TRENDING:

Last Solar Eclipse 2023: वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण कधी? 5 राशीच्या लोकांसाठी अमंगळ ठरण्याची शक्यता

Last Updated:
Last Solar Eclipse 2023 Impact on Zodiac: ग्रहण ही वैज्ञानिक दृष्टीकोनातून खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाला विशेष महत्त्व आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी झाले. आता वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर रोजी होत आहे. ते कंकणाकृती असणार आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण रात्री 08.34 ते मध्यरात्री 02:25 पर्यंत असेल. ज्याचा काही राशींवर फारसा प्रभाव पडणार नाही. तरीही 5 राशीच्या लोकांसाठी ते अशुभ ठरू शकते. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा त्या 5 राशींविषयी सांगत आहेत.
advertisement
1/5
वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण कधी? 5 राशीच्या लोकांसाठी अमंगळ ठरण्याची शक्यता
मेष - वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण मेष राशीच्या लोकांसाठी अशुभ मानले जाते. मेष राशीच्या लोकांची ग्रहण काळात जवळच्या लोकांकडून फसवणूक होऊ शकते. म्हणूनच या काळात सतर्क राहणे गरजेचे आहे.
advertisement
2/5
वृषभ - राशीच्या लोकांसाठी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण प्रतिष्ठा हानी आणि धनहानीचे खराब योग घडवेल. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ राशीच्या लोकांना या काळात काळजी घ्यावी लागेल. कारण वर्षातील दुसरे सूर्यग्रहण तुमच्यासाठी अशुभ ठरू शकते.
advertisement
3/5
सिंह - वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार वर्षातील दुसरे सूर्यग्रहण सिंह राशीच्या लोकांसाठी अनावश्यक खर्च वाढवणारे मानले जाते. त्यामुळे पैसे गुंतवण्यापूर्वी काळजी घ्या. कोणाशीही व्यवहार करताना काळजी घ्या, त्रास वाढू शकतो.
advertisement
4/5
कन्या - ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या लोकांची राशी कन्या आहे, त्यांच्यासाठी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण अशुभ ठरू शकते. कन्या राशीच्या लोकांचे मित्रांशी वाद होऊ शकतात. म्हणूनच शक्य तितके वाद टाळण्याचा प्रयत्न करा.
advertisement
5/5
तूळ - वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण तूळ राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते. ग्रहण काळात तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल. हा त्रास टाळण्यासाठी भगवंताच्या भक्तीत लीन व्हा, फायदा होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Last Solar Eclipse 2023: वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण कधी? 5 राशीच्या लोकांसाठी अमंगळ ठरण्याची शक्यता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल