सोन्यासारखं नशीब घेऊनच जन्माला येतात 'या' मूलांकाचे लोक, आयुष्यात झटपट मिळत सक्सेस; तुम्ही आहेत का भाग्यवान?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अंकशास्त्रामध्ये 1 ते 9 या मूलांकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही महिन्याच्या विशिष्ट तारखेला जन्मलेल्या तारखेची बेरीज करून मूलांक काढला जातो. काही विशिष्ट मूलांक असे असतात जे सोनसारखं नशीब घेऊनच येतात.
advertisement
1/7

अंकशास्त्रामध्ये 1 ते 9 या मूलांकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही महिन्याच्या विशिष्ट तारखेला जन्मलेल्या तारखेची बेरीज करून मूलांक काढला जातो. काही विशिष्ट मूलांक असे असतात जे सोनसारखं नशीब घेऊनच येतात.
advertisement
2/7
मूलांक 7. हा असा मूलांक आहे जो सोन्यासारखं नशीब घेऊनच जन्माला येतात. मूलांक 7 च्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व अतिशय रहस्यमयी आणि प्रभावशाली असते. ते केवळ कष्टावर नाही, तर आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करतात.
advertisement
3/7
तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि कल्पकता: या मूलांकाच्या व्यक्तींची विचार करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असते. ते प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करतात. त्यांची कल्पनाशक्ती अफाट असते, ज्यामुळे ते लेखक, संशोधक किंवा तत्त्वज्ञ म्हणून मोठे नाव कमावतात.
advertisement
4/7
अध्यात्माकडे कल: केतू ग्रहाच्या प्रभावामुळे या व्यक्तींचा कल अध्यात्माकडे जास्त असतो. त्यांना गूढ शास्त्रे, ध्यान आणि निसर्गाची ओढ असते. मानसिक शांततेसाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात आणि यामुळेच त्यांचे व्यक्तिमत्त्व संयमी दिसते.
advertisement
5/7
लवकर यश प्राप्ती: मूलांक 7 च्या व्यक्तींमध्ये 'संधी' ओळखण्याची जबरदस्त कला असते. ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये खूप कमी वयात मोठे यश आणि आर्थिक स्थैर्य लाभते.
advertisement
6/7
स्वतंत्र आणि स्पष्टवक्ते: या व्यक्तींना कोणाच्याही दबावाखाली राहणे आवडत नाही. ते आपले स्वतंत्र विचार मांडण्यास घाबरत नाहीत. त्यांचे स्पष्टवक्तेपण कधीकधी इतरांना खटकू शकते, पण ते नेहमी सत्याची साथ देतात.
advertisement
7/7
प्रवासाची आवड: या मूलांकाच्या लोकांना नवनवीन ठिकाणे पालथी घालण्याची खूप आवड असते. विशेषतः समुद्रकिनारे किंवा नैसर्गिक स्थळांना ते प्राधान्य देतात. अनेकदा प्रवासातूनच त्यांना व्यवसायाच्या किंवा प्रगतीच्या नवीन संधी मिळतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
सोन्यासारखं नशीब घेऊनच जन्माला येतात 'या' मूलांकाचे लोक, आयुष्यात झटपट मिळत सक्सेस; तुम्ही आहेत का भाग्यवान?