अरे देवा! ज्याची भीती होती तेच घडणार, 21 सप्टेंबरचे सूर्यग्रहण या 4 राशींवर संकट घेऊन येणार, मोठं नुकसान होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Surya Grahan 2025 : ७ सप्टेंबरला झालेले चंद्रग्रहण नुकतेच संपले असताना आता खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची घटना घडणार आहे. २०२५ सालचे शेवटचे सूर्यग्रहण २१ सप्टेंबर रोजी येत आहे.
advertisement
1/6

मुंबई - ७ सप्टेंबरला झालेले चंद्रग्रहण नुकतेच संपले असताना आता खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची घटना घडणार आहे. २०२५ सालचे शेवटचे सूर्यग्रहण २१ सप्टेंबर रोजी येत आहे. योगायोग असा की हा दिवस सर्वपित्री मोक्ष अमावस्येला म्हणजेच पितृपक्षाच्या अखेरच्या दिवशी येणार आहे. ग्रहण भारतात प्रत्यक्ष दिसणार नसले तरी ज्योतिषशास्त्रानुसार त्याचा परिणाम अनेक राशींवर जाणवणार आहे. विशेषतः ४ राशींना या ग्रहणाचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.
advertisement
2/6
सूर्यग्रहणाची पार्श्वभूमी -  वैदिक पंचांगानुसार हे ग्रहण रविवार, २१ सप्टेंबरला येईल. धार्मिक दृष्टिकोनातून भारतात याला विशेष महत्त्व मानले जाणार नाही, कारण ते येथे दृश्य होणार नाही. मात्र ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीमुळे त्याचा परिणाम व्यक्तींच्या राशींवर होणार आहे. तज्ज्ञांच्या मते या काळात मेष, कर्क, कन्या आणि मीन राशीच्या लोकांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.
advertisement
3/6
मेष राशी -  या राशीच्या व्यक्तींना सूर्यग्रहणाचा थेट परिणाम आर्थिक क्षेत्रात जाणवेल. अनपेक्षित नुकसान होण्याची शक्यता आहे. वारसा हक्काच्या मालमत्तेवरून वाद निर्माण होऊ शकतो. पती-पत्नीमधील नातेसंबंधात तणाव वाढेल. व्यवसायात नुकसान होऊन कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. याशिवाय काहींना कायदेशीर अडचणींनाही सामोरे जावे लागू शकते. या काळात धीराने आणि विचारपूर्वक निर्णय घेणे अत्यावश्यक ठरेल.
advertisement
4/6
कर्क राशी -  कर्क राशीच्या लोकांनी या काळात विशेष काळजी घ्यावी. धोकादायक कामांपासून दूर राहा आणि वाहन हळू व सावधगिरीने चालवा. कर्ज घेणे अथवा पैसे उधार देणे टाळावे. गुंतवणुकीसाठी हा काळ अजिबात योग्य नाही. प्रेमसंबंधात गुंतल्याने जीवनातील महत्त्वाचे ध्येय मागे राहू शकते. आर्थिक लाभाची संधी हातातून निसटू शकते. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा नातेसंबंध बिघडू शकतात.
advertisement
5/6
कन्या राशी - हे सूर्यग्रहण कन्या राशीत होत असल्यामुळे या राशीवर त्याचा सर्वाधिक परिणाम दिसेल. मानसिक तणाव, नैराश्य किंवा अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. वारंवार आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो. कायदेशीर बाबींमध्ये पराभवाची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ चिंताजनक आहे. सतत थकवा, मानसिक अस्वस्थता किंवा लहानशा आजारांपासून त्रास होऊ शकतो. या काळात शांत राहून संयम राखणे हाच सर्वोत्तम उपाय असेल.
advertisement
6/6
मीन राशी -  मीन राशीच्या व्यक्तींना या काळात काही अप्रिय बातमी मिळू शकते. कामकाज वेळेत पूर्ण न झाल्याने वरिष्ठ नाराज होऊ शकतात. बँक बॅलन्स घटेल आणि कुटुंबात अचानक एखाद्याच्या आरोग्याबाबत चिंता वाढेल. वाद टाळण्याचा प्रयत्न करा, कारण किरकोळ कारणावरून मोठे भांडण होऊ शकते. कोणतेही मोठे निर्णय घाईत घेणे टाळा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
अरे देवा! ज्याची भीती होती तेच घडणार, 21 सप्टेंबरचे सूर्यग्रहण या 4 राशींवर संकट घेऊन येणार, मोठं नुकसान होणार