TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : राकेशसोबत राडा! तरी RB ची बहीण देणार विशालसाठी 'खास गिफ्ट'; 'तुला एक किलो...'

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Vishal Raqesh : बिग बॉस मराठी 6 च्या घरात राकेश आणि विशाल यांच्यात राडा झाल्यानंतर आरबीच्या बहिणीची प्रतिक्रिया आली आहे.
advertisement
1/7
राकेशसोबत राडा! तरी RB ची बहीण देणार विशालसाठी 'खास गिफ्ट'; 'तुला एक किलो...'
बिग बॉस मराठी 6 मध्ये आता प्रत्येक स्पर्धकाची फिनाले गाठण्यासाठी धडपड सुरू आहे. फिनालेमध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी स्पर्धकांमध्ये चूरस पाहायला मिळत आहे.  त्यामुळे या आठवड्यात झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये तुफान राडा झाला पाहायला मिळाला. विशाल आणि राकेश यांच्यातील वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. शोमधील हे दोन तगडे स्पर्धक अक्षरशः एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं पाहायला मिळालं.
advertisement
2/7
या आठवड्यात बिग बॉसने