Today Rashifal: मृग नक्षत्रात या राशींना मिळणार नशीबाची साथ; 22 जानेवारीचा दिवस लकी ठरणार
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Chirag
Last Updated:
Today Rashibhvishya: कसा असेल आजचा दिवस, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. पहा आजचं दैनिक राशीभविष्य (22 जानेवारी 2024)..
advertisement
1/12

मेष (Aries) : आजचा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी व्यग्रतेचा असणार आहे. तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवण्याकरता आणि नव्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यामध्ये आज तुम्ही व्यग्र राहाल. आज तुम्हाला कुटुंबियांचा आधार मिळाल्यामुळे तुमच्या समस्या सहजपणे सोडवू शकाल. आज तुम्हाला तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल, कारण यामुळे इतरांना आदर आणि सन्मान मिळेल. आज तुमच्या काही दबलेल्या इच्छा पूर्ण होतील, त्यामुळे तुम्ही आनंदी असाल.Lucky Color : Mustard Lucky Number : 10
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : तुमचा आजचा दिवस खर्चिक असणार आहे. वाढत्या खर्चांमुळे तुम्ही त्रासलेले राहाल. कुटुंबियांशी असलेलं तुमचं वागणंही त्यामुळे बदलेल, त्यामुळे तेही तुमच्यावर नाराज असतील. त्यामुळे तुम्हाला वाढते खर्च थांबवावे लागतील, नाहीतर तुमची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्ही सक्रिय राहाल, पण तुम्हाला तुमचं वागणं बदलावं लागेल, तेव्हाच तुम्ही कोणाकडून तुमचं काम करवून घेण्यात यशस्वी व्हाल. आज तुम्हाला तुमचा जुना मित्र बऱ्याच काळानंतर भेटण्याची शक्यता आहे. तुम्हालाही त्याचा आनंद होईल.Lucky Color : Cream Lucky Number : 1
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : आज तुमच्यासाठी थोडाफार समाधानकारक दिवस असेल. आज तुम्ही व्यवसायाकरता दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला ते सहज मिळेल. यामुळे व्यवसायात येणाऱ्या अडचणी सुटतील, पण तुम्ही व्यवसायात येणाऱ्या अडचणींविषयी कोणाचा सल्ला घ्यायचा विचार करत असाल तर अनुभवी व्यक्तीचाच घ्या. आज तुम्ही वडिलधाऱ्यांच्या, पालकांच्या आशीर्वादानं जे काम कराल, त्यात यशच मिळेल. आज तुम्ही तुमचा मुलगा समाजकार्य करत असलेलं पाहून आनंदी व्हाल.Lucky Color : Magenta Lucky Number : 11
advertisement
4/12
कर्क (Cancer) : आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. कामाच्या ठिकाणी आज कदाचित तुम्हाला काही आव्हानांना सामोरं जावं लागेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर काही काम सोपवलं जाईल, त्याकरता तुमच्या सहकाऱ्यांचं सहकार्य आवश्यक असेल. तसं झालं तरच तुम्ही ते पूर्ण करू शकाल. त्याचवेळी तुम्ही आरोग्याबाबतही जागरूक असलं पाहिजे कारण आज तुम्हाला काही आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. बराच काळ तुम्ही एखाद्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत असाल, पण आज तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका. नाहीतर भविष्यात त्यातून मोठा आजार बळावेल.Lucky Color : Orange Lucky Number : 5
advertisement
5/12
सिंह (Leo) : आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा असेल. नोकरदार व्यक्ती काही कामगिरी करू शकतील, त्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार उरणार नाही. आज तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याबाबत जागरूक असावं लागेल, नाहीतर एखाद्या वाईट संगतीचा तो/ती बळी ठरू शकेल. व्यवसाय करणाऱ्यांनी कोणत्याही व्यवसायात पैसा गुंतवण्याआधी सावधगिरी बाळगावी, व्यवसाय करण्यासाठी काळ अनुकूल नाही. त्यामुळे थोडा काळ थांबा. आज वैवाहिक जीवनात चांगले अनुभव येतील. संध्याकाळी तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल.Lucky Color : Yellow Lucky Number : 7
advertisement
6/12
कन्या (Virgo) : आजचा दिवस तुमच्यासाठी प्रचंड कष्टाचा असेल. व्यवसायात भरपूर नफा मिळवण्याकरता तुम्ही व्यग्र राहाल, त्यामुळे पुढे जाण्याकरता प्रयत्न करा. तुमच्या सासू-सासऱ्यांकडून काही फायदा होईल. दिवसातला काही वेळ तुम्ही जोडीदारासोबत एकांतात घालवाल आणि त्यांना खरेदीलाही घेऊन जाल. विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून काही मदत मागितली असेल, तर आज त्यांना ती मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा आज वाढेल. तुमच्या एखाद्या मित्रासाठी तुम्हाला नवीन नोकरी सापडेल.Lucky Color : charcoal Lucky Number : 3
