गेल्या काही वर्षांत करिअर आणि आरोग्याकडे दुर्लक्ष याबद्दल आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. एमडी डॉ. सुधीर कुमार यांच्या मते, त्यांच्याकडे बाह्यरुग्ण विभागातील म्हणजेच OPD तील रुग्णांपैकी एक मोठा भाग आता वीस ते पन्नास वयोगटातील तरुणांनी भरलेला असतो. हे वय आयुष्यातील सर्वात उत्साही काळ मानला जातो, पण चित्र बदलताना दिसतंय.
advertisement
डॉ. सुधीर यांनी तरुणांमध्ये वाढत्या आजारांमागची कारणं आणि ते टाळण्यासाठी काय करता येईल याबद्दल काही गोष्टी सांगितल्यात.
Minimalism : अनावश्यक गोष्टींचा पसारा आवरा, वाचा मिनिमलिस्ट जगण्याचे मोठे फायदे
तरुणांमधे वाढणाऱ्या आरोग्य समस्या -
वजन आणि मधुमेहाचा धोका - बहुतेक तरुण लठ्ठ असतात. शिवाय, त्यांचं HbA1C वाढलेलं असतं.
पोषणाची कमतरता - व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन डीची कमी पातळी समस्या हल्ली मोठ्या प्रमाणात जाणवते.
हृदय आणि रक्ताशी संबंधित समस्या - वाढलेलं कोलेस्टरॉल, उच्च रक्तदाब आणि वाढलेले होमोसिस्टीन पातळी तरुणांच्या हृदयाच्या आरोग्यासाठी धोका निर्माण करत आहेत.
हाडं आणि सांधेदुखी - तासन्तास चुकीच्या स्थितीत बसल्यानं डिस्क प्रोलॅप्सचं प्रमाण वाढतंय, ज्यामुळे सतत मान आणि पाठदुखी होते.
तीस आणि चाळीशीच्या दशकात लोकांना दीर्घकालीन आजार होण्यामागे काही वाईट सवयी कारणीभूत ठरतात.
बैठी जीवनशैली - दिवसातून दहा तासांपेक्षा जास्त काम करणं आणि व्यायामाचा अभाव.
खाण्याच्या चुकीच्या सवयी - वारंवार बाहेर खाणं आणि आहारात अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थांचं वाढलेलं प्रमाण.
झोप आणि ताण - सात तासांपेक्षा कमी झोप आणि मानसिक ताण.
व्यसन - धूम्रपान आणि मद्यपानाचा आरोग्यावर होणारा प्रतिकूल परिणाम.
Bone Density : उठ बस करताना हाडांमधे वेदना होतात ? जाणून घ्या कारणं, उपचार
निरोगी राहण्यासाठी काय करणं शक्य -
पुरेशी झोप घ्या आणि व्यायाम करा - दररोज किमान सात तास झोप घ्या. दररोज तीस मिनिटं व्यायाम करा, ज्यामधे एरोबिक्स आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग दोन्हीचा समावेश आहे.
सक्रिय रहा - कामासाठी बराच वेळ बसून राहावं लागत असेल, तर दर 45 मिनिटांनी काही मिनिटं चालत जा.
आहारातील बदल - कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदकं कमी करा आणि आहारात प्रथिनं वाढवा. साखर, गोड पदार्थ आणि थंड पेयं पूर्णपणे टाळा.
वाईट सवयी सोडा - धूम्रपान आणि मद्यपान टाळा. ताण व्यवस्थापवन करण्यावर भर द्या.
नियमित तपासणी - वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करा, जेणेकरून कोणताही आजार त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखण्यास मदत होईल.
