पुणेकरानं बनवला मातीचा कुकर, ना फुटण्याची भीती, ना वाजेल शिट्टी, पाहा किंमत किती?
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Clay Cooker: पाच वेगवेगळ्या प्रकारच्या मातीपासून हा कुकर तयार करण्यात आला आहे. यामध्ये अन्न शिजवल्यास त्यातील सर्व पोषक घटक टिकून राहतात.
advertisement
1/7

गेल्या काही काळात लोक आरोग्यासाठी सतर्क झाले आहेत. त्यामुळे स्वयंपाकासाठी वापरायची भांडी देखील आरोग्याला अपाय होणार नाहीत, अशी वापरण्याकडे कल वाढतोय. विशेष म्हणजे मातीच्या भांड्यांना अनेकांची पसंती असते. त्यासाठीच पुण्यातील निनाद गिडवानी यांनी एक अनोखा प्रयोग केला आहे. त्यांना चक्क विना शिट्टीचा मातीचा कुकर तयार केला आहे.
advertisement
2/7
निनाद गिडवानी यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतरच त्यांचा संशोधन प्रवास सुरू झाला. आत्तापर्यंत त्यांनी विविध क्षेत्रांत संशोधन केले असून त्यांना भारत सरकारकडून अनेक पुरस्कार आणि गोल्ड मेडल मिळाले आहेत. त्यांनी तयार केलेल्या विनाशिट्टीच्या मातीच्या कुकरला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून सुवर्णपदक मिळाले आहे.
advertisement
3/7
पाच वेगवेगळ्या प्रकारच्या मातीपासून हा कुकर तयार करण्यात आला आहे. यामध्ये अन्न शिजवल्यास त्यातील सर्व पोषक घटक टिकून राहतात. तसेच आपल्याला त्या पदार्थातील सर्व पोषक तत्व मिळतात, असं निनाद सांगतात.
advertisement
4/7
नॅचरल प्रेशर कुकर हा पारंपरिक प्रेशर कुकरला उत्तम पर्याय आहे. पारंपरिक कुकरमध्ये अन्न खूप जास्त दाबाखाली शिजते. शिट्टी नीट न झाल्यास कुकर फुटण्याचा देखील धोका असतो. मात्र, मातीपासून बनवलेल्या नॅचरल प्रेशर कुकरमध्ये फक्त आवश्यक तेवढाच दाब तयार होतो.
advertisement
5/7
झाकणाच्या खास रचनेमुळे कुकरमधील जास्तीची वाफ आपोआप बाहेर जाते. त्यामुळे कुकरमध्ये जास्त दाब साचत नाही आणि अन्न सुरक्षितपणे शिजते. अन्नाची चव, सुगंध आणि पोषणमूल्ये टिकून राहते, असं गिडवानी सांगतात.
advertisement
6/7
विशेष म्हणजे या मातीच्या कुकरला गॅसवर वापरल्यास 100 वर्ष कोणत्याही प्रकारचा तडा जाणार नाही. यामध्ये 5 प्रकारच्या मातीचा वापर केला असून मॅग्नेशियम, झिंक, कॅल्शियम याचा देखील लेप देण्यात आला आहे, असंही निनाद गिडवानी यांनी सांगितलं.
advertisement
7/7
मातीच्या कुकरची किंमत 600 रुपयांपासून ते 3 हजार रुपयांपर्यंत आहे. आकारानुसार त्याचा दर वाढत जातो. कुकरसोबतच इतर मातीची भांडी देखील गिडवानी यांनी तयार केली आहेत. ती खरेदी करायची असल्यास https://www.ninadspottery.com/ या वेबसाईटवरून घेऊ शकता,
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
पुणेकरानं बनवला मातीचा कुकर, ना फुटण्याची भीती, ना वाजेल शिट्टी, पाहा किंमत किती?