ShaniDev: आता तुमची खैर नाही! वर्षभर मीनेतून या राशींवर शनिदेवाची करडी नजर, एक चूकही महागात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Astrology: ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाला विशेष स्थान आहे. वर्ष बदलणार असलं तरी शनी त्याच ठिकाणी पाय रोवून उभा आहे. म्हणजेच नवीन वर्ष 2026 मध्ये शनी राशी पालटणार नाही, तो मीन राशीतच वर्षभर विराजमान असेल. शनिला कर्मफळ दाता मानलं जातं, कर्म वाईट असणाऱ्यांना शनिच्या रोषाला सामोरं जावं लागतं.
advertisement
1/6

ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्ती जसे कर्म करते, शनिदेव त्याला तसे फळ देतात. शनि हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह मानला जातो, त्यामुळे त्याचा प्रभाव दीर्घकालीन आणि जास्त वेळ दिसत असतो. शनीचा प्रभाव जीवनात शिस्त, संयम, संघर्ष आणि कर्माशी जोडलेला असतो.
advertisement
2/6
ज्योतिषशास्त्रानुसार, या सालात कधी-कशी कोणत्या राशींवर शनीची साडेसाती आणि अडीचकी असेल. साडेसाती आणि अडीचकी हा शनीचा विशेष प्रभाव मानला जातो, तो व्यक्तीच्या जीवनात चढ-उतार, आव्हाने आणि नवी गोष्टींची शिकवण घेऊन येतो.
advertisement
3/6
शनीची साडेसाती कधी लागते - शनी एखाद्या व्यक्तीच्या जन्मराशीपासून 12 व्या भावात प्रवेश करतो, तेव्हा साडेसाती सुरू होते. हा प्रभाव एकूण साडेसात वर्षे राहतो आणि त्याचे तीन टप्पे असतात. पहिला टप्पा जन्मराशीच्या 12 व्या भावात, दुसरा टप्पा जन्मराशीमध्ये आणि तिसरा टप्पा जन्मराशीच्या दुसऱ्या भावात शनीच्या भ्रमणादरम्यान असतो. साडेसातीचा काळ व्यक्तीला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्यास भाग पाडू शकतो. कर्म चांगले असणाऱ्यांना साहजिकच त्रास कमी होतो.
advertisement
4/6
शनीची अडीचकी कधी लागते - जेव्हा शनी जन्मराशीपासून चौथ्या किंवा आठव्या भावात भ्रमण करतो, तेव्हा शनीची अडीचकी लागते. याचा प्रभाव अडीच वर्षे राहतो. अडीचकीच्या काळात जीवनात अचानक बदल, कार्यक्षेत्रात अडचणी किंवा कौटुंबिक तणाव पाहायला मिळू शकतो.
advertisement
5/6
2026 मध्ये कोणत्या राशींवर साडेसाती - वर्ष 2026 मध्ये शनिदेव मीन राशीतच कायम राहणार आहेत, ते यावर्षी कोणतीही राशी बदलणार नाहीत. या कारणामुळे 2026 मध्ये कुंभ, मीन आणि मेष राशीवर शनीची साडेसाती असेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू असेल, ज्यामुळे प्रदीर्घ संघर्षानंतर दिलासा मिळण्याचे संकेत मिळू शकतात. मीन राशीवर साडेसातीचा दुसरा टप्पा असेल, जो सर्वात प्रभावशाली मानला जातो. तर मेष राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा पहिला टप्पा सुरू असेल, जो जीवनात नवीन जबाबदाऱ्या आणि बदल घेऊन येऊ शकतो.
advertisement
6/6
2026 मध्ये शनीची अडीचकी -2026 मध्ये सिंह आणि धनु राशीच्या लोकांवर शनीच्या अडीचकीचा प्रभाव असेल. या काळात या राशीच्या लोकांना संयम, शिस्त आणि योग्य कर्मावर विशेष लक्ष देण्याची गरज असेल. शनिदेवाच्या कृपेने हा काळ आत्मविकास आणि स्थिरता देखील देतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
ShaniDev: आता तुमची खैर नाही! वर्षभर मीनेतून या राशींवर शनिदेवाची करडी नजर, एक चूकही महागात