advertisement
7/12
तूळ (Libra) : आजचा दिवस तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित परिणाम देणारा असेल. कारण आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील आणि कदाचित तुमच्यावर तुमच्या आवडीचं काम सोपवतील. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांची इच्छा असेल, तर आज ते त्याकरता अर्ज करू शकतात. तुमच्या वडिलांचा सल्ला घेऊन भविष्याकरता थोडे पैसे गुंतवणं आज तुमच्यासाठी योग्य ठरेल. आज तुमच्या घरात पूजा, उपासना, भजन, कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम घडतील. मुलाच्या वागणुकीमुळे आज तुम्हाला तुमच्या घरातल्या एखाद्याकडून कठोर शब्द ऐकून घ्यावे लागतील.Lucky Color : Red Lucky Number : 16
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे आजचा दिवस तुम्ही आनंदात घालवाल. आज तुमचं मूल तुम्हाला काही महागडी वस्तू मागू शकतं आणि तुम्हालाही ते मान्य करावं लागू शकतं. आज तुम्हाला इच्छा नसूनही काही खर्च करावा लागू शकतो, पण तुमची कुटुंबियांशी काही चर्चा झाली असेल, तर आज तुम्हाला कुटुंबात सुसंवाद साधण्याकरता प्रयत्न करावे लागतील. तसं झालं तरच तुम्ही कुटुंबातले वादविवाद थांबवू शकाल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या आईला चालायला घेऊन जाऊ शकता.Lucky Color : White Lucky Number : 17
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : आजचा दिवस तुम्ही धाकट्या भावंडांसोबत मजा करण्यात घालवाल. आज तुम्ही अशा काही परिस्थितींचा सामना कराल, ज्यातून तुम्हाला शिकायला मिळेल, पण तुम्हाला त्रास होईल अशी कोणतीही परिस्थिती उद्भवणार नाही, याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. त्यासाठी तुम्ही आजूबाजूच्या व्यक्तींबाबत सावध असायला पाहिजे. शेजाऱ्यांमध्ये काही भांडण झालं असेल, तर शांत राहणं तुमच्याकरता योग्य असेल. आज तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला आर्थिक मदत मिळेल. विद्यार्थ्यांची शिक्षणात येणाऱ्या समस्यांपासून थोडी सुटका होईल.Lucky Color : Violet Lucky Number : 11
advertisement
10/12
मकर (Capricorn) : आज तुमच्या संपत्तीत वाढ होईल, कारण तुम्हाला वारसाहक्कानं मालमत्ता मिळेल. मालमत्तेबाबत काही कायदेशीर प्रकरण सुरू असेल, तर आज त्यात तुम्हाला यश मिळेल. त्यामुळेही तुमची संपत्ती वाढेल. प्रियकराच्या वागणुकीमुळे प्रेमात पडलेल्या व्यक्तींना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे दोघांमध्ये वाद उद्भवू शकतो. एखाद्याला मित्र किंवा मैत्रीण म्हणून तुमच्या मनातल्या भावना सांगताना सावध राहा, कारण कदाचित ती मैत्री नसून ते तुमचे शत्रू असू शकतात.Lucky Color : Maroon Lucky Number : 18
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. तुम्ही बराच काळ वाट पाहत असलेली एखादी चांगली बातमी तुम्हाला जोडीदाराकडून मिळू शकते. तुम्ही मानसिक ताण अनुभवत असाल, तर त्यातूनही तुम्ही आज बाहेर पडाल. व्यवसाय करणाऱ्यांनी आज कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी सावध राहिलं पाहिजे. कारण आज कोणी त्याचा गैरफायदा घेऊ शकतो. तुमच्या मुलांच्या समस्या ऐकून घेण्यात आज तुम्ही वेळ घालवाल.Lucky Color : Pink Lucky Number : 12
advertisement
12/12
मीन (Pisces) : परदेशी कंपनीमध्ये नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्यांना आज चांगला दिवस असेल. कारण त्यांची ती इच्छा आज पूर्ण होईल. यामुळे त्यांना आनंद होईल, पण पुढे जाण्याकरता नेमक्या अधिकाऱ्याला शोधून त्यानं सांगितलेल्या मार्गावर चालावं लागेल. तसं केलं, तरच त्याचा फायदा होईल. पैशांबाबतच्या व्यवहारामध्ये आज काळजी घ्यावी लागेल, नाहीतर त्याचा पश्चात्ताप होईल. राजकारणाच्या दिशेनं जे प्रयत्न करत असतील, त्यांना आज निराशा हाती येईल. वडिलांशी भविष्याविषयीच्या योजनांबाबत चर्चा करण्यात आजची संध्याकाळ घालवाल.Lucky Color : Olive Lucky Number : 3
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Today Rashifal: मृग नक्षत्रात या राशींना मिळणार नशीबाची साथ; 22 जानेवारीचा दिवस लकी ठरणार