T20 World Cup : संजूची एन्ट्री, अभिषेकही खेळणार... डू ऑर डाय मॅचमध्ये टीम इंडियातून दोघांना डच्चू!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 रननी पराभव झाला. यानंतर वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेला 107 रननी धूळ चारली. या दोन निकालांमुळे टीम इंडिया अडचणीत आली आहे.
advertisement
1/10

सुपर-8 मध्ये वेस्ट इंडिजचा नेट रनरेट +5.350 तर दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट +3.800 झाला आहे, तर टीम इंडियाचा नेट रनरेट मायनस 3.800 आहे, त्यामुळे भारतीय टीमला आता दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज मॅचच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे.
advertisement
2/10
भारताला वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवावा लागणार आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करावा, यासाठी प्रार्थना करावी लागणार आहे.
advertisement
3/10
वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि भारताने उरलेले दोन्ही सामने जिंकले तर भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांचे 4-4 पॉईंट्स होतील. या परिस्थितीमध्ये दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दोन टीम सेमी फायनलला पोहोचतील, कारण त्यांचा नेट रनरेट टीम इंडियापेक्षा चांगला आहे आणि 2 सामन्यांमध्ये भारताला मायनसचा नेट रनरेट प्लसमध्ये आणणं जवळपास अशक्य आहे.
advertisement
4/10
गुरूवार 26 फेब्रुवारीला टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध डू ऑर डायचा सामना खेळणार आहे. या सामन्यात टीम इंडियामध्ये 2 बदल होण्याची शक्यता आहे. वर्ल्ड कपच्या 3 सामन्यांमध्ये डकवर आऊट झालेल्या अभिषेक शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 15 रन केले, पण यातही त्याला संघर्ष करावा लागला.
advertisement
5/10
अभिषेक शर्माच्या खराब कामगिरीनंतर त्याच्याऐवजी संजू सॅमसनला संधी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. पण संजू सॅमसनची टीममध्ये एन्ट्री होईल तरीही अभिषेकला संधी दिली जाईल, अशी माहिती बीसीसीआय मधल्या विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 मराठीला दिली आहे.
advertisement
6/10
अभिषेक शर्मा आणि इशान किशन हे ओपनिंगला खेळतील, तर तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव मैदानात उतरू शकतो. आशिया कपमध्ये संजू सॅमसन मिडल ऑर्डरमध्ये खेळला होता, त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धही संजूचा मिडल ऑर्डरसाठी विचार होऊ शकतो.
advertisement
7/10
टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरचा बॅटर तिलक वर्मा फॉर्मसाठी झगडत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिलकने टीम अडचणीत असताना खराब शॉट मारला, त्यावरूनही त्याच्यावर टीका झाली आहे, त्यामुळे तिलकऐवजी संजूला संधी मिळू शकते.
advertisement
8/10
टीम इंडियाच्या टॉप-8 मध्ये अभिषेक, इशान, तिलक, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर आणि रिंकू सिंग हे डावखुरे बॅटर आहेत. या टीम कॉम्बिनेशनचा फटकाही भारताला बसला आहे, त्यामुळे उजव्या हाताने बॅटिंग करणारा संजू बऱ्याच समस्या सोडवू शकतो.
advertisement
9/10
संजू टीममध्ये आला तर तो स्वत: सूर्या आणि हार्दिक हे तीन उजव्या हाताचे बॅटर उपलब्ध असतील, त्यामुळे बॅटिंग क्रमवारीमध्येही गरजेनुसार बदल करता येतील.
advertisement
10/10
संजूशिवाय टीममध्ये अक्षर पटेलचं कमबॅकही निश्चित मानलं जात आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अक्षर पटेल खेळेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर अक्षरला बाहेर ठेवून चूक केल्याचं टीम इंडियानेही कबूल केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : संजूची एन्ट्री, अभिषेकही खेळणार... डू ऑर डाय मॅचमध्ये टीम इंडियातून दोघांना डच्चू!