TRENDING:

हाल सोसायला तयार राहा! शनीच गोचर वाढवणार अडचणी, 'या' राशींवर येणार संकटं

Last Updated:
ज्योतिषशास्त्रात सर्वात संथ गतीने चालणारा आणि 'कर्मफळदाता' मानला जाणारा शनी 2026 मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण स्थितीत असणार आहे. 6 मार्च 2026 रोजी शनी सकाळी 8:26 वाजता शनि कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल.
advertisement
1/7
हाल सोसायला तयार राहा! शनीच गोचर वाढवणार अडचणी, 'या' राशींवर येणार संकटं
ज्योतिषशास्त्रात सर्वात संथ गतीने चालणारा आणि 'कर्मफळदाता' मानला जाणारा शनी 2026 मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण स्थितीत असणार आहे. 6 मार्च 2026 रोजी शनी सकाळी 8:26 वाजता शनि कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल.
advertisement
2/7
मेष - खर्चात मोठी वाढ: मेष राशीच्या लोकांसाठी शनी सध्या 12 व्या भावात आहे, ज्यामुळे तुमच्यावर साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. या काळात तुमचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजनात केलेली एक छोटी चूक तुम्हाला कर्जाच्या दरीत ढकलू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा रुग्णालयाचा खर्च वाढू शकतो.
advertisement
3/7
सिंह - कामात अडथळे आणि मानसिक ताण: सिंह राशीवर सध्या शनीची 'अष्टम ढैय्या' सुरू आहे. यामुळे तुमच्या कामात विनाकारण विलंब होईल. गुप्त शत्रू तुमच्या विरोधात सक्रिय होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी वाद टाळा आणि कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी दहावेळा विचार करा.
advertisement
4/7
कन्या - वैवाहिक जीवनात तणाव: शनीचे हे गोचर तुमच्या 7 व्या भावात होत आहे. जोडीदाराशी असलेले संबंध बिघडू शकतात. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवहाराबाबत अत्यंत पारदर्शकता ठेवावी. आरोग्याच्या तक्रारी, विशेषतः सांधेदुखी किंवा पोटाचे विकार बळावू शकतात.
advertisement
5/7
धनु - घरगुती समस्या: धनु राशीवर शनीची 'चतुर्थ ढैय्या' सुरू आहे. यामुळे कौटुंबिक सुख-शांतीमध्ये बाधा येईल. आईच्या प्रकृतीची चिंता सतावू शकते. मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने कागदपत्रे नीट तपासा.
advertisement
6/7
कुंभ - साडेसातीचा अंतिम टप्पा: कुंभ राशीसाठी साडेसातीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा सुरू आहे. जरी शनी तुमच्या राशीचा स्वामी असला, तरी या काळात तुम्हाला कठीण परिश्रमाशिवाय फळ मिळणार नाही. बोलण्यावर ताबा ठेवा, अन्यथा स्वतःच्या बोलण्याने स्वतःचेच नुकसान करून घ्याल.
advertisement
7/7
मीन - साडेसातीचा कठीण काळ: शनी सध्या तुमच्याच राशीत विराजमान असल्याने तुमच्यावर साडेसातीचा दुसरा आणि सर्वात कठीण टप्पा सुरू आहे. मानसिक अस्वस्थता, निर्णय घेताना होणारा गोंधळ आणि कामातील दिरंगाई यामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. शिस्त पाळली नाही तर शनीची वक्रदृष्टी कडक शासन करू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
हाल सोसायला तयार राहा! शनीच गोचर वाढवणार अडचणी, 'या' राशींवर येणार संकटं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल