TRENDING:

Astrology: खूप त्रासातही संयम राखला! या 5 राशींचे आता उजळणार नशीब; कष्टाला शनि-शुक्राची साथ

Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, September 02, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊ या.
advertisement
1/12
खूप त्रासातही संयम राखला! या 5 राशींचे आता उजळणार नशीब; कष्टाला शनि-शुक्राची साथ
मेष (Aries) : मंगळवारचा दिवस नवीन ऊर्जा आणि उत्साहानं भरलेला आहे. नवीन प्लॅन आणि कल्पनांमुळे तुमच्या कामाला नवी दिशा मिळेल. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. इतरांना तुमच्याकडून प्रेरणा मिळेल. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवल्यानं मानसिक शांती मिळेल. एखादा महत्त्वाच्या निर्णय घेताना घाई करू नका. सर्व पैलूंचा विचार करून निर्णय घ्या. जोडीदाराशी वेळ आनंदात जाईल. नात्यात गोडवा राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मकता आणि यशाकडे घेऊन जाणारा ठरेल. ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवा.Lucky Colour : MaroonLucky Number : 2
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : मंगळवारी आज अचानक तुमच्यासमोर काही समस्या येऊ शकतात. अशावेळी धीर धरा. परिस्थिती समजून घेऊन निर्णय घ्या. ऑफिसमध्ये सकारात्मक वातावरण राहील. परस्पर समंजसपणामुळे नातेसंबंध अधिक दृढ होतील, आरोग्याची काळजी घ्या. मानसिक शांती मिळेल. तुमची क्रिएटिव्हिटी आज दिसून येईल. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींना प्राधान्य द्या. आजचा दिवस समतोल साधण्यासाठी, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी उत्तम आहे.Lucky Colour : OrangeLucky Number : 7
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी उत्साहानं भरलेला असेल. सामाजिक संबंध सुधारतील. वेगवेगळ्या कल्पनांची देवाणघेवाण करता येईल. तुमचे विचार स्पष्टपणे आणि आत्मविश्वासानं व्यक्त करा. आज जवळच्या मित्रांचा किंवा कुटुंबातील सदस्याचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. व्यावसायिक जीवनात तुमची क्रिएटिव्हिटी दिसून येईल. आरोग्याच्या दृष्टिनं मानसिक ताण कमी करण्यासाठी योग आणि ध्यानाचा अवलंब करा. उत्साह वाढेल. आज तुम्हाला अनेक संधी येतील. त्यातील योग्य संधी ओळखून ती स्वीकारा, फायद्याचं ठरेल. नवीन गोष्टी शिकण्यापासून मागे हटू नका. उत्साह कायम राहील, यासाठी प्रयत्न करा.Lucky Colour : YellowLucky Number : 11
advertisement
4/12
कर्क (Cancer) : मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. कुटुंब आणि जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवल्यानं आनंदात दिवस जाईल. एखादा प्रोजेक्ट करताना सहकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची राहील. करिअर नवीन उंचीवर जाईल. त्यासाठी योग्य वेळ आहे. आरोग्याच्या दृष्टिनं काळजी घ्या. आज तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. तुमची संवेदनशीलता तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. आंतरिक भावना समजून घेऊन दैनंदिन जीवन संतुलित राहील, याची काळजी घ्या.Lucky Colour : WhiteLucky Number : 12
advertisement
5/12
सिंह (Leo) : मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी उत्साहानं आणि सकारात्मकतेनं भरलेला आहे. मित्रांसोबत वेळ घालवल्यानं तुमचा मूड चांगला होईल. ऑफिसमध्ये नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. परंतु तुमची नेतृत्व क्षमता आणि दृढनिश्चय तुम्हाला आव्हानांवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरेल. यश मिळेल. आर्थिक बाबतीत चांगले निर्णय घ्या. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आणि प्रगतीकडे घेऊन जाणारा आहे. फक्त तुमचा आत्मविश्वास कायम ठेवून परिस्थितीला उत्साहानं सामोरं जा.Lucky Colour : Navy BlueLucky Number : 8
advertisement
6/12
कन्या (Virgo) : मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आहे. ऑफिसमध्ये काम करताना उत्साह जाणवेल. अपूर्ण राहिलेली कामे मार्गी लागतील. व्यायाम सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे. मानसिक शांतीसाठी फायदेशीर ठरेल. नवीन नातेसंबंध निर्माण होतील. मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवल्यानं तुम्हाला आनंद मिळेल. एखाद्या खास व्यक्तीशी भेट होऊ शकते. जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधल्यानं मन ताजेतवानं होईल. वेळेचा योग्य वापर करा. विचार सकारात्मक ठेवा. कष्टाचं फळ मिळेल.Lucky Colour : RedLucky Number : 1
advertisement
7/12
