TRENDING:

कोणाला क्लीवेज हवंय तर कोणाला बेंबी, अभिनत्रींना कसं करतात एक्पोज? प्रसिद्ध स्टारने सांगितलं धक्कादायक वास्तव

Last Updated:
अभिनेत्रींच्या शरीराचं ज्या प्रकारे बाजारीकरण केलं जातं, त्यावर अभिनेत्रीने आपलं स्पष्ट मत मांडलं असून, यामध्ये तिने बॉलीवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील फरक चव्हाट्यावर आणला आहे.
advertisement
1/11
कोणाला क्लीवेज हवंय तर कोणाला बेंबी, अभिनत्रीने सांगितलं धक्कादायक वास्तव
आपल्या बिनधास्त बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री तापसी पन्नू पुन्हा एकदा आपल्या एका वादग्रस्त विधानामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे.
advertisement
2/11
दिल्लीची मुलगी ते साऊथची सुपरस्टार आणि आता बॉलीवूडची एक कसलेली अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या तापसीने सिनेसृष्टीतील वास्तवावर बोट ठेवलंय.
advertisement
3/11
अभिनेत्रींच्या शरीराचं ज्या प्रकारे बाजारीकरण केलं जातं, त्यावर तापसीने आपलं स्पष्ट मत मांडलं असून, यामध्ये तिने बॉलीवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील फरक चव्हाट्यावर आणला आहे.
advertisement
4/11
'स्क्रीन'ला दिलेल्या एका मुलाखतीत तापसीने गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्रींसोबत होणाऱ्या वागणुकीवर भाष्य केलं.
advertisement
5/11
ती म्हणाली, "मला आजही हे कोडं सुटलेलं नाहीये की साऊथच्या गाण्यांमध्ये कमरेवर आणि बेंबीवर इतका जोर का दिला जातो? हिंदी सिनेमात आयटम साँग्समध्ये तिकडे लक्ष नसतं. बॉलीवूडमध्ये जास्त कल हा क्लीवेज दाखवण्याकडे असतो, तर साऊथमध्ये सगळं लक्ष अभिनेत्रीच्या पोटावर केंद्रित केलं जातं."
advertisement
6/11
तापसीने साऊथच्या सेटवरचा एक अत्यंत संकोचवणारा अनुभवही शेअर केला. ती सांगते की, "साऊथमध्ये काम करताना अनेकदा अभिनेत्रींना पॅडेड ब्रा वापरण्यास सांगितलं जातं. पण सर्वात मोठी अडचण ही असते की दिग्दर्शक हे थेट अभिनेत्रीला सांगत नाही. ही सूचना अनेक लोकांकडून फिरून अभिनेत्रीपर्यंत पोहोचते."
advertisement
7/11
ती पुढे म्हणाली, "कल्पना करा, किती लाजिरवाणी परिस्थिती असते ती. भर चित्रीकरणात कोणीतरी उठून जातं, सगळ्यांना ठाऊक असतं की नक्की काय चाललंय आणि जेव्हा तुम्ही परत येता तेव्हा तिथे बसलेले सर्व पुरुष तुमच्या शरीरातील बदलांकडे टक लावून पाहत असतात."
advertisement
8/11
यावेळी तापसीने तिच्या पदार्पणाच्या चित्रपटातील तो प्रसिद्ध 'नारळ' किस्साही पुन्हा एकदा सांगितला. दिग्दर्शक के. राघवेन्द्र राव यांच्या चित्रपटातून तापसीने करिअरची सुरुवात केली होती. एका गाण्याच्या सीनमध्ये तापसीच्या पोटावर नारळ मारला गेला होता.
advertisement
9/11
त्यावर ती उपरोधिकपणे म्हणाली, "पोटावर नारळ मारण्यात काय सेन्शुअस आहे, हे मला आजही कळलेलं नाही." या विधानावरून साऊथमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता, ज्याबद्दल नंतर तापसीने जाहीर माफीही मागितली होती.
advertisement
10/11
तापसीचा नवा चित्रपट 'अस्सी' २० फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला असून, यात ती एका जबरदस्त भूमिकेत दिसत आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित हा चित्रपट एका कोर्टरूम ड्रामावर आधारित आहे.
advertisement
11/11
यामध्ये रेवती आणि नसीरुद्दीन शाह यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांभोवती फिरणारी ही कथा न्यायव्यवस्थेतील गुंतागुंत आणि पीडितेच्या मानसिक जखमांचं दर्शन घडवते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कोणाला क्लीवेज हवंय तर कोणाला बेंबी, अभिनत्रींना कसं करतात एक्पोज? प्रसिद्ध स्टारने सांगितलं धक्कादायक वास्तव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल