TRENDING:

शनी-चंद्राची युती बिघडवणार खेळ! उद्यापासून पुढचे 72 तास 'या' 3 राशींची घेणार परीक्षा, एक चूकही पडणार महागात

Last Updated:
उद्या विद्या आणि कलेचा सण 'वसंत पंचमी' साजरी होत आहे. मात्र, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने या दिवशी एक अत्यंत अशुभ मानला जाणारा संयोग जुळून येत आहे.
advertisement
1/7
उद्यापासून पुढचे 72 तास 'या' 3 राशींची घेणार परीक्षा, एक चूकही पडणार महागात
उद्या विद्या आणि कलेचा सण 'वसंत पंचमी' साजरी होत आहे. मात्र, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने या दिवशी एक अत्यंत अशुभ मानला जाणारा संयोग जुळून येत आहे.
advertisement
2/7
कुंभ राशीमध्ये आधीच विराजमान असलेल्या शनीसोबत चंद्राची युती होत आहे. जेव्हा शनी आणि चंद्र एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा 'विष योग' निर्माण होतो. हा विष योग विशेषतः वसंत पंचमीपासून पुढील 3 दिवस प्रभाव दाखवणार असून, 3 राशींच्या जातकांनी या काळात अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे.
advertisement
3/7
ज्योतिषशास्त्रानुसार, शनी हा 'थंड' आणि 'मंदावलेला' ग्रह आहे, तर चंद्र हा 'मनाचा' आणि 'द्रवाचा' कारक आहे. जेव्हा या दोन परस्परविरोधी ऊर्जेचे ग्रह एकत्र येतात, तेव्हा व्यक्तीच्या विचार प्रक्रियेत विषारीपणा किंवा नकारात्मकता वाढते. यामुळे मानसिक तणाव, कामात अडथळे आणि आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात.
advertisement
4/7
कुंभ: तुमच्याच राशीत ही युती होत असल्याने तुम्हाला याचा थेट फटका बसू शकतो. पुढील 72 तास तुमची चिडचिड वाढण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तींशी संवाद साधताना शब्द जपून वापरा. विनाकारण भीती किंवा नैराश्य जाणवू शकते. कोणतेही मोठे आर्थिक निर्णय 3 दिवस लांबणीवर टाका.
advertisement
5/7
कर्क: कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्याने शनीसोबतची त्याची युती तुमच्यासाठी कष्टदायक ठरू शकते. अचानक उद्भवणाऱ्या खर्चामुळे आर्थिक बजेट कोलमडू शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. या काळात वाहन चालवताना किंवा प्रवासात विशेष काळजी घ्या.
advertisement
6/7
मीन: मीन राशीच्या जातकांसाठी हा काळ 'बनलेली कामे बिघडवणारा' ठरू शकतो. नवीन प्रोजेक्ट किंवा महत्त्वाची व्यावसायिक बोलणी या 3 दिवसांत टाळा. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबात मालमत्तेवरून वाद होऊ शकतात, ज्यामुळे मानसिक शांतता भंग होईल.
advertisement
7/7
ग्रहांची ही स्थिती तात्पुरती असली तरी, या काळात घेतलेला एक चुकीचा निर्णय मोठा फटका देऊ शकतो. वसंत पंचमीच्या आनंदासोबतच या राशींनी संयम पाळणे हिताचे ठरेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
शनी-चंद्राची युती बिघडवणार खेळ! उद्यापासून पुढचे 72 तास 'या' 3 राशींची घेणार परीक्षा, एक चूकही पडणार महागात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल