
विरारमध्ये एका तरुणाने गावकऱ्यांना मराठी भाषेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांनी मराठी भाषेचा द्वेष करतो आणि मनसेला फाट्यावर मारतो असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने मनसेने मनसे स्टाईल या तरुणाला चोप दिला. त्या तरुणाला समज देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.