Actor Vijay Rally Stampede: भाजप आणि सत्ताधाऱ्यांना अंगावर घेणाऱ्या विजय थलापतीच्या रॅलीचे PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
चाहत्यांनी विजय यांना अक्षरश: डोक्यावर घेतलं. तामिळनाडूमध्ये विजय यांनी ठिकठिकाणी रॅली काढत राज्य सरकारवर जोरदार प्रहार सुरू केला.
advertisement
1/8

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय थलापती यांनी सिनेसृष्टीतून ब्रेक घेत राजकारणात उडी घेतली. विजय यांनी स्वता:चा टीव्हीके अर्थात तमिळगा वेट्री कळघम नावाचा पक्ष स्थापन केला. विजय यांनी पक्ष स्थापन केल्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी विजय यांना अक्षरश: डोक्यावर घेतलं. तामिळनाडूमध्ये विजय यांनी ठिकठिकाणी रॅली काढत राज्य सरकारवर जोरदार प्रहार सुरू केला. एवढंच नाहीतर भाजपलाही त्यांनी अंगावर घेतलं. पण, करूरमध्ये रॅलीमध्ये चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. 33 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या रॅलीला मुंग्यासारखी गर्दी होती.
advertisement
2/8
दाक्षिणात्य सिनेमातला सुपरहिरो जेव्हा राजकीय नेता म्हणून मैदानात उतरतो तेव्हा काय करू शकतो, हे विजय यांनी दाखवून दिलं. विजय यांच्या रॅलीला तुफान अशी गर्दी होत आहे. ही गर्दी सत्ताधाऱ्यांनी हादरावून सोडणारी अशीच आहे.
advertisement
3/8
विजय थलापती यांचं खरं नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असं आहे. त्यांनी २ फेब्रुवारी २०२४ मध्ये राजकीय पक्षाची घोषणा केली होती. २०२६ मध्ये तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. त्यासाठी विजय यांनी रॅलीचं आयोजन केलं आहे.
advertisement
4/8
करूर या भागात विजय यांची आज रॅली पोहोचली तेव्हा मुंग्यासारखी गर्दी झाली होती. लहान, मोठ्या आणि वृद्धांनी या रॅलीला तुफान गर्दी केली होती.
advertisement
5/8
पण, कुणालाा काय माहिती, अचानक चेंगराचेंगरीची घटना घडली. अभिनेता विजय हे एका व्हॅनवर उभे राहून रॅलीत सामील झाले होते. याच दरम्यान, विजय यांनी माईकवरून एक मुलगा हरवला आहे, तो शोधण्यासाठी मदत करा. पोलिसांना सहकार्य करा अशी सुचना कार्यकर्त्यांनी दिली आणि स्टेजवरून खाली उतरले. त्यानंतर एकच गर्दी उसळली.
advertisement
6/8
गुदमरून अनेक जण बेशुद्ध पडले. तर काही जण गर्दीत दबले गेले. अचानक झालेल्या या घटनेत ३३ जणांचा मृत्यू झाला असल्याचंस मोर आलं. यामध्ये मुलं आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसह अनेक लोक बेशुद्ध पडले.
advertisement
7/8
जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. घटनास्थळावर चप्पलांना ढीग साचला होता. तर रुग्णालयात जखमी कार्यकर्त्यांनी भरलं होतं. विजय यांनी घटनेची दखल घेतली असून मदतकार्याला सुरुवात केली आहे.
advertisement
8/8
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी करूर घटनेवर चिंता व्यक्त केली असून जिल्हाधिकाऱ्यांना बेशुद्ध पडलेल्या आणि रुग्णालयात दाखल झालेल्यांना त्वरित उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Actor Vijay Rally Stampede: भाजप आणि सत्ताधाऱ्यांना अंगावर घेणाऱ्या विजय थलापतीच्या रॅलीचे PHOTOS