ST Accident: भंडारज फाट्यावर एसटीने कारला उडवलं; दोन निष्पापांचा अंत, काळजाचा थरकाप उडवणारे फोटो
- Reported by:SANJAY SHENDE
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पोलिसांनी तातडीने मदतकार्य राबवत जखमींना रुग्णालयात हलवले तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले.
advertisement
1/7

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भंडारज फाटा परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला. एस.टी. महामंडळाची प्रवासी बस आणि खासगी कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
2/7
समोर आलेल्या एस.टी. बस अमरावतीहून अंजनगाव सुर्जीच्या दिशेने जात होती. भंडारज फाट्याजवळ अचानक बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट समोरून येणाऱ्या कारवर आदळली.
advertisement
3/7
धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. अपघातात कारमधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
4/7
जखमींवर प्राथमिक उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच अंजनगाव सुर्जी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
advertisement
5/7
पोलिसांनी तातडीने मदतकार्य राबवत जखमींना रुग्णालयात हलवले तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तत्काळ उपाययोजना केल्या.
advertisement
6/7
प्राथमिक तपासात बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, अपघात नेमका कसा घडला, याची सखोल चौकशी सुरू असून बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
advertisement
7/7
या अपघातामुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतूक सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
ST Accident: भंडारज फाट्यावर एसटीने कारला उडवलं; दोन निष्पापांचा अंत, काळजाचा थरकाप उडवणारे फोटो