२०२६ मध्ये या ५ राशींनी संकटांना सामोरे जायला तयार राहाच! मोठं नुकसान होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : 2026 चे नवीन वर्ष जसे जवळ येत आहे, तसे अनेक जण आपल्या भविष्याविषयी उत्सुकता व्यक्त करत आहेत. येणारे वर्ष कोणासाठी भाग्यवर्धक तर कोणासाठी आव्हानात्मक ठरणार? कोणाच्या करिअर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीत बदल होणार? ज्योतिषशास्त्रानुसार 2026 हे वर्ष काही राशींसाठी ‘गेमचेंजर’ ठरू शकते.
advertisement
1/6

2026 चे नवीन वर्ष जसे जवळ येत आहे, तसे अनेक जण आपल्या भविष्याविषयी उत्सुकता व्यक्त करत आहेत. येणारे वर्ष कोणासाठी भाग्यवर्धक तर कोणासाठी आव्हानात्मक ठरणार? कोणाच्या करिअर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीत बदल होणार? ज्योतिषशास्त्रानुसार 2026 हे वर्ष काही राशींसाठी ‘गेमचेंजर’ ठरू शकते. विशेष म्हणजे, शनि, राहू आणि केतू या तीन प्रमुख ग्रहांचे होणारे संक्रमण हे वर्ष ठरवणारे घटक मानले जात आहेत.
advertisement
2/6
मेष - 2026 मध्ये शनीच्या प्रभावामुळे मेष राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये काही मोठे अडथळे जाणवू शकतात. कामात विलंब, निर्णय घेण्यात गोंधळ आणि मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. राहू-केतूच्या बदलांमुळे नात्यात तणाव वाढू शकतो. आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागेल. वर्षाच्या मध्यापासून परिस्थितीत सुधारणा दिसेल, परंतु सावध राहणे आवश्यक आहे.
advertisement
3/6
कर्क - केतूच्या कर्क राशीत आगमनामुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात मानसिक अस्थिरता वाढू शकते. कुटुंबात गैरसमज, खर्चात वाढ आणि व्यवसायातील अडचणी जाणवू शकतात. आकस्मिक आर्थिक नुकसानाची शक्यता आहे. नोकरीत बदलाची वेळ येऊ शकते. या वर्षी पैसा साठवण्यावर आणि अनावश्यक निर्णय टाळण्यावर भर द्यावा.
advertisement
4/6
तूळ - शनीचे मीन राशीत भ्रमण आणि राहूचे कुंभ ते मकर भ्रमण या दोन ग्रहयोगांमुळे तूळ राशीच्या लोकांना कामात अडथळे, वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि ताण जाणवू शकतो. प्रयत्नांनंतरही अपेक्षित परिणाम न मिळाल्याने मनःस्थिति ढासळू शकते. संयम आणि सातत्य राखल्यास वर्षाच्या शेवटी परिस्थिती सुधारू लागेल.
advertisement
5/6
वृषभ - शनीचा प्रभाव वृषभ राशीसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. आरोग्याचे प्रश्न, कौटुंबिक वाद आणि भावनिक अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे. राहूच्या प्रभावामुळे खर्चाचा ताण जाणवेल. नोकरीत बदल किंवा अडथळे येऊ शकतात. आर्थिक नियोजन न केल्यास नुकसान होऊ शकते. घरातील वातावरण शांत ठेवण्यावर भर द्यावा.
advertisement
6/6
मकर - 2026 च्या अखेरीस राहू मकर राशीत प्रवेश करणार आहे. हा काळ मोठ्या बदलांचा असेल. नवीन संधी मिळतील, परंतु त्यासोबत जोखीमही वाढेल. चुकीच्या निर्णयांमुळे नुकसान होऊ शकते. करिअरमध्ये अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
२०२६ मध्ये या ५ राशींनी संकटांना सामोरे जायला तयार राहाच! मोठं नुकसान होणार