TRENDING:

Abhishek Sharma : तीनवेळा शुन्यावर आऊट झाला पण गंभीरने कुणालाच खबर लागू दिली नाही, अभिषेक शर्माबद्दल धक्कादायक खुलासा!

Last Updated:
Abhishek Sharma injured Cut On hand : टीम इंडियाचा स्टार खेळाडू अभिषेक शर्मा हा पोटदुखीमुळे नाही तर हाताला लागल्याने वर्ल्ड कपच्या काही मॅचमधून गायब होता, अशी माहिती मिळाली आहे.
advertisement
1/7
तीनवेळा शुन्यावर आऊट झाला पण गंभीरने कुणालाच खबर लागू दिली नाही
टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सगळ्यांचं ज्यावर लक्ष होतं, तो अभिषेक शर्मा आत्तापर्यंत फ्लॉप ठरल्याचं पहायला मिळालं. अभिषेक शर्माने पहिल्या तीन मॅचमध्ये शुन्यावर आऊट झाला तर मागील मॅचमध्ये त्याला फक्त 15 धावा करता आल्या होत्या.
advertisement
2/7
अभिषेक शर्माने ग्रुप स्टेजमध्ये एकही धाव काढली नव्हती. तर पहिल्या मॅचमध्ये त्याला पोटदुखीचं कारण देऊन प्लेईंग इलेव्हनमधून बसवण्यात आलं होतं. अशातच धक्कादायक माहिती समोर आलीये.
advertisement
3/7
अभिषेक शर्माचा फॉर्म अचानक का गेला? असा सवाल अनेकांना पडला होता. आता तो पुन्हा बॅटिंगवर जोर लावताना दिसतोय. अशातच मीडिया रिपोर्टनुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे.
advertisement
4/7
समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीमच्या ऑफिशियल फोटोशूटच्या वेळी अभिषेकच्या हाताला गंभीर जखम झाली होती. ही दुखापत इतकी मोठी होती की, त्याच्या हाताला टाके घालावे लागले होते.
advertisement
5/7
टाके लागले असताना परिस्थितीत विश्रांतीची गरज असतानाही, त्याने दुखापतीची पर्वा न करता सुरुवातीच्या मॅचमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र, इतकी मोठी रिस्क का घेण्यात आली? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
advertisement
6/7
अभिषेकची दुखापत अजूनही भरून आली नाही, अशी माहिती समोर येतीये. टीम इंडियाकडून अजूनही यावर कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या मॅनेजमेंटही ही गोष्ट लपवून का ठेवली? असा सवाल विचारला जातोय.
advertisement
7/7
दरम्यान, आगामी दोन्ही सामन्यात अभिषेक शर्माचा फॉर्म टीम इंडियासाठी गरजेचा आहे. अभिषेक दोन्ही सामन्यात टीम इंडियाला मोठा विजय मिळवून देऊ शकतो, ज्यामुळे टीम इंडिया सेमीफायनलचं स्वप्न पाहू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Abhishek Sharma : तीनवेळा शुन्यावर आऊट झाला पण गंभीरने कुणालाच खबर लागू दिली नाही, अभिषेक शर्माबद्दल धक्कादायक खुलासा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल