TRENDING:

Yearly Horoscope: वृश्चिक राशीला नवीन वर्षात धनलाभ! नशीब चमकण्याचे योग, कसं असेल वार्षिक राशीभविष्य

Last Updated:
Yearly Horoscope: वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वातला टोकदारपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला मजबूत बनवतो. तुमची अंगकाठी बहुतेककरून सडपातळ असते. तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं, तर सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यांकडेच लक्ष जातं. तुमच्या भुवया वक्र असतात आणि नाक थोडं वर आलेलं असतं. या व्यक्ती त्यांच्या मतांवर ठाम, थोड्या गर्विष्ठ, कोणत्याही विषयाकडे बारकाईने पाहण्यात पटाईत आणि महत्त्वाकांक्षी असतात. त्यांची मतं धार्मिक असतात आणि प्रत्येक काम ते कुशलतेनं करतात. इतरांचा स्वभाव, त्यांचं सामर्थ्य आणि कमकुवतपणा सखोलपणे समजून घेण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. त्यांना मैत्री करायला आवडते आणि कौतुकही आवडतं. त्यांच्याशी मैत्री जितकी फायदेशीर असते, तितकंच त्यांच्याशी शत्रुत्व त्रासदायक ठरू शकतं. तुमच्या मनात असलेल्या कल्पना मांडायला अजिबात संकोच करू नका.
advertisement
1/5
वृश्चिक राशीला नववर्षात धनलाभ! नशीब चमकण्याचे योग, कसं असेल वार्षिक राशीभविष्य
आर्थिक - वर्षभर कठोर मेहनत घेतली तरच चांगली फळं मिळू शकतात. कोणत्याही व्यवसायात असाल किंवा स्वतःचा व्यवसाय असेल, तर हा काळ चढ-उताराचा असेल. एप्रिल आणि सप्टेंबरमध्ये मालमत्ता खरेदीसंदर्भात यश येऊ शकतं. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होऊ शकतात आणि या वर्षात मालमत्ता खरेदीची शक्यता फार कमी आहे. या काळात तुम्हाला पैसे मिळतील आणि घरातल्या एखाद्या शुभ कार्यासाठी पैसे खर्च होण्याचीही दाट शक्यता आहे. याचबरोबर आर्थिक लाभाचीही शक्यता आहे.
advertisement
2/5
प्रेम आणि वैवाहिक जीवन - या वर्षात ग्रहांचे पैलू तुमच्या कौटुंबिक जीवनावर सर्वांत जास्त परिणाम करत असल्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या वर्षात काही कौटुंबिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जानेवारीच्या मध्यापासून ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत तुमच्या आई-वडिलांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे तुम्हाला थोडा ताण जाणवेल. तुमच्या वडिलांची तब्येत बिघडू शकते. गेल्या काही वर्षांत तुमच्या कुटुंबातल्या काही सदस्यांसोबत असलेल्या तुमच्या नात्यात काही समस्या होत्या. त्यामुळे आता त्यांच्यासोबत पुढे कसं जायचं हे ठरवण्याची वेळ आली आहे. कारण तुमच्या आयुष्यातून तुम्ही ती नाती पूर्णपणे बाजूला करू शकत नाही.
advertisement
3/5
व्यवसाय - या वर्षी तुम्हाला आधीपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतील. या काळात तुमचा स्वभाव थोडा वेगळा वाटेल. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमची सवय सोडून पुढे जावं लागेल. तुमची एकाग्रता, प्रयत्न आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही या वर्षी यश मिळवू शकाल. तुमच्या परिस्थितीत थोडी सुधारणा झालेली दिसेल आणि कामाच्या ठिकाणी शत्रूंमुळे काही समस्यांचा सामना करावा लागेल. त्यामुळे तुम्हाला सतत मेहनत घ्यावी लागेल. सावध राहण्याचा सल्ला आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या वृश्चिक राशीच्या व्यक्ती या वर्षी अद्भुत व्यावसायिक जीवन जगतील आणि त्यांच्या उपक्रमांमध्ये यश संपादन करतील.
advertisement
4/5
शिक्षण - शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना आधीपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतील. अभ्यासात तुम्ही सर्वसाधारण असाल, तर तुम्हाला यश मिळवण्यासाठी शिक्षक किंवा मार्गदर्शकांचा सल्ला घ्यावा लागेल. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणारे विद्यार्थी परीक्षेत यशस्वी होतील आणि या काळात घरच्यांकडूनही प्रोत्साहन मिळेल.
advertisement
5/5
आरोग्य - आरोग्याच्या दृष्टिकोनातून यंदाचं हे वर्ष तुम्हाला मिश्रफल देणारं असेल. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत तुम्ही जास्त काळजी घेतली पाहिजे. चांगली वैयक्तिक आणि व्यावसायिक परिस्थिती उत्तम आरोग्यासाठी उपयोगी ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Yearly Horoscope: वृश्चिक राशीला नवीन वर्षात धनलाभ! नशीब चमकण्याचे योग, कसं असेल वार्षिक राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल