TRENDING:

बाहेर किंवा गावी गेल्यावर, एखाद्या गुरुवारी पूजेची मांडणी करणे शक्य नसेल तर काय करावे?

Last Updated:
हिंदू पंचांगानुसार मार्गशीष महिना हा खूप पवित्र मानला जातो. या महिन्यात पूजा पाठ, उपवास केल्याने व्यक्तीला लाभ होतो असे मानले जाते. हिंदू धर्मात गुरुवार हा अत्यंत शुभ मानला जातो. अशावेळेस देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख- समृद्धी नांदते.
advertisement
1/7
बाहेर किंवा गावी गेल्यावर, गुरुवारी पूजेची मांडणी करणे शक्य नसेल तर काय करावे?
हिंदू पंचांगानुसार मार्गशीष महिना हा खूप पवित्र मानला जातो. या महिन्यात पूजा पाठ, उपवास केल्याने व्यक्तीला लाभ होतो असे मानले जाते. हिंदू धर्मात गुरुवार हा अत्यंत शुभ मानला जातो. अशावेळेस देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख- समृद्धी नांदते.
advertisement
2/7
अनेक भाविक गुरुवारी उपवास ठेवतात, सत्यनारायणाची कथा वाचतात आणि विधिवत पूजा करतात. या दिवशी पूजा-अर्चना केल्याने घरात सुख-समृद्धी येते. मात्र, नोकरी, प्रवास किंवा इतर कामांमुळे अनेकदा भाविकांना गुरुवारी घरात विधिवत पूजा मांडणी करणे शक्य होत नाही.
advertisement
3/7
अशा परिस्थितीत, बाहेरगावी असताना किंवा घरी असतानाही पूजा शक्य नसल्यास धार्मिक परंपरा खंडित करू नये यासाठी काय करावे? याबद्दल धर्माचार्यांनी काही अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत, जे तुम्ही प्रवास करतानाही सहज करू शकता.
advertisement
4/7
मानसिक पूजा: सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिक पूजा करणे. तुम्ही जिथे असाल, तिथे शांतपणे बसा आणि देवी लक्ष्मीचे ध्यान करा. त्यांची प्रतिमा मनात आणा आणि त्यांना नमस्कार करून मानसिकरित्या प्रार्थना करा. ही भावनायुक्त पूजा प्रत्यक्ष पूजेइतकीच प्रभावी मानली जाते.
advertisement
5/7
जप: पूजेसाठी वेळ नसेल, तरी गुरुवारी शक्य तितक्या वेळा मंत्राचा जप करा. हा मंत्र गुरुवारी सर्वात शक्तिशाली मानला जातो. चालताना किंवा काम करतानाही तुम्ही हा जप करू शकता.
advertisement
6/7
उपवास: जर कोणत्याही कारणामुळे तुम्हाला गुरुवारची पूजा मांडता आली नाही तर अशावेळेस तुम्ही उपवास चुकवू नये. दर गुरुवारी न चुकता उपवास करावा.
advertisement
7/7
मोबाईलवर ऐका कथा: जर कोणत्याही कारणामुळे तुम्हाला गुरुवारची पूजा मांडता आली नाही तर अशावेळेस, तुम्ही पोथी वाचू शकत नाहीत, तर त्यावेळेस मोबाईलचा वापर करून तुम्ही व्रताची कथा ऐकू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
बाहेर किंवा गावी गेल्यावर, एखाद्या गुरुवारी पूजेची मांडणी करणे शक्य नसेल तर काय करावे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल