कॉलेज कुमारांसाठी बेस्ट आहेत या 5 बाइक! स्टाइल, मायलेज सर्वच दमदार, किंमत 88,800 पासून सुरू
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तरुणांना बाइकची खुप क्रेज असते. यातही कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणांना स्टाइलीश बाइक हवी असते. आज आपण स्टायलिश पण कमी पैशात मिळणाऱ्या बाइक्सविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/9

Best Bikes For College Students in India: कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बाइकची खुप क्रेझ असते. कॉलेज कुमारांना स्टायलिश बाइक हवी असते. तुम्हीही अशाच बाईकच्या शोधात असाल तर आज आपण बेस्ट ऑप्शन्स पाहणार आहोत.
advertisement
2/9
Hero Xtreme 125R: तुम्हाला कमी बजेटमध्ये 200cc ची स्पोर्टी लूक असणारी बाइक हवी असेल तर Xtreme 125R बेस्ट आहे. याची मस्कुलर टँक आणि शार्प LED प्रोजेक्टर हेडलाइट या बाइकला कॉलेज कँपसचं स्टार बनवते. या बाइकचं मायलेजही खुप शानदार आहे.
advertisement
3/9
Hero Xtreme 125R चं इंजिन 124.7 cc चं आहे. जे जवळपास 66 kmpl चं भारी मायलेज देतं. या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच सिंगल-चॅनल ABS सारखं सेफ्टी फिचरही दिलं गेलंय. जे अचानक ब्रेक लावल्यावर बाइक घसरण्यापासून बचाव करते. या बाइकची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 88,800 रुपये आहे.
advertisement
4/9
TVS Ronin: ही एक स्क्रॅम्बलर स्टाइल बाइक आहे. आपल्या यूनिक डिझाइनमुळे ती ओळखली जाते. या बाइकमध्ये गोल्ड फिनिश्ड USD फोर्क्स आणि राउंड LED हेडलाइटमुळे बाइकला प्रीमियम लूक मिळतो. कॉलेजला जाणाऱ्या मुलांसाठी यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसारखे स्मार्ट फीचर्स मिळतात.
advertisement
5/9
TVS Ronin: ही एक स्क्रॅम्बलर स्टाइल बाइक आहे. आपल्या यूनिक डिझाइनमुळे ती ओळखली जाते. या बाइकमध्ये गोल्ड फिनिश्ड USD फोर्क्स आणि राउंड LED हेडलाइटमुळे बाइकला प्रीमियम लूक मिळतो. कॉलेजला जाणाऱ्या मुलांसाठी यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसारखे स्मार्ट फीचर्स मिळतात.
advertisement
6/9
Honda Hornet 2.0: ही होंडाची हॉर्नेट 2.0 बाईक आपल्या कॅटेगिरीची सर्वात अॅग्रेसिव्ह दिसणारी बाइक आहे. या बाइकच्या गोल्डन अपसाइड-डाउन फोर्क्स आणि रुंद टायर या बाइकला मोठी स्पोर्ट्स बाइकचा फील देते. या बाइकची बिल्ड क्वालिटी आणि होंडाचं विश्वासार्ह इंजिन या बाइकला स्पर्धेच चांगली टिकवून ठेवते.
advertisement
7/9
या बाइकमध्ये 184.4 cc चं इंजिन आहे. जे 17.26 PS ची पॉवर देते. या बाइकची हाय-स्पीडवर बॅलेन्स आणि कॉर्नर्सवर वळण घेण्याची क्षमता उत्तम आहे. यात पूर्ण प्रकारे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि ऑल-LED लायटिंग दिली आहे. हॉर्नेट 2.0 ची एक्स शोरुम किंमत 1,47,134 रुपयांपासून सुरू होते.
advertisement
8/9
Royal Enfield Hunter 350: ही बाइक कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये खुप प्रसिद्ध आहे. या बाइकची कॉम्पॅक्ट डिझाइन आणि रेट्रो-मॉडर्न लूकमुळे ती गर्दीतही उठून दिसते. शहरातील ट्रॅफिक असणाऱ्या रस्त्यांवर ती चालवणं खुप सोपं होतं. ही बाइक अशा लोकांची बेस्ट आहे, ज्यांना क्लासिक फीलसह हलकी गाडी हवी आहे.
advertisement
9/9
या बाइकमध्ये 349cc चं दमदार J-सीरीज इंजिन लावलंय. हे इंजिन 20.2 bhp ची पॉवर जनरेट करते. सेफ्टीसाठी या बाइकमध्ये ड्युअल-चॅनल ABS आणि अलॉय व्हील्ससारखे फीचर्स देण्यात आलेय. या बाइकची किंमत 1,37,640 रुपयांपासून सुरू होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
कॉलेज कुमारांसाठी बेस्ट आहेत या 5 बाइक! स्टाइल, मायलेज सर्वच दमदार, किंमत 88,800 पासून सुरू