TRENDING:

Astrology: इतका त्रास सोसलाय! आता या राशींना लक साथ देणार; मंगळ-गुरूचा वरदहस्त

Last Updated:
Daily Horoscope Marathi : मेष राशीला सकारात्मकता जाणवेल. वृषभ राशीच्या व्यक्तींना नवीन संधी मिळू शकते. मिथुन राशीच्या व्यक्तींनी सर्जनशील कामास सुरूवात करावी. कर्क राशीला आर्थिक बाबतीत सकारात्मक संकेत मिळू शकतात. सिंह राशीच्या व्यक्तींनी कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवला तर त्यांना समाधान मिळेल. कन्या राशीच्या नोकरदारांच्या प्रयत्नांचे कौतुक होईल. तूळ राशीला जुने प्रश्न सोडवण्याची संधी मिळू शकते. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी मानसिक शांती आणि ऊर्जा वाढवण्यासाठी योग किंवा ध्यानधारणा करावी. धनू राशीला ऑफिसमध्ये थोडे कष्ट घ्यावे लागतील. मकर राशीच्या व्यक्तींनी मनःशांतीसाठी योगासनं किंवा ध्यानधारणा करावी. कुंभ राशीला करिअरमध्ये नवीन जबाबदारी किंवा प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या व्यक्तींनी आर्थिक बाबतीत सतर्क राहावं.
advertisement
1/12
इतका त्रास सोसलाय! आता या राशींना लक साथ देणार; मंगळ-गुरूचा वरदहस्त
मेष (Aries) : दिवस उत्साह वाढवणारा तसेच नवीन शक्यतांचा असेल. तुम्ही उत्साही आणि सकारात्मक असाल. त्याचा परिणाम तुमच्या आसपास असलेल्या व्यक्तींवर देखील होईल. विचार स्पष्टपणे मांडा. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांना सहकार्य करा. तुमचा मनमोकळेपणा नवीन भागीदारीसाठी फायदेशीर ठरू शकतो. नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. त्यामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल. नवीन नातं सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. आरोग्य सामान्य असेल. थोडी शारीरिक हालचाल केली तरी उत्साह वाढेल. दिनचर्येत योग किंवा व्यायामाचा समावेश करा. तुम्ही खूप सकारात्मक असाल. कामात आणि नातेसंबंधांत देखील सकारात्मकता जाणवेल. आत्मविश्वासाने पुढे जा आणि ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करा.Lucky Color : RedLucky Number : 7
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : दिवस समर्पण आणि आत्मपरीक्षणाचा आहे. तुम्हाला तुमच्या मनातील भावना आणि इच्छांची जाणीव होईल. महत्त्वाचे निर्णय घेण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. नवीन संधीसाठी तयार रहा. व्यावसायिक वाटचालीत सकारात्मक बदल दिसू शकतात. प्रियजनांसोबत वेळ घालवा. त्यांच्याशी नातं घट्ट करण्यासाठी आणि सहकार्य वाढवण्यासाठी दिवस चांगला आहे. तुमची ऊर्जा आणि सकारात्मकता आसपासच्या व्यक्तींना प्रेरणा देईल. त्यामुळे मोकळेपणाने व्यक्त व्हा. आरोग्यासाठी ध्यानधारणा आणि योगावर लक्ष केंद्रित करा. मानसिक आरोग्याची काळजी घ्या. सकारात्मक विचार जोपासा. स्वतःची काळजी घेण्यासाठी या वेळेचा वापर करा. सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी वेळ काढा. नवीन ओळखी करा. नवीन मैत्री आणि सहकार्यासाठी दिवस चांगला आहे. नवीन शक्यतांकडे वाटचाल करा. आत्मविश्वासाने पुढे जा.Lucky Color : BlueLucky Number : 3
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : दिवस रोमांचक असेल. ऊर्जा आणि सर्जनशीलता चांगली असेल. त्यामुळे कामात चांगला बदल दिसेल. सामाजिक संपर्क वाढेल. त्यामुळे नवीन मैत्री आणि नातेसंबंध विकसित होतील. संवादकौशल्य चांगले असेल. तुमचे संभाषण परिणामकारक ठरेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात स्पष्टता ठेवा. महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी सर्वांगीण विचार करा. आरोग्याची काळजी घ्या. जास्त शारीरिक हालचाली टाळाव्यात. सकारात्मक विचार आणि संयम ठेवला तर दिवसाचा पुरेपूर फायदा घेऊ शकाल. सर्जनशील कार्यात हात आजमवण्यासाठी दिवस चांगला आहे. उत्सुकता वाढल्याने नवीन गोष्टी शिकण्यास आणि अनुभव घेण्यास प्रेरणा मिळेल. दिवस आनंदी आणि सक्रियता वाढवणारा असेल.Lucky Color : WhiteLucky Number : 11
advertisement
4/12
