TRENDING:

पालघरमधील शाळेशेजारी सुरु केलं कॉलसेंटर, थेट अमेरिकेच्या नागरिकांना केलं टार्गेट पोलिसांची धाड, आत काय चालायचं?

Last Updated:

कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल पाटील, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

पालघर : पालघर शहरात सुरू असलेल्या एका बेकायदेशीर कॉल सेंटरवर पालघर पोलिसांनी धाडसी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. पालघरच्या सुंदरम शाळेजवळील एकांत कॉम्प्लेक्समध्ये गुपचूपपणे चालवण्यात येत असलेल्या या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून मोठ्या प्रमाणावर लॅपटॉप, मोबाईल फोन आणि अन्य डिजिटल साहित्य जप्त केले आहे. या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

advertisement

पालघर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. बाहेरून साध्या व्यावसायिक कार्यालयासारखे भासणाऱ्या या इमारतीत अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने फसवणुकीचे रॅकेट चालवले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपी अमेरिकेतील नागरिकांना फोन करून स्वतःला बँक अधिकारी, तांत्रिक सहाय्यक किंवा सरकारी कर्मचारी असल्याचे भासवत विविध कारणांनी त्यांची आर्थिक माहिती मिळवत होते. त्यानंतर या माहितीच्या आधारे संबंधितांची फसवणूक करून त्यांच्या खात्यातील रक्कम लुबाडली जात होती.

advertisement

पाच जणांना ताब्यात घेतले

छाप्यादरम्यान पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या चौकशीतून या रॅकेटचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार असल्याचे संकेत मिळाले आहेत. जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये फसवणुकीशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण डेटा, कॉल रेकॉर्डिंग्स, स्क्रिप्ट्स आणि आर्थिक व्यवहारांचे तपशील सापडले आहेत. या सर्व साहित्याच्या आधारे पोलिस अधिक तपास करत आहेत.

advertisement

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे. या रॅकेटमागे आणखी कोणी सूत्रधार आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. तसेच या कॉल सेंटरमधून नेमकी किती रक्कम फसवणुकीद्वारे उकळण्यात आली, याचाही तपास सुरू आहे.

संशयास्पद कॉल्सपासून सावध राहण्याचे आवाहन 

advertisement

दरम्यान, पालघर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून सायबर गुन्हेगारीविरोधात कठोर पावले उचलण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनीही अशा प्रकारच्या संशयास्पद कॉल्सपासून सावध राहावे आणि कोणतीही वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.  पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ग्रामीण भागातील पारंपरिक पदार्थ, सोप्या पद्धतीने बनवा गोड सांदणे, रेसिपीचा Video
सर्व पहा

पोलिसांचा हायवेवर थरार! मुंबईला निघालेली गोव्याची दारू वाटेतच जप्त; 42 बॉक्ससह आलिशान Creta ताब्यात 

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पालघरमधील शाळेशेजारी सुरु केलं कॉलसेंटर, थेट अमेरिकेच्या नागरिकांना केलं टार्गेट पोलिसांची धाड, आत काय चालायचं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल