advertisement

Minimalism : मिनिमलिस्ट लाईफस्टाईल म्हणजे काय ? मिनिमलिस्ट जगण्याचे वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर जाणवणात सकारात्मक परिणाम

Last Updated:

घरात साचलेलं जुनं सामान, कपाट भरुन कपडे, हे पाहून प्रश्न पडतो की हे सगळं आवरायचं कसं. आपण किती अनावश्यक गोष्टी आणि ताणतणाव सहन करतो आहोत हे आपल्याला कळतही नाही. या सगळ्याचा निपटारा करण्यासाठी मिनिमलिस्ट जीवनशैलीचा उपयोगात आणणं उपयुक्त ठरतं.

News18
News18
मुंबई : आपल्या घरांमधे किती तरी सामान कित्येक दिवस नाही तर कित्येक वर्ष पडून असतं. त्याचा कधीतरी उपयोग होईल म्हणून ते ठेवलं जातं पण त्याचा वापर होत नाही.
घरात साचलेलं जुनं सामान, कपाट भरुन कपडे, हे पाहून प्रश्न पडतो की हे सगळं आवरायचं कसं. आपण किती अनावश्यक गोष्टी आणि ताणतणाव सहन करतो आहोत हे आपल्याला कळतही नाही. या सगळ्याचा निपटारा करण्यासाठी मिनिमलिस्ट जीवनशैलीचा उपयोगात आणणं उपयुक्त ठरतं.
Minimalist lifestyle म्हणजे आयुष्यात जे खरोखर मूल्यवान आहे तेच ठेवणं. मिनिमलिझममुळे आपल्याला कमी गोष्टींमधेही जीवन अधिक अर्थपूर्ण, शांत आणि आनंदी होऊ शकतं हे कळतं. मिनिमलिझम हे एक तत्वज्ञान आणि जीवनशैली आहे. यामुळे शारीरिक आणि मानसिक गोंधळ कमी होतो.
advertisement
ही जीवनशैली आत्मसात करणाऱ्यांना, कमी पण महत्त्वाच्या वस्तू असल्यानं अधिक जाणीवपूर्वक निर्णय घेणं शक्य होतं. यात प्रमाणापेक्षा गुणवत्तेला महत्त्व दिलं जातं. कमी वस्तू म्हजणे कमतरता नाही हे आधी लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण यामुळे, तुमचा वेळ, ऊर्जा आणि पैसा खरोखर महत्त्वाच्या गोष्टींवर खर्च केला जातो.
advertisement
Minimalist lifestyle चे महत्त्वाचे फायदे -
कमी गोंधळ, कमी ताण - गोंधळलेल्या वातावरणामुळे मेंदूवर दबाव येतो आणि तणाव संप्रेरक कॉर्टिसोल वाढतो. घर स्वच्छ आणि व्यवस्थित असेल तर मनाला शांतता मिळते असं संशोधनातून दिसून आलं आहे.
लक्ष केंद्रित करणं आणि उत्पादकता - कमी गोष्टी असल्यानं लक्ष कमी विचलित होतं. कमी गोष्टी असतात तेव्हा मेंदू महत्त्वाच्या कामांवर चांगलं लक्ष केंद्रित करू शकतो.
advertisement
आनंद आणि समाधान - साधेपणात समाधान शोधायला शिकल्यानं जीवन हलकं आणि संतुलित वाटतं. त्यामुळे मन अस्वस्थ होत नाही.
बजेटिंग - कमी खरेदी म्हणजे जास्त बचत आणि गुंतवणुकीच्या संधी. यामुळे जीवनशैलीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करणं शक्य होतं.
मिनिमलिस्ट बनण्यासाठी 21 सोप्या टिप्स -
तुमचे प्राधान्यक्रम ठरवा.
हळू हळू सुरुवात करा.
तुमच्याकडे जे आहे त्याची कदर करा.
advertisement
दररोज थोडं थोडं आवरा.
प्रत्येक गोष्टीसाठी एक नियुक्त जागा निश्चित करा.
कॅप्सूल वॉर्डरोब तयार करा.
कागदपत्रे डिजिटल करा.
बहुपयोगी वस्तू खरेदी करा.
organisational अ‍ॅप्स वापरा.
तुटलेल्या वस्तू फेकून देण्यापूर्वी त्या दुरुस्त करा.
डिजिटल आणि मानसिक साधेपणासाठी काय करता येईल याचा विचार करा.
स्क्रीन टाइम कमी करा.
गोष्टींपेक्षा अनुभवांवर गुंतवणूक करा.
advertisement
गुणवत्तेला प्राधान्य द्या.
समुदाय म्हणजेच community शेअरिंग करायला शिका.
माइंडफुलनेसचा सराव करा.
एक-एक-एक-एक-बाहेर नियम म्हणजेच नवीन वस्तू घेण्याआधी जुन्या वस्तूचा पूर्ण वापर करा.
जास्त वस्तू दान करा.
नियमित साफसफाईचं वेळापत्रक तयार करा.
बजेट तयार करा.
प्रत्येक खर्चाचा मागोवा घ्या.
advertisement
अनावश्यक खर्चाचं बचतीत रूपांतर करा.
मिनिमलिस्ट जीवनशैलीनुसार जगणं एका रात्रीत घडणं शक्य नाही. ही एक संथ, जाणीवपूर्वक केलेली प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत दररोज छोटे बदल करून, जीवन हलकं, अधिक नियोजनपूर्वक आणि अधिक अर्थपूर्ण बनवू शकता.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Minimalism : मिनिमलिस्ट लाईफस्टाईल म्हणजे काय ? मिनिमलिस्ट जगण्याचे वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर जाणवणात सकारात्मक परिणाम
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement