TRENDING:

T20 World Cup : ...तरच टीम इंडियाचा नेट रनरेट प्लसमध्ये येणार, झिम्बाब्वेला किती रननी हरवावं लागणार?

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभव झाला, त्यामुळे भारतासाठी सेमी फायनलचा मार्ग खडतर झाला आहे.
advertisement
1/8
...तरच भारताचा नेट रनरेट प्लसमध्ये येणार, झिम्बाब्वेला किती रननी हरवावं लागणार?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा 76 रननी पराभव झाला. तर वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेला 107 रननी धूळ चारली. या दोन निकालांमुळे टीम इंडियाच्या सेमी फायनलला पोहोचण्याच्या आशा डळमळीत झाल्या आहेत.
advertisement
2/8
वेस्ट इंडिजचा नेट रनरेट +5.350, दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट +3.800 आणि भारताचा नेट रनरेट -3.800 आहे. सेमी फायनलला पोहोचण्यासाठी टीम इंडियाला झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध विजय मिळवावाच लागणार आहे, याशिवाय त्यांना नेट रनरेटही मायनसमधून प्लसमध्ये आणावा लागेल.
advertisement
3/8
नेट रनरेट सुधारल्यानंतरही टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या मॅचवरही अवलंबून राहावं लागेल. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय व्हावा आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेलाही हरवावं, यासाठी टीम इंडियाला प्रार्थना करावी लागेल.
advertisement
4/8
दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडियाने त्यांच्या उरलेल्या दोन मॅच जिंकल्या तर या दोन्ही टीम नेट रनरेटच्या समीकरणाशिवाय सेमी फायनलला पोहोचतील, कारण दक्षिण आफ्रिकेचे 6, टीम इंडियाचे 4 आणि वेस्ट इंडिजचे 2 पॉईंट्स राहतील.
advertisement
5/8
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजविरुद्ध पराभव झाला पण आफ्रिका झिम्बाब्वेविरुद्ध जिंकले, तसंच भारताने उरलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला तर भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे प्रत्येकी 4-4 पॉईंट्स होतील, या परिस्थितीमध्ये चांगला नेट रनरेट असलेल्या दोन टीम सेमी फायनलमध्ये जातील.
advertisement
6/8
26 फेब्रुवारीला भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात नेट रनरेट सुधारण्यासाठी टीम इंडियाला कमीत कमी 100 किंवा त्यापेक्षा जास्त रनने विजय मिळवावा लागणार आहे, ज्यामुळे त्यांचा नेट रनरेट प्लस होईल.
advertisement
7/8
या सामन्यात टीम इंडियाने पहिले बॅटिंग करून 220 रन केले तर त्यांना झिम्बाब्वेचा 120 किंवा त्यापेक्षा कमी रनवर ऑलआऊट करावा लागणार आहे, तरच टीम इंडियाचा नेट रनरेट प्लसमध्ये येऊ शकतो. भारताने झिम्बाब्वेचा 76 रननी पराभव केला तरी त्यांचा नेट रनरेट मायनस 3.800 पासून 0 पर्यंतच येऊ शकेल, त्यामुळे भारताला कमीत कमी 120 रनचा विजय गरजेचा आहे.
advertisement
8/8
झिम्बाब्वेने पहिले बॅटिंग करून भारताला 150 रनचं टार्गेट दिलं तर हे आव्हान टीम इंडियाला 11 ओव्हरमध्ये पूर्ण करावं लागेल. तसंच 180 रनचं आव्हान असेल तर ते भारतीय टीमला 11.4 ओव्हर म्हणजेच 70 बॉलमध्ये पार करावं लागेल, तरंच टीम इंडियाचा नेट रनरेट प्लसमध्ये येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : ...तरच टीम इंडियाचा नेट रनरेट प्लसमध्ये येणार, झिम्बाब्वेला किती रननी हरवावं लागणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल