TRENDING:

Holi Astrology 2026: होळीची राख शांत होईपर्यंत सावधान! सलग 8 दिवस 4 राशीच्या लोकांचा खडतर काळ

Last Updated:
Holashtak 2026 Rashifal: दिनांक 24 फेब्रुवारीपासून होळीपर्यंतचा काळ काही राशीच्या लोकांना बिकट असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, होळीच्या आधीचे हे 8 दिवस खूप महत्त्वाचे आणि अशुभ मानले जातात. या काळात ग्रह खूप उग्र असतात, त्यामुळे कोणतेही चांगले किंवा शुभ कार्य करणे टाळले जाते. ग्रहांच्या स्थितीमुळे कर्कसह 4 राशींना खूप सावध राहण्याची गरज आहे.
advertisement
1/5
होळीची राख शांत होईपर्यंत सावधान! सलग 8 दिवस 4 राशीच्या लोकांचा खडतर काळ
फाल्गुन शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंतचा काळ अशुभ फळ देणारा मानला जातो. या काळात 8 ग्रह एकामागून एक उग्र होतात. अष्टमीला चंद्र, नवमीला सूर्य, दशमीला शनि, एकादशीला शुक्र, द्वादशीला गुरु, त्रयोदशीला बुध, चतुर्दशीला मंगल आणि पौर्णिमेला राहु हे सर्व ग्रह त्यांच्या उग्र रुपात असतात.
advertisement
2/5
कर्क - कर्क राशीवर चंद्राचा प्रभाव असतो. या दिवसांत नकारात्मक शक्ती जास्त सक्रिय असू शकतात, त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी अनोळखी व्यक्तीकडून काहीही खाणे-पिणे टाळावे. तुम्ही स्वभावाने संवेदनशील असल्यामुळे या काळचा तुमच्यावर जास्त परिणाम होऊ शकतो, म्हणून विशेष काळजी घ्या.
advertisement
3/5
सिंह - तुमच्या राशीचा स्वामी सूर्य आहे. सध्या केतू तुमच्या राशीतून फिरत असल्यामुळे तुम्ही थोडे हळवे होऊ शकता. शत्रूंपासून सावध राहा, कारण ते तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करू शकतात. कोणाची वाईट नजर लागू नये म्हणून सतर्क राहा आणि एखादं संरक्षक कवच किंवा लॉकेट जवळ ठेवला तरी चालेल.
advertisement
4/5
धनू - या 8 दिवसांत कामाच्या ठिकाणी खूप जपून राहा. दिलेली कामं वेळेत पूर्ण करा. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नवीन नोकरीत जॉईन व्हायचे असेल, तर हा काळ उलटून गेल्यावर करा. पैशांची देवाणघेवाण टाळा, नाहीतर नुकसान होऊ शकतं. प्रवासातही सावधगिरी बाळगा.
advertisement
5/5
कुंभ - तुमच्या राशीवर शनीचा प्रभाव असतो आणि सध्या तुमच्या राशीत शुक्र, बुध, राहु, सूर्य आणि मंगळ हे 5 ग्रह एकत्र आले आहेत. त्यामुळे तुम्ही चुकीच्या कामांपासून लांब राहा. स्वतःला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवण्यासाठी देवाची भक्ती आणि धार्मिक कामात मन रमवा. तुमचे गुप्त शत्रू या काळात डोकं वर काढू शकतात, त्यामुळे लोकांशी वागताना सावध राहा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Holi Astrology 2026: होळीची राख शांत होईपर्यंत सावधान! सलग 8 दिवस 4 राशीच्या लोकांचा खडतर काळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल