TRENDING:

आता पेट्रोल बाइकचे दिवस संपले, बजाजची CNG बाइक तयार, पण किती देणार मायलेज?

Last Updated:
बजाज ही देशातली लोकप्रिय दुचाकी उत्पादक कंपनी जगातली पहिली सीएनजी बाइक बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे.
advertisement
1/8
आता पेट्रोल बाइकचे दिवस संपले, बजाजची CNG बाइक तयार, पण किती देणार मायलेज?
सध्या बाजारात इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर्सची विविध मॉडेल्स ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत. इलेक्ट्रिक कार, स्कूटर आणि तीन चाकी वाहनांनंतर आता लवकरच जगातली पहिली सीएनजी बाइक भारतीय बाजारात लाँच होणार आहे.
advertisement
2/8
बजाज कंपनी ही बाइक लाँच करणार आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी नुकताच या माहितीला दुजोरा दिला आहे. या सीएनजी बाइकची किंमत पेट्रोल व्हॅरिएंटच्या तुलनेत जास्त असू शकते. याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
advertisement
3/8
बजाज ही देशातली लोकप्रिय दुचाकी उत्पादक कंपनी जगातली पहिली सीएनजी बाइक बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी नुकतीच यासंदर्भात घोषणा केली आहे. 'या वर्षी जून महिन्यात बजाज पहिली सीएनजी बाइक लाँच करत आहे,' असं त्यांनी सांगितलं. बजाजने या बाइकसाठी वेगळ्या नावाची निवड केली आहे. बजाज आगामी काळात आपल्या सीएनजी मॉडेल्ससाठी कंपनीचा सब-ब्रँड लाँच करू शकते.
advertisement
4/8
राजीव बजाज यांनी या वेळी पुढच्या पाच वर्षांसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याबाबत सूतोवाच केलं. त्या वेळी त्यांनी सीएनजी बाइकबाबतच्या घडामोडींना दुजोरा दिला.
advertisement
5/8
यापूर्वी चार चाकी, तीन चाकी वाहनांची अनेक सीएनजी मॉडेल्स आणि त्यांचे व्हॅरिएंट जागतिक, तसंच भारतीय बाजारात आहेत. आता कंपनी सीएनजी बाइक लाँच करण्याच्या तयारीत आहे, असं 'पीटीआय'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
advertisement
6/8
ऑटोमेकर कंपनी बजाजच्या या सीएनजी बाइकचं नाव बजाज ब्रुझर असं असेल. या बाइकमधलं टेलपाइप इमिशन कमी करण्यात आलं आहे. तसंच कार्बन डाय ऑक्साइडचं उत्सर्जनदेखील 50 टक्के कमी करण्यात आलं आहे. बजाजच्या सीएनजी मॉडेलमध्ये सेकंड स्टोरेज सिलिंडर असतील.
advertisement
7/8
बजाज आपल्या सीएनजी उत्पादनांसाठी एक नवीन सबब्रँड लाँच करण्याच्या विचारात आहे. बजाजच्या या सीएनजी बाइकची किंमत पेट्रोल व्हॅरिएंटच्या तुलनेत जास्त असू शकते. कारण तिचा उत्पादन खर्च तुलनेनं जास्त असेल.
advertisement
8/8
सीएनजी मोटरसायकल बजाजच्या खास प्रकल्पांपैकी एक आहे. ही कंपनी यापूर्वी सीएनजीवरच्या तिचाकी गाड्यांच्या उत्पादनासाठी ओळखली जात असे; पण टू-व्हीलरमध्ये सीएनजी तंत्रज्ञानाचा वापर करणारी बजाज ही पहिली कंपनी आहे. जूनमध्ये सीएनजी बाइक लाँच होईल. त्यानंतर ही जगातली पहिली सीएनजी बाइक ठरेल. पण या बाईकच्या मायलेजविषयी अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
आता पेट्रोल बाइकचे दिवस संपले, बजाजची CNG बाइक तयार, पण किती देणार मायलेज?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल