'माझ्याकडे तिरक्या नजरेने बघायचे', 'या' सुपरस्टारसोबत काम करायला माधुरी दीक्षितला वाटायची भीती, सांगितला 40 वर्षांपूर्वीचा किस्सा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Madhuri Dixit: बिनधास्त वावरणारी माधुरी पहिल्या भेटीत या अभिनेत्याला पाहून अक्षरशः थरथर कापत होती. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या सेटवर तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला.
advertisement
1/8

बॉलिवूडची एव्हरग्रीन जोडी म्हणजे माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ. पडद्यावर या दोघांची केमिस्ट्री जितकी लाजवाब दिसते, तितकीच त्यांची मैत्रीही घट्ट आहे.
advertisement
2/8
पण तुम्हाला माहीत आहे का? आज जॅकी दादांसोबत बिनधास्त वावरणारी माधुरी पहिल्या भेटीत त्यांना पाहून अक्षरशः थरथर कापत होती. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या सेटवर या दोन दिग्गजांनी हजेरी लावली आणि ८० च्या दशकातील काही रंजक आठवणींना उजाळा दिला.
advertisement
3/8
१९८६ साली सुभाष घई यांच्या 'कर्मा' चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. माधुरी दीक्षित त्यावेळी सिनेसृष्टीत अगदीच नवीन होती आणि या चित्रपटात ती एका छोट्या गाण्यासाठी कास्ट झाली होती.
advertisement
4/8
माधुरीने सांगितलं, "मी पहिल्यांदा अनिल कपूर आणि जग्गू दादांना कर्माच्या सेटवर पाहिलं. मी खूपच घाबरलेली होते. मी तिथे पोहोचले तेव्हा अनिल जी आणि जग्गू दादा दोघंही माझ्याकडे तिरक्या नजरेने बघत होते. त्यांची ती स्टाईल आणि दरारा पाहून माझी चांगलीच भंबेरी उडाली होती!"
advertisement
5/8
एकीकडे माधुरी जॅकी श्रॉफना पाहून घाबरायची, तर दुसरीकडे जॅकी दादांची अवस्थाही काही वेगळी नव्हती. स्वतः जॅकी श्रॉफ यांनी कपिलच्या शोमध्ये कबूल केलं की, माधुरीसारख्या सुंदर आणि कसलेल्या अभिनेत्रीसमोर रोमँटिक सीन करताना त्यांची दातखीळ बसायची.
advertisement
6/8
जग्गू दादा म्हणाले, "माधुरीसमोर उभं राहिलो की मला आजही दडपण येतं. तिच्या डोळ्यांत पाहून डायलॉग बोलणं माझ्यासाठी खूप कठीण असायचं, मी आजही तिच्यासमोर लाजतो."
advertisement
7/8
माधुरीने १९८४ मध्ये 'अबोध'मधून तर जॅकी यांनी १९८२ मध्ये 'स्वामी दादा'मधून आपल्या करिअरची सुरुवात केली. या जोडीने पुढे जाऊन भारतीय सिनेसृष्टीला एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले.
advertisement
8/8
राम लखनमध्ये जग्गू दादा मोठा भाऊ आणि माधुरी अनिल कपूरची प्रेयसी होती. खलनायकमधील 'चोली के पीछे' गाण्यातील त्यांची केमिस्ट्री आजही चर्चेत आहे. १०० डेज या सस्पेन्स थ्रिलरने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. परिंदा या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने समीक्षकांचीही दाद मिळवली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'माझ्याकडे तिरक्या नजरेने बघायचे', 'या' सुपरस्टारसोबत काम करायला माधुरी दीक्षितला वाटायची भीती, सांगितला 40 वर्षांपूर्वीचा किस्सा