'दृश्यम'-'महाराजा' काहीच नाही, 'या' क्राईम थ्रिलरने OTT वर उडवलाय धुरळा, पाहून मेंदूला झिणझिण्या येतील! 9.6 आहे रेटिंग
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Best Crime Thriller: सध्या ओटीटीवर एका अशा वेब सिरीजची चर्चा आहे जिच्यासमोर 'दृश्यम' आणि 'महाराज' सारखे चित्रपटही फिके वाटू लागले आहेत.
advertisement
1/12

तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही आतापर्यंतचे सर्व बेस्ट सस्पेन्स थ्रिलर चित्रपट पाहिले आहेत, तर थांबा! साऊथ फिल्म इंडस्ट्रीने पुन्हा एकदा बॉलिवूडला धोबीपछाड देत एक असा मास्टरपीस सादर केला आहे, जो तुमच्या मेंदूच्या नसांना झिणझिण्या आणल्याशिवाय राहणार नाही.
advertisement
2/12
सध्या ओटीटीवर एका अशा वेब सिरीजची चर्चा आहे जिच्यासमोर 'दृश्यम' आणि 'महाराज' सारखे चित्रपटही फिके वाटू लागले आहेत.
advertisement
3/12
या सिरीजचं नाव आहे 'राक्षस'. केवळ क्राईमच नाही, तर अंधश्रद्धा आणि मानवी क्रूरतेचा असा काही मेळ यात घातला आहे की पाहताना काळजाचा ठोका चुकेल.
advertisement
4/12
कर्नाटकातील निसर्गरम्य मलप्रभा नदी आणि ऐतिहासिक यल्लम्मा मंदिराच्या आसपास या सिरीजचं कथानक फिरतं.
advertisement
5/12
शांत वाहणाऱ्या या नदीच्या काठावर अचानक अर्धवट सडलेल्या अवस्थेत मानवी प्रेतं सापडू लागतात. गावकरी आणि प्रशासन याला मगरीचा हल्ला समजून दुर्लक्ष करतात.
advertisement
6/12
पण खरा राक्षस मगरीच्या रूपात नाही, तर माणसाच्या वेषात लपलेला असतो. ही केवळ एक साधी पोलीस तपासाची कथा नाही, तर ती मानवी मानसिकतेच्या काळोख्या कोपऱ्यांचा शोध घेणारा प्रवास आहे.
advertisement
7/12
या केसची कमान सांभाळतो तो म्हणजे सब-इन्स्पेक्टर हनमप्पा. दिग्गज कन्नड अभिनेता विजय राघवेन्द्र याने ही भूमिका इतकी जिवंत केली आहे की त्याची घुसमट तुम्हाला पडद्यावर जाणवते.
advertisement
8/12
हनमप्पाला खात्री असते की या मृत्यूंमागे कोणताही प्राणी नाही, तर एक अत्यंत चाणाक्ष आणि क्रूर मानवी मेंदू आहे.
advertisement
9/12
हा खुनी शोधता शोधता हनमप्पाचं खाजगी आयुष्य विस्कळीत होतं. त्याच्या गरोदर पत्नीसोबतचे त्याचे संबंध ताणले जातात. कर्तव्य की कुटुंब? या द्वंद्वात अडकलेला हनमप्पा त्या नराधमाला पकडू शकेल का, हा सस्पेन्स शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
advertisement
10/12
एखाद्या सिरीजला ९.६ IMDb रेटिंग मिळणं ही साधी गोष्ट नाही. 'असुर' किंवा 'पाताल लोक' सारख्या डार्क सिरीज ज्यांना आवडतात, त्यांच्यासाठी ही पर्वणीच आहे. दिग्दर्शक सुहान प्रसाद यांनी तांत्रिकदृष्ट्या ही सिरीज जागतिक दर्जाची बनवली आहे.
advertisement
11/12
सिरीजचं पार्श्वसंगीत आणि सिनेमॅटोग्राफी इतकी भीतीदायक आहे की प्रत्येक क्षणाला काहीतरी अघटित घडणार असं वाटत राहतं. विजय राघवेन्द्र सोबतच मयूरी क्यातारी आणि अविनाश यांच्या अभिनयाने सिरीजमध्ये जीव ओतला आहे.
advertisement
12/12
'राक्षस' ही सिरीज सध्या ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत आहे. मूळ कन्नड भाषेत असली तरी इतर प्रेक्षकांसाठी सबटायटल्सची उत्तम सोय आहे. सात भागांच्या या सिरीजचा पहिला भाग मोफत उपलब्ध आहे, जेणेकरून तुम्ही या सिरीजची ताकद अनुभवू शकाल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'दृश्यम'-'महाराजा' काहीच नाही, 'या' क्राईम थ्रिलरने OTT वर उडवलाय धुरळा, पाहून मेंदूला झिणझिण्या येतील! 9.6 आहे रेटिंग