तृप्ती देसाई या Bigg Boss Marathi 4 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. त्यांनी त्यांच्या सीझनमधील एक खास किस्सा शेअर केला आहे. बिगबॉसच्या घरात त्यांचा आवाज ऐकून सलमान खानने महेश मांजरेकर यांना फोन केला होता. असं महेश मांजरेकर यांनी मिश्किलपणे सांगितलं होतं.
( तुझा रेट किती? लाइव्ह शोमध्ये अँकरचा प्रश्न, भडकली गायिकेला; चपलेनं मारलं, VIDEO )
advertisement
तृप्ती देसाईंनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "बिगबॉसच्या घरातील माझा जोरात आवाज ऐकून "सलमान खान" यांचा फोन महेश मांजरेकर सरांना आला होता. आमच्या सिझनसारखी मजा त्यानंतरच्या कोणत्याच सीझनमध्ये अजिबातच नाही हे मात्र तितकच खरं आहे. ते घर आहे.... तिथे माणुसकी ,नाती जपणं, टास्क खेळणं, कोणालाही जेवण कमी पडून न देणे हे सर्व सुद्धा पाहणे गरजेचं आहे आणि आम्ही हे सर्व जपण्यात यशस्वी झालेलो होतो."
तृप्ती यांनी पुढे लिहिलंय, "आमचा सीजन संपून तीन वर्ष होऊन गेले परंतु या सर्व गोष्टींमुळे प्रत्येकाला तो सकारात्मकरित्या लक्षात आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रेमसुद्धा आम्हाला मिळत आहे, आम्ही रीलस्टार म्हणून नाही 'रियल स्टार' म्हणून त्या सीजनमध्ये कंटेस्टंट होतो याचा प्रचंड अभिमान आहे.
सध्या सुरू असलेल्या Bigg Boss Marathi 6 मध्ये मोठ्या प्रमाणावर 'रील स्टार्स' म्हणजेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सहभागी झाले आहेत. यातील अनेक स्पर्धक आधीच घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे तृप्ती देसाई यांची पोस्ट ही सध्याच्या स्पर्धकांवर अप्रत्यक्ष टीका असल्याचं मानलं जात आहे.
तृप्ती देसाई यांच्या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. काहींनी त्यांच्या मताला पाठिंबा दिला. तर काहींनी सध्याच्या स्पर्धकांचं समर्थन केलं.