तूळ (Libra) : मंगळवार दिवस तुमच्यासाठी आनंददायी आणि समाधानी आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्यानं आनंद मिळेल. ऑफिसमध्ये काम करताना कठोर परिश्रम करा. कष्टाचं फळ मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. अविचारी गुंतवणूक टाळा. तुमची क्रिएटिव्हिटी आज दिसून येईल. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी उत्तम काळ आहे. मानसिक थकवा टाळण्यासाठी विश्रांती घ्या. ध्यान आणि योगाला प्राधान्य दिल्यानं मानसिक शांती मिळेल. आजूबाजूच्या व्यक्तींचा सल्ला ऐकणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. शांतता राखा. इतरांशी सुसंवाद ठेवा, फायद्याचं ठरेल.Lucky Colour : BlackLucky Number : 6
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी परिवर्तनाचा दिवस ठरेल. विश्वासानं परिस्थितीला सामोरं जा. प्रेरणा मिळेल. तुम्ही तुमच्या ध्येयांबद्दल अधिक उत्साही राहाल. आज महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ आहे. आरोग्याच्या दृष्टिनं ध्यान आणि योगामुळे मानसिक शांती मिळेल. जोडीदारासोबत वेळ घालवणं फायद्याचं ठरेल. जोडीदाराशी संवाद साधताना तुमच्या मनातील भावना व्यक्त करा. तुमचं नातं अधिक दृढ होण्यास मदत होईल. कौटुंबिक दृष्टिकोनातून कुटुंबातील सदस्यांसोबत असणारे गैरसमज दूर करण्यासाठी आज उत्तम वेळ आहे. हुशारीनं गुंतवणूक करा. आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन सुरुवातीचे संकेत देणारा आहे. आत्मविश्वास कायम ठेवा.Lucky Colour : BlueLucky Number : 10
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : आज मंगळवारचा दिवस आपल्यासाठी नवीन संधी आणेल. तुमची ऊर्जा आणि उत्साह आजूबाजूच्या व्यक्तींना प्रेरणा देईल. नवीन प्रोजेक्टवर काम करताना आत्मविश्वासानं पुढं जा. सामाजिक संबंध दृढ करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवा, मनोबल उंचावेल. व्यवसायाच्या क्षेत्रात तुमची क्रिएटिव्हिटी दिसून येईल. तणाव टाळण्यासाठी नियमित व्यायाम करा. विश्रांतीला प्राधान्य द्या. आत्मविश्वास कायम ठेवा. सकारात्मकता तुम्हाला यशाकडे नेईल. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या ध्येयांसाठी वचनबद्ध राहा.Lucky Colour : GreenLucky Number : 3
advertisement
10/12
मकर (Capricorn) : आज मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी खूप सकारात्मक आहे. कष्टाचं फळ मिळेल. आज जोडीदाराला वेळ द्या, फायद्याचं ठरेल. आज तुमचे विचार आणि भावना व्यक्त करण्यास अजिबात संकोच करू नका. आरोग्याच्या दृष्टिनं किरकोळ समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. पण फार काळजी करू नका. ध्यान आणि योगासनं करून तुम्ही तुमचं मानसिक संतुलन राखू शकता. आज तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. सकारात्मक विचारानं पुढं जा. यश मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येणारा आहे.Lucky Colour : Navy BlueLucky Number : 8
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : आज मंगळवारी तुम्हाला विविध संधी येतील. तुमची क्रिएटिव्हिटी आज दिसून येईल. तुमच्या मनात येणाऱ्या कल्पना तुमच्या वैयक्तिक आयुष्यातच नव्हे तर तुमच्या ऑफिसमध्येही सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. तुमची विचार करण्याची क्षमता, विश्लेषणात्मक क्षमता इतरांना प्रेरित करेल. आरोग्याची काळजी घ्या. कामाचं योग्य नियोजन करा. पुरेशी विश्रांती घ्या. ध्यान आणि योगाचा सराव केल्यानं तुमचे मानसिक संतुलन राखले जाईल. आज स्वप्नांकडे वाटचाल कराल. स्वतःवर विश्वास ठेवा, फायद्याचं ठरेल.Lucky Colour : WhiteLucky Number : 12
advertisement
12/12
मीन (Pisces) : आज मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी विविध संधी घेऊन येणारा ठरेल. हा काळ आत्मचिंतन आणि ध्यानासाठी योग्य आहे. मैत्रीचं नातंही घट्ट होईल. आर्थिक दृष्टिकोनातून सावध राहा. खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबतीत योग्य निर्णय घ्या. हा काळ गुंतवणुकीसाठी योग्य आहे. परंतु विचारपूर्वक गुंतवणूक करा. आरोग्याच्या दृष्टिनं स्वतःची काळजी घ्या. पुरेशी विश्रांती घ्या. योग्य आहाराची काळजी घ्या. योग आणि ध्यान तुमचं मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करेल. आज सकारात्मक विचारांना प्राधान्य द्या. आयुष्यातील छोट्या क्षणांचा आनंद घ्या. त्यासाठी योग्य वेळ आहे.Lucky Colour : Dark GreenLucky Number : 5
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: खूप त्रासातही संयम राखला! या 5 राशींचे आता उजळणार नशीब; कष्टाला शनि-शुक्राची साथ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल