TRENDING:

दुःखाचे दिवस संपले आता फक्त सुखचं सुख, शुक्र उदयामुळे पुढचे 9 महिने 'या' 4 राशींसाठी ठरणार गेम चेंजर!

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, सुख, समृद्धी आणि वैभवाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह तब्बल 53 दिवसांच्या 'अस्त' अवस्थेनंतर अखेर उदयाला आला आहे. काल, 1 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6:27 वाजता मकर राशीत शुक्राचा उदय झाला.
advertisement
1/7
आता फक्त सुखचं सुख, पुढचे 9 महिने 'या' 4 राशींसाठी ठरणार गेम चेंजर!
ज्योतिषशास्त्रानुसार, सुख, समृद्धी आणि वैभवाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह तब्बल 53 दिवसांच्या 'अस्त' अवस्थेनंतर अखेर उदयाला आला आहे. काल, 1 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6:27 वाजता मकर राशीत शुक्राचा उदय झाला.
advertisement
2/7
शुक्र आता पुढील 9 महिने म्हणजेच 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत उदित अवस्थेत राहणार आहे. शुक्राचा हा उदय काही विशिष्ट राशींसाठी नशीब बदलणारा ठरणार आहे. विशेषतः वृषभ, मिथुन, तूळ आणि मीन या चार राशींच्या जातकांना येत्या 9 महिन्यांत उत्पन्नाचे नवे स्रोत, ऐश्वर्य आणि कौटुंबिक सुखाची प्राप्ती होईल.
advertisement
3/7
वृषभ: शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी आहे. शुक्राचा उदय तुमच्या भाग्योदयात भर घालेल. उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. जुन्या गुंतवणुकीतून आता उत्तम परतावा मिळण्याची वेळ आली आहे. घर, वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे तुमचे स्वप्न या 9 महिन्यांत पूर्ण होऊ शकते. सोने-चांदीत गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
advertisement
4/7
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्राचा उदय करिअरमध्ये मोठी भरभराट घेऊन आला आहे. नोकरीत बढती किंवा मोठ्या पगाराची नोकरी मिळण्याचे प्रबळ योग आहेत. व्यापाऱ्यांचा नफा दुप्पट होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण येईल, ज्यामुळे बँक बॅलन्स वाढेल. कौटुंबिक कलह संपून घरात शांती नांदेल. अडकलेली कामे भाग्याच्या जोरावर पूर्ण होतील.
advertisement
5/7
तूळ: तूळ राशीचा स्वामी देखील शुक्र आहे. तुमच्या आयुष्यातील रखडलेली कामे आता गतीने पुढे सरकतील. करिअर आणि शिक्षणाशी संबंधित कामात अनपेक्षित यश मिळेल. तुमची एखादी मोठी इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल. जर जोडीदाराशी काही मतभेद असतील, तर ते आता दूर होतील. समाजात मान-सन्मान वाढेल आणि लोकांमध्ये तुमचे आकर्षण वाढेल.
advertisement
6/7
मीन: मीन राशीसाठी शुक्र लाभ स्थानात उदित झाला आहे. तुमच्यासाठी हा काळ सुखद अनुभवांचा असेल. अचानक धनलाभाचे योग आहेत. आर्थिक स्थिरता निर्माण होईल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे तुम्ही इतरांकडून आपली कामे करून घेऊ शकाल. ऑफिसमध्ये तुमच्या सर्जनशील कामाचे कौतुक होईल. एखादे मोठे पद किंवा पुरस्कार मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
7/7
शुक्र ग्रहाचा उदय या चार राशींसाठी अधिक अनुकूल असल्याचे म्हटले जात असले तरी, त्याचा उर्वरित राशींवर पूर्णपणे नकारात्मक परिणाम होणार नाही. अनेकांना संबंध सुधारणे, सर्जनशील कार्यात यश आणि जीवनात संतुलन अनुभवता येईल. या काळात घाई टाळणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे महत्वाचे आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
दुःखाचे दिवस संपले आता फक्त सुखचं सुख, शुक्र उदयामुळे पुढचे 9 महिने 'या' 4 राशींसाठी ठरणार गेम चेंजर!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल