Hast Resha: तुमचा लाइफ पार्टनर कशा स्वभावाचा आहे? दोन्ही तळहात जोडून एक नजर टाकल्यास चित्र स्पष्ट
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Marathi Hastresha Tips: बघ हात दाखवून असं, म्हटलं जायचं. आजही अनेकांचा हस्तरेषाशास्त्रावर विश्वास आहे. हस्तरेषाशास्त्रानुसार तळहातावरील रेषा आणि खुणा या व्यक्तीच्या जीवनाचा आरसा मानल्या जातात. या रेषांचा अभ्यास करून, एखाद्याच्या स्वभावाबद्दल, नशिबात, करिअरबद्दल, आरोग्याबद्दल आणि नातेसंबंधांबद्दल अनेक रहस्यमय गोष्टी जाणून घेता येतात.
advertisement
1/6

तळहातावरील रेषा आणि खुणा आपल्या जीवनाबद्दल बरेच काही प्रकट करतात. हस्तरेषाशास्त्रानुसार, हातावरील रेषा एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल, करिअरबद्दल, संपत्तीबद्दल, नशीबाबद्दल आणि नातेसंबंधांबद्दल माहिती उघड करू शकतात. योग्यरित्या त्याचा अर्थ समजल्यास जीवनातील अनेक रहस्ये उलगडू शकतात. यातील एक रहस्य म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जीवनसाथी कसा असेल?
advertisement
2/6
हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतो. आपल्या तळहाताचा विशिष्ट आकार एखाद्याच्या जोडीदाराचा स्वभाव आणि गुण दर्शवू शकतो. जाणून घेऊया की तळहातावरील रेषा जीवनसाथीबद्दल काय दर्शवतात.
advertisement
3/6
चंद्र कोर म्हणजे प्रेमळ जीवनसाथी -हस्तरेषाशास्त्रानुसार, दोन्ही तळहात जोडल्यावर दोन्ही हातांची मधली रेषा जोडली जाते, तिने तळहातावर चंद्रासारखा आकार दिसला तर तो अत्यंत शुभ मानला जातो. याचा अर्थ अशा व्यक्तीचा जोडीदार खूपच आकर्षक, समजूतदार आणि भावनिकदृष्ट्या जोडलेला असेल.
advertisement
4/6
अशा लोकांना त्यांच्या आयुष्यात प्रेमाची कमतरता जाणवत नाही आणि त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा आणि आदर मिळतो. चंद्रकोर चिन्ह जितकं स्पष्ट आणि सुंदर दिसेल तितकंच जोडीदार चांगला आणि अधिक आधार देणारा असेल.
advertisement
5/6
हातावर असं चिन्ह उमटणारे लोक कला आणि सर्जनशीलतेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतात. चंद्र चिन्ह केवळ नातेसंबंध दर्शवत नाही तर व्यक्तीच्या स्वभाव आणि प्रतिभेला देखील सूचित करते. ज्यांच्या तळहातावर अपूर्ण किंवा पूर्ण चंद्र असतो ते अत्यंत संवेदनशील, सर्जनशील आणि कल्पनाशील असतात.
advertisement
6/6
असे लोक संगीत, कला, लेखन, नृत्य आणि इतर सर्जनशील क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतात. असे लोक त्यांच्या शब्दांनी, वागण्याने आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाने लोकांना जिंकतात. त्यांच्याकडे इतरांना बरे करण्याची आणि सांत्वन देण्याची क्षमता देखील असते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Hast Resha: तुमचा लाइफ पार्टनर कशा स्वभावाचा आहे? दोन्ही तळहात जोडून एक नजर टाकल्यास चित्र स्पष्ट