‘मारा!! बोलती बंद कर दी !!!’ अमिताभ बच्चनना नेमकं काय म्हणायचंय? पोस्टने गूढ वाढलं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकदा त्यांच्या पोस्ट्समधून सामाजिक, राजकीय किंवा भावनिक विषयांवर मत मांडले जाते. मात्र काही वेळा हे पोस्ट्स इतके गूढ किंवा संदर्भाविना असतात की चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर त्याबाबत चर्चेला उधाण येतं.
advertisement
1/6

सेलिब्रिटी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. कधी ते आपल्या वैयक्तिक आयुष्यातील क्षण चाहत्यांसोबत शेअर करतात, तर कधी देशात-विदेशात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त करतात. अनेकदा त्यांच्या पोस्ट्समधून सामाजिक, राजकीय किंवा भावनिक विषयांवर मत मांडले जाते. मात्र काही वेळा हे पोस्ट्स इतके गूढ किंवा संदर्भाविना असतात की चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर त्याबाबत चर्चेला उधाण येतं.
advertisement
2/6
असाच काहीसा प्रकार ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या अलीकडील फेसबुक पोस्टमुळे पाहायला मिळाला. अमिताभ बच्चन यांनी फेसबुकवर "FB 4564 – मारा, बोलती बंद कर दी" अशी पोस्ट शेअर केली, पण याचा नेमका अर्थ काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सोशल मीडियावर या पोस्टबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
advertisement
3/6
प्रत्यक्षात पाहिल्यास, FB 4564 यामध्ये कोणताही गुप्त अर्थ किंवा संकेत नाही. अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट्सना विशिष्ट क्रमांक देण्याची पद्धत वापरत आहेत. ट्विटर (X) वर ते T असा उल्लेख करतात, फेसबुकवर FB तर ब्लॉग पोस्टसाठी वेगळा क्रमांक वापरतात. त्यामुळे FB 4564 हा त्यांच्या फेसबुकवरील पोस्टचा केवळ क्रमांक आहे.
advertisement
4/6
FB 4564 म्हणजे ही अमिताभ बच्चन यांती फेसबुकवरील 4564 वी पोस्ट आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय “मारा!! बोलती बंद कर दी!!!”
advertisement
5/6
पण आता “मारा!! बोलती बंद कर दी!!!” याचा नेमका अर्थ काय किंवा अमिताभ बच्चन यांना यापोस्टमधून काय म्हणायचं आहे? असा प्रश्न पडला आहे.
advertisement
6/6
मात्र, पोस्टमध्ये संदर्भ दिलेला नसल्याने अनेक चाहत्यांना यामागे काही विशेष संदेश आहे का, अशी शंका निर्माण झाली. अमिताभ बच्चन यांची लेखनशैली अनेकदा गूढ आणि विचार करायला लावणारी असल्यामुळे अशा पोस्ट्स लगेच चर्चेचा विषय ठरतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
‘मारा!! बोलती बंद कर दी !!!’ अमिताभ बच्चनना नेमकं काय म्हणायचंय? पोस्टने गूढ वाढलं