कर्क (Cancer) : दिवस संमिश्र आहे. ऑफिसमध्ये आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. पण आत्मविश्वास कायम ठेवा. ऐकून घेण्याचे कौशल्य वापरले तर सहकाऱ्यांशी चांगला संवाद साधू शकाल. वैयक्तिक संबंधात चढ-उतार होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना सावधगिरी बाळगा. कारण लहान गोष्टी मोठ्या होऊ शकतात. संयम ठेवा आणि कुटुंबियांच्या भावना समजून घ्या. आरोग्य चांगले राहील. पण आराम करण्यासाठी थोडा वेळ काढा. योग किंवा ध्यानधारणा केल्याने तुमचे मानसिक आरोग्य सुधारेल. आर्थिक बाबतीत सकारात्मक संकेत मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. दिवस नवीन गोष्टी शिकण्याची आणि विकासाची संधी देईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवत संधी ओळखा.Lucky Color : PinkLucky Number : 9
advertisement
5/12
सिंह (Leo) : नवीन शक्यता दृष्टीक्षेपात येतील. ऊर्जा आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आव्हानांचा सामना करण्यास तयार असाल. आसपासच्या व्यक्तींना तुमची सकारात्मक जाणवेल आणि ते तुम्हाला प्रोत्साहन देतील. ऑफिसमध्ये नवीन कल्पना किंवा नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते. कल्पना व्यक्त करण्यास संकोच करू नका. तुमच्या शब्दांना वजन असेल. लोक तुमच्या मताचा आदर करतील. वैयक्तिक जीवनात कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्यास समाधान मिळेल. त्यांच्या सहवासात तुम्हाला आनंद मिळेल. आरोग्यविषयक किरकोळ समस्या त्रासदायक ठरू शकतात. दिनचर्येत योग आणि व्यायामाचा समावेश करा. ध्यानधारणा केल्यास मानसिक शांती मिळेल. स्वप्नपूर्तीसाठी योग्य दिशेने वाटचाल करा. संयम कायम ठेवा. लोक तुमच्या विचाराने प्रभावित होतील. आनंदी राहा.Lucky Color : RedLucky Number : 18 
advertisement
6/12
कन्या (Virgo) : दिवस शुभ आहे. मेहनत आणि समर्पणाचे फळ मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल. त्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल. सामाजिक जीवनात नवीन ओळखी होतील. भविष्यात या व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. आरोग्याबाबत सावध रहा. मानसिक शांतीसाठी योगा किंवा ध्यानधारणा करा. आर्थिक खर्च वाढू शकतो. विचारपूर्वक पैसे खर्च करा. नात्यात प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. नवीन गोष्टी केल्यास किंवा छंद जोपासल्यास तुमची सकारात्मक वाढेल. विचार स्पष्टपणे व्यक्त करा. शंका न घेता पुढे वाटचाल करा. दिवस समाधान देणारा आणि प्रगतीचा असेल.Lucky Color : OrangeLucky Number : 12
advertisement
7/12
तूळ (Libra) : दिवस संतुलित आणि सकारात्मक असेल. तुमचे विचार आणि भावना स्पष्ट असतील. त्यामुळे तुम्ही ध्येयाकडे वाटचाल करू शकाल. करिअरमध्ये नवीन शक्यता दृष्टिपथात येतील. नवीन कल्पना आणि योजना शेअर करा. वैयक्तिक जीवनात संवाद कौशल्य वापरा. जोडीदार किंवा कुटुंबियांशी संवाद साधताना धीर धरा. समोरच्या व्यक्तीचं बोलणं समजून घ्या. जुन्या समस्येचं निराकरण करण्याची संधी मिळाल्याने संबंध सुधारतील. संध्याकाळी योग किंवा ध्यानधारणा करणं फायदेशीर ठरेल. त्यामुळे मानसिक शांती आणि समतोल साधता येऊ शकेल. सहकार्य आणि सुसंवादाची भावना महत्त्वाची असेल. सकारात्मक विचार करा आणि हेतुंवर ठाम रहा.Lucky Color : GrayLucky Number : 2
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : दिवस महत्त्वाचा असेल. ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढल्याने ध्येयाच्या दिशेने वाटचाल करू शकाल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी संबंध सुधारतील. टीमवर्कमध्ये तुम्ही चांगले काम करू शकाल. निर्णय क्षमता आणि स्पष्टतेच्या जोरावर अनेक समस्या सोडवाल. आर्थिक सुधारणा होऊ शकते. त्यामुळे आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या. वैयक्तिक संबंध सुधारतील. प्रियजनांसोबत वेळ घालवल्याने आनंद आणि समाधान मिळेल. सर्जनशील उपक्रमांत सहभागी झाल्यास तुमचा उत्साह वाढेल. आरोग्यासाठी थोडा वेळ द्या. योग किंवा ध्यानधारणा केल्याने मानसिक शांती आणि ऊर्जा वाढेल. दिवस सकारात्मक आणि प्रेरणादायी असेल. आत्मविश्वास कायम ठेवा. नवीन संधीचा लाभ घेण्यासाठी तयार रहा.Lucky Color : PeachLucky Number : 4
