Today Rashibhvishya: गुरू-चंद्र गजकेसरी योग बनेल, या राशींचे आज भाग्य फळफळेल
- Published by:Ramesh Patil
- Written by:Rutuparna Mujumdar
Last Updated:
Today Rashibhvishya: आज दिनांक 04 डिसेंबर 2023, सोमवार. आज कार्तिक कृष्ण सप्तमी. चंद्र आज सिंह राशीत भ्रमण करेल. गुरू चंद्र गजकेसरी योग बनेल. ईश्वर चरणी वंदन करून आजचा दिवस कसा जाईल बघुया.
advertisement
1/12

मेष - आज पंचम स्थानात चंद्र आहे. संतती सुख लाभेल. सार्वजनिक कार्यात भाग घ्याल. तसेच राशीस्थानातील गुरू प्रतिष्ठा वाढवेल. जीवनात गोडी निर्माण करेल. वैवाहिक सुखाचा दिवस.
advertisement
2/12
वृषभ - घरात महत्त्वाचे निर्णय घ्याल. चतुर्थ स्थानातील चंद्र गुरू योग सामाजिक संपर्क घडवेल. आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मध्यम फळ देईल. मंगल कार्याला शुभ संकेत देत आहे. वैवाहिक जीवन बरे जाईल. दिवस शुभ.
advertisement
3/12
मिथुन - तृतीय स्थानातील चंद्राचे भ्रमण नोकरीच्या ठिकाणी उत्तम लाभ देईल. संततीसुख मिळेल. तसेच वैवाहिकदृष्ट्या उत्तम दिवस असून आज गुंतवणूक करा. प्रवास योग आहे. दिवस उत्तम.
advertisement
4/12
कर्क - चंद्र भ्रमण द्वितीय स्थानातून होत आहे. घरामध्ये पाहुणे येतील. आर्थिकदृष्टया बरा दिवस. जास्त काळ कार्यात घालवाल. प्रकृतीला जपा. रवि सामाजिक लाभ देईल. दिवस शुभ.
advertisement
5/12
सिंह - आज राशी स्वामी रवि चतुर्थ स्थानात आहे. अधिकारी व्यक्तींशी संबंध येईल. चंद्र-गुरू योग भाग्य स्थानात सामाजिक क्षेत्रात आणि आर्थिकदृष्ट्या विशेष घटना घडवेल, लाभ होतील. धार्मिक स्थळांना भेट असा योग आणेल. दिवस मध्यम.
advertisement
6/12
कन्या - तृतीय स्थानात प्रवेश केलेला मंगळ व व्यय चंद्र कौटुंबिक आणि आर्थिकदृष्ट्या अचानक फळ देईल. खर्च वाढ करेल. वैवाहिक जीवन बरे राहील. जोडीने घरासाठी खरेदी कराल. अष्टमातील गुरू प्रकृती जपा असे सांगत आहे. दिवस बरा.
advertisement
7/12
तूळ - धनस्थानात मंगळ आर्थिक, नोकरी संबंधी अडचणी आणेल. कुटुंबाचे सुख मिळेल. सामाजिक घटना घडतील. चंद्र गुरू योग आनंद निर्माण करेल. शनी संततीकडे लक्ष द्या, असे सांगत आहे. दिवस उत्तम.
advertisement
8/12
वृश्चिक - चंद्र व्यावसायिक, मानसिक, आर्थिक लाभ देईल. रवि संतती आणि शिक्षण यासाठी उत्तम आहे. प्रवास जपून करा. परिस्थितीचे भान ठेवा. घरामध्ये जास्ती काम पडेल. नोकरीमध्ये संधी, वैवाहिकदृष्ट्या दिवस मध्यम.
advertisement
9/12
धनू - आर्थिक बाजू समाधानी असेल तर मन आनंदी राहील. व्यय मंगळ भ्रमण खर्चिक अनुभव देईल. जोडीदार आणि मित्रमंडळी सोबत कलह होईल. संततीची काळजी घ्या. दिवस मध्यम.
advertisement
10/12
मकर - रवि धर्म आणि संस्कृतीबद्दल आस्था देईल. जोडीदाराला यश देईल. पोटाची काळजी घ्या. मातृ-पितृ चिंता निर्माण होईल. तसेच वरिष्ठांशी मतभेद संभवतात. आज अष्टम चंद्र जीवनाची दिशा निश्चित करेल. प्रवास संभवतात. दिवस कामकाज करण्यात घालवाल.
advertisement
11/12
कुंभ - सप्तम स्थानातील चंद्र कुटुंबविषयी समाचार देईल. आर्थिक लाभ होईल. सरकार दरबारी असलेली कामे होतील. राशी स्थानातील शनी मानसिक विरक्त वृत्तीचा अनुभव देईल. ईश्वर कृपेने दिवस बरा जाईल.
advertisement
12/12
मीन - चंद्र जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या, असे सांगत आहे. सरकारी कामे, वरिष्ठ भेट होईल. अष्टम केतू कमरेचे त्रास निर्माण करील. चंद्र सामाजिक, व्यावसायिक जीवनात लाभ देईल. गृहसौख्य मिळेल. आर्थिकदृष्ट्या दिवस शुभ.शुभम भवतू !!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Today Rashibhvishya: गुरू-चंद्र गजकेसरी योग बनेल, या राशींचे आज भाग्य फळफळेल