Success Story : शेतकऱ्याने 65 दिवसांत करून दाखवलं, 5 लाख रुपयांचा निव्वळ मिळवला नफा, असं काय केलं?
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
तरुण शेतकरी अतुल घोडके यांनी कलिंगड लागवडीतून अवघ्या 65 दिवसांत 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावत यशस्वी प्रयोग केला आहे.
advertisement
1/7

शेतकरी शेतात नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती येथील तरुण शेतकरी अतुल घोडके यांनी कलिंगड लागवडीतून अवघ्या 65 दिवसांत 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावत यशस्वी प्रयोग केला आहे.
advertisement
2/7
सुशिक्षित तरुण नोकरीच्या शोधात शहराकडे वळत असताना अतुल यांनी शेतीतच भविष्य शोधण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा कलिंगड शेतीचा प्रयोग यशस्वी ठरला.
advertisement
3/7
बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नोकरीचा शोध घेतला. अपेक्षित नोकरी न मिळाल्याने त्यांनी निराश न होता बाजारपेठेचा अभ्यास केला.
advertisement
4/7
सध्या कलिंगडाला असलेली मागणी लक्षात घेऊन 7 डिसेंबर 2025 रोजी दोन एकर क्षेत्रात सिंबा जातीच्या कलिंगडाची लागवड केली. लागवडीसाठी सुमारे 2 लाख रुपयांचा खर्च आला.
advertisement
5/7
पिकावर भुरी, करपा आणि बोकड्या यांसारखे रोग टाळण्यासाठी दर दोन दिवसांनी फवारणी करत योग्य व्यवस्थापन करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञान, नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर चांगले उत्पादन मिळाले.
advertisement
6/7
सध्या बाजारात कलिंगडाला 25 ते 30 रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. खर्च वजा जाता 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती अतुल यांनी दिली आहे.
advertisement
7/7
शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून योग्य पिकाची निवड आणि नियोजन केल्यास शेतीही फायदेशीर ठरू शकते, असा आत्मविश्वास अतुल यांनी व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : शेतकऱ्याने 65 दिवसांत करून दाखवलं, 5 लाख रुपयांचा निव्वळ मिळवला नफा, असं काय केलं?