'महाभारत'ची 'द्रोपदी' 11 वर्ष लहान सिंगरच्या प्रेमात, नवऱ्याला सोडून राहिली लिव्ह-इनमध्ये, धोका मिळाल्यावर केलं असं काही की...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
पतीसोबतचा टोकाचा वाद, वारंवार फाडलेले घटस्फोटाचे कागद आणि त्यानंतर स्वतःपेक्षा ११ वर्षांनी लहान असलेल्या गायकाच्या प्रेमात पडणं... रूपा गांगुली यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे.
advertisement
1/11

बी. आर. चोप्रा यांच्या 'महाभारत' मालिकेत जेव्हा रूपा गांगुली यांनी 'द्रौपदी' साकारली, तेव्हा अख्खा देश त्यांच्या अभिनयाने भारावून गेला होता. पडद्यावर अन्यायाविरुद्ध लढणारी ही द्रौपदी खऱ्या आयुष्यात मात्र नात्यांच्या पेचात अडकली होती.
advertisement
2/11
रूपा गांगुली यांचं खासगी आयुष्य एखाद्या चित्रपटापेक्षा नाट्यमय होतं. पतीसोबतचा टोकाचा वाद, वारंवार फाडलेले घटस्फोटाचे कागद आणि त्यानंतर स्वतःपेक्षा ११ वर्षांनी लहान असलेल्या गायकाच्या प्रेमात पडणं... रूपा गांगुली यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे.
advertisement
3/11
१९९२ मध्ये रूपा गांगुली यांनी मेकॅनिकल इंजिनिअर ध्रुबो मुखर्जी यांच्याशी लग्न केलं. त्यांना आकाश नावाचा मुलगाही झाला. सुरुवातीची काही वर्ष सुखात गेली, पण २००२ नंतर या नात्यात मिठाचा खडा पडला.
advertisement
4/11
एका मुलाखतीत रूपा यांनी सांगितलं होतं की, "आमच्यात इतकी भांडणं व्हायची की मी घटस्फोटाचे कागद आणायचे, पण रागाच्या भरात ते फाडून फेकायचे. पुन्हा कागद आणायचे, पुन्हा फाडायचे. मी घटस्फोटाचा शब्द काढला की तो माफी मागायचा आणि आम्ही पुन्हा तडजोड करायचो."
advertisement
5/11
हा तडजोडीचा खेळ फार काळ टिकला नाही. रूपा यांच्या आयुष्यात बंगाली गायक दिब्येंदू मुखर्जी यांची एन्ट्री झाली. दिब्येंदू हे रूपा यांच्यापेक्षा ११ वर्षांनी लहान होते. जेव्हा रूपा यांनी ध्रुबो यांना आपल्या मनात दिब्येंदूसाठी असलेल्या भावना सांगितल्या, तेव्हा ध्रुबो यांना मोठा धक्का बसला.
advertisement
6/11
अखेर रूपा आपल्या मुलाला आणि पतीला सोडून मुंबईला निघून आल्या. ध्रुबो यांनी मुलाचा ताबा मिळवला आणि रूपा यांना मुलाला भेटण्यापासूनही रोखलं. विशेष म्हणजे, रूपा यांनी आपल्या पतीकडून पोटगीची कोणतीही मागणी केली नाही.
advertisement
7/11
मुंबईत आल्यानंतर रूपा आणि दिब्येंदू सुमारे साडेपाच वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले. त्याकाळी या नात्याची खूप चर्चा झाली. मात्र, दिब्येंदू यांना जेव्हा 'नंदिनी' चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली, तेव्हा हे नातं डळमळीत झालं. दिब्येंदू यांनी स्वतः कबूल केलं होतं की, वयातील अंतरामुळे त्यांच्यात ताळमेळ बसत नव्हता.
advertisement
8/11
दिब्येंदू म्हणाले होते, "मी २६ वर्षांचा होतो जेव्हा मी रूपा यांच्यासोबत राहायला लागलो. माझ्या आयुष्याकडून खूप अपेक्षा होत्या. मला पैसा कमवायचा होता, स्वतःचं कुटुंब सुरू करायचं होतं. पण आमच्या दोघांच्या प्राथमिकता खूप वेगळ्या होत्या." अखेर हे नातंही संपुष्टात आलं.
advertisement
9/11
आयुष्यातील या चढ-उतारांमुळे रूपा पूर्णपणे खचल्या होत्या. एका कार्यक्रमात त्यांनी मान्य केलं होतं की आयुष्यातील समस्यांमुळे त्यांनी तब्बल तीनवेळा आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. जीवनात पुरुषांबाबत आलेल्या अनुभवांमुळे त्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती.
advertisement
10/11
तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या टॅलेन्टला ढाल बनवलं आणि आयुष्यातील अनेक समस्यांवर मात केली. सिंगिंगसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, इतकंच नाही, तर त्यांच्या सिनेमांनी जागतिक पातळीवर डंका वाजवला.
advertisement
11/11
अभिनय सोडल्यानंतर रूपा यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. त्या भाजपच्या मोर्चा महिला अध्यक्ष राहिल्या होत्या आणि त्यांची राज्यसभेवरही वर्णी लागली होती. आज त्या बंगालच्या राजकारणात आणि सामाजिक सेवेत सक्रिय आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'महाभारत'ची 'द्रोपदी' 11 वर्ष लहान सिंगरच्या प्रेमात, नवऱ्याला सोडून राहिली लिव्ह-इनमध्ये, धोका मिळाल्यावर केलं असं काही की...