2026 हे सूर्याचं वर्ष मानलं जात असल्यामुळे घरात सूर्याशी संबंधित वस्तू आणणं खूप शुभ ठरेल. सूर्यदेवांची मूर्ती, तांब्याच्या वस्तू आणि सात घोड्यांची तस्वीर ठेवल्याने घरात आनंद, यश आणि मान-सन्मान वाढतो. तसेच रोज पाणी अर्पण करणं, मंत्रजप आणि दान केल्याने घरात समृद्ध आणि सकारात्मक वातावरण तयार होतं.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
New Year Surya: 2026 वर्षाचा राजा सूर्य! नवीन वर्षात घरी आणाव्या सूर्याशी संबंधित या लकी वस्तू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल