TRENDING:

Aajche Rashi Bhavishya, 23 January 2025: अडचणीत सर्वांनी पाठ फिरवली! या राशींचे आता पालटणार नशीब; सगळे हिशोब चुकते

Last Updated:
Today Horoscope, Aajche Rashi Bhavishya, January 23, 2025: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊया.
advertisement
1/12
अडचणीत सर्वांनी पाठ फिरवली! या राशींचे आता पालटणार नशीब; सगळे हिशोब चुकते
मेष (Aries) : दिवस आव्हानं वाढवणारा आहे. ऑफिसमध्ये अनपेक्षित समस्या उद्भवू शकतात. तुमच्या संयमाची परीक्षा होऊ शकते. सहकाऱ्यांशी सावधगिरीने वागा. वाद टाळा. कौटुंबिक पातळीवर स्थिती तणावपूर्ण असेल. शांत राहा आणि हुशारीनं वागा. रागाच्याभरात कोणताही निर्णय घेऊ नका. कारण त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. खर्च वाढेल आणि पैशाची कमतरता भासेल.Lucky Color : MagentaLucky Number : 8
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : दिवस अनुकूल आहे. ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. ऑफिसमध्ये मेहनत आणि समर्पणाचं फळ मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पात सहभागी व्हाल. या माध्यमातून तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. गुंतवणुकीच्या दृष्टीने दिवस शुभ आहे. शेअर बाजारात पैसे गुंतवू शकता. आर्थिक स्थिती मजबूत असेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती लाभेल.Lucky Color : Navy BlueLucky Number : 13
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : दिवस अनुकूल आहे. जीवनात सकारात्मक ऊर्जा जाणवेल. सर्व कामे यशस्वी होतील. तुम्ही समर्पित भावनेतून काम कराल. त्याचे तुम्हाला चांगले फळ मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल. वरिष्ठ अधिकारी तुमचं कौतुक करतील. नवीन प्रकल्पावर काम सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. व्यवसायात फायदा होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. यातून परस्पर संबंधात गोडवा निर्माण होईल.Lucky Color : BlackLucky Number : 11
advertisement
4/12
कर्क (Cancer) : दिवस थोडा आव्हानात्मक असू शकतो. ऑफिसमध्ये अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे तुमचे मन विचलित होईल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. घाईत कोणतंही पाऊल उचलू नका. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात. संयम ठेवत संवाद साधा. आर्थिक बाबतीत सतर्क राहा. अनावश्यक खर्च टाळा. आरोग्य चांगले राहिल. दिवसाचा पुरेपूर आनंद घ्याल.Lucky Color : PurpleLucky Number : 6
advertisement
5/12
सिंह (Leo) : दिवस चांगला आहे. ऑफिसमध्ये चांगले रिझल्ट मिळतील. तुम्ही तुमच्या कामात प्रभुत्व आणि कार्यक्षमता दाखवाल. त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर प्रभावित होतील. ते तुमचं कौतुक करतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. वैयक्तिक जीवनात तुमचा दिवस चांगला जाईल. कुटुंब आणि मित्रांसमवेत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यात गोडवा आणि प्रेम वाढेल.Lucky Color : Dark GreenLucky Number : 9
advertisement
6/12
कन्या (Virgo) : अडचणी वाढू शकतात. ऑफिसमध्ये कामात अडथळे आल्याने तुमचे मन विचलित असेल. सहकाऱ्यांकडून मदतीची फार अपेक्षा करू नका. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. वैयक्तिक जीवनात तणाव असेल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात. पण ते संयम आणि समजूतदारपणे दूर करा. संवाद साधताना सौम्य शब्द वापरा, जेणेकरून कोणाचंही मन दुखावले जाणार नाही. आरोग्याची काळजी घ्या.Lucky Color : BlueLucky Number : 16
advertisement
7/12
तूळ (Libra) : दिवस उत्तम असेल. ऑफिसमध्ये तुमच्या मेहनत आणि समर्पणाचं कौतुक होईल. विचारांमध्ये समतोल आणि स्पष्टता असेल. त्यामुळे तुम्ही महत्त्वाचे निर्णय सहज घेऊ शकाल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहील. प्रियजनांसोबत खास क्षण घालवू शकाल. आर्थिक बाबतीत दिवस फायदेशीर असेल. संपत्तीच्या बाबतीत सकारात्मक रिझल्ट मिळू शकतात. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे.Lucky Color : BrownLucky Number : 5
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : आव्हानं असतील. ऑफिसमध्ये अपेक्षित रिझल्ट न मिळाल्याने निराश असाल. महत्त्वाचे निर्णय घाईत न घेता विचारपूर्वक घ्या. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात. त्यामुळे संयमाने वागा. आरोग्याची काळजी घ्या. पोट आणि पचनाच्या समस्यांकडे लक्ष द्या. प्रवास टाळा, कारण त्यात अडथळे येऊ शकतात.Lucky Color : PinkLucky Number : 2
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : दिवस प्रतिकूल आहे. काही समस्या जाणवतील. त्यामुळे सतर्क राहा. ऑफिसमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. संयमानं काम करा. आरोग्याची काळजी घ्या. किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्या. संतुलित आहार आणि नियमित व्यायामावर भर द्या.Lucky Color : GreenLucky Number : 7
advertisement
10/12
मकर (Capricorn) : दिवस उत्तम आहे. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकेल. ऑफिसमध्ये मेहनत आणि समर्पणाचे फळ मिळेल. वरिष्ठ तुमचं कौतुक करतील. तुम्हाला पाठिंबा देतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायासाठी दिवस लाभदायक असेल. नवीन भागीदारी आणि गुंतवणुकीची संधी मिळू शकते. व्यवसाय नवीन उंचीवर नेण्यासाठी आणि योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी दिवस अनुकूल आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.Lucky Color : Sky BlueLucky Number : 16
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : दिवस अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात नवीन उंची गाठाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. सर्व कामं पूर्ण क्षमतेनं आणि ऊर्जेनं कराल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. व्यवसायात अनपेक्षित लाभ होऊ शकतो. नवीन प्रकल्पावर काम करण्यासाठी दिवस चांगला आहे. तुमचे निर्णय योग्य ठरतील. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहील.Lucky Color : RedLucky Number : 13
advertisement
12/12
मीन (Pisces) : अडचणी जाणवतील. ऑफिसमध्ये समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे मानसिक तणाव वाढेल. सहकाऱ्यांशी समन्वय ठेवण्यात अडचणी येतील. आर्थिक बाबतीत सतर्क राहा. गुंतवणूक विचारपुर्वक करा. खासगी जीवनात थोडी अस्थिरता जाणवू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होऊ शकतात. धीर धरा आणि वादविवाद टाळा.Lucky Color : YellowLucky Number : 17
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajche Rashi Bhavishya, 23 January 2025: अडचणीत सर्वांनी पाठ फिरवली! या राशींचे आता पालटणार नशीब; सगळे हिशोब चुकते
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल