आज घटस्थापनेच्या दिवशीच देवीची कृपा! 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरू, श्रीमंतीचे दरवाजे खुले होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, उद्या म्हणजेच २२ सप्टेंबर २०२५ हा दिवस अत्यंत शुभ मानला जात आहे. कारण उद्यापासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होत आहे. देवीची आराधना आणि ग्रहांच्या महत्त्वाच्या संक्रमणामुळे अनेक राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे.
advertisement
1/6

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, उद्या म्हणजेच २२ सप्टेंबर २०२५ हा दिवस अत्यंत शुभ मानला जात आहे. कारण उद्यापासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होत आहे. देवीची आराधना आणि ग्रहांच्या महत्त्वाच्या संक्रमणामुळे अनेक राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. काही राशींसाठी हा दिवस विशेषतः भाग्यशाली तर काहींसाठी नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. पाहूया कोणत्या राशींसाठी उद्याचा दिवस लाभदायी असेल
advertisement
2/6
मेष : मेष राशीसाठी नवरात्रीचा पहिला दिवस अतिशय खास ठरणार आहे. नशिबाची साथ लाभेल आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले जातील. प्रवासाचे योग जुळतील आणि तो फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल तसेच धनवृद्धी होण्याची शक्यता आहे. सकारात्मक बदलांमुळे मन आनंदी राहील.
advertisement
3/6
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस खूप भाग्यशाली आहे. उत्पन्न वाढीच्या अनेक संधी मिळतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमले जाईल. व्यावसायिक क्षेत्रात विस्ताराची संधी मिळेल. नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी हा दिवस योग्य आहे.
advertisement
4/6
कर्क : कर्क राशीसाठी उद्या भाग्याची साथ राहील. भौतिक सुखसोयींचा लाभ घेता येईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. सुट्टीमुळे कुटुंबासोबत वेळ छान जाईल. एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहील आणि आत्मविश्वास वाढेल.
advertisement
5/6
सिंह : सिंह राशीच्या लोकांसाठी हा दिवस कार्यसिद्धीचा ठरेल. आत्मविश्वासात वाढ होईल आणि रेंगाळलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. कलात्मकतेला न्याय मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात रस निर्माण होईल. पूर्वीच्या अनुभवातून शिकण्याची संधी मिळेल.
advertisement
6/6
तूळ : तूळ राशीसाठी नवरात्रीचा पहिला दिवस अतिशय शुभ आहे. व्यावसायिक कामानिमित्त प्रवासाची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने अपूर्ण कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल आणि नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा निर्माण होईल. या काळात प्रगतीचा मार्ग खुला होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
आज घटस्थापनेच्या दिवशीच देवीची कृपा! 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरू, श्रीमंतीचे दरवाजे खुले होणार