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : दिवस नवीन आव्हाने आणि संधीचा असेल. सर्जनशीलता आणि सकारात्मक विचारसरणीच्या जोरावर प्रसंगांना सामोरे जा. आत्मविश्वास बाळगा. जे काही करत आहात त्यावर लक्ष केंद्रित करा. वैयक्तिक जीवनात सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी दिवस चांगला आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्यास आनंद मिळेल. जुन्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असाल तर संवाद आणि समजुतीतून यश मिळेल. कार्यक्षेत्रात कष्ट घ्यावे लागतील. मेहनतीचे फळ मिळेल. नवीन कल्पना आणि योजनांवर लक्ष केंद्रित करा. यामुळे ध्येय साध्य करू शकाल. आरोग्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करा. मानसिक आरोग्याची काळजी घ्या. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. ध्यानधारणा किंवा योगासने करा. दिवस नवीन संधी आणि सकारात्मक अनुभव देणारा आहे. आत्मपरीक्षण करत ध्येयाकडे वाटचाल करा.Lucky Color : Navy BlueLucky Number : 17
advertisement
10/12
मकर (Capricorn) : दिवस नवीन संधी देणारा आहे. ऑफिसमध्ये सकारात्मक बदल दिसू शकतात. एखाद्या कामावर दीर्घकाळ मेहनत घेत असाल तर त्याचे फळ आता मिळू शकते. तुमच्या कल्पना मोकळेपणाने व्यक्त केल्यास सहकाऱ्यांसोबतचे संबंध घट्ट होतील. वैयक्तिक जीवनात कुटुंबातील सदस्य तुमच्याशी मनमोकळा संवाद साधतील. एकमेकांच्या कल्पना समजून घ्या. जुन्या समस्येवर विचार करण्याची संधी मिळाल्याने तुमच्या दोघांतील अंतर कमी होईल. पैसे मिळू शकतात. योग्य निर्णय घेतल्यास आर्थिक फायदा होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. आरोग्यासाठी संतुलित आहार घ्या. नियमित व्यायाम करा. मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा किंवा योगाभ्यास करा. दिवस सकारात्मक आणि विकासाचा असू शकतो. ध्येयावर लक्ष केंद्रित करत पुढे वाटचाल करा.Lucky Color : YellowLucky Number : 11
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. विचार आणि कल्पना मांडण्यास उत्सुक असाल. सामाजिक कार्य आणि नवीन मित्र जोडण्यासाठी दिवस अनुकूल आहे. सर्जनशीलता व्यक्त करा. करिअरमध्ये नवीन जबाबदारी किंवा प्रकल्प मिळू शकतो. यात तुम्हाला तुमचे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल. धीर धरा आणि कामावर लक्ष केंद्रित करा. वैयक्तिक जीवनात प्रियजनांसोबत वेळ घालवू शकाल. कुटुंब किंवा मित्रांसोबत संवाद साधल्याने तुमचं नातं घट्ट होईल. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. योगा आणि ध्यानधारणा करा. मनाचा आवाज ऐका आणि सकारात्मक राहा.Lucky Color : GreenLucky Number : 16
advertisement
12/12
मीन (Pisces) : दिवस नवीन शक्यतांचा असेल. सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती चांगली असेल. नवीन प्रकल्प किंवा काम करण्यासाठी दिवस योग्य आहे. मित्र आणि कुटुंबियांशी नातं घट्ट होईल. त्यांचा पाठिंबा तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. त्यांचे हेतू समजून घेण्याचा प्रयत्न करा. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकते. त्यामुळे तुमच्या कामाचा वेग वाढेल. कल्पना शेअर करण्यास संकोच करू नका. तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. आर्थिक बाबतीत सतर्क रहा. बजेटची काळजी घ्या. आरोग्यासाठी दिनचर्येत योग आणि ध्यानधारणेचा समावेश केल्यास मानसिक शांती मिळेल आणि तुमची ऊर्जा वाढेल. दिवस प्रेरणादायी आणि सकारात्मक अनुभव देणारा आहे. तुमचा अंतर्मुख स्वभाव सोडा आणि बाहेरच्या जगात मोकळे व्हा.Lucky Color : PurpleLucky Number : 6
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: इतका त्रास सोसलाय! आता या राशींना लक साथ देणार; मंगळ-गुरूचा वरदहस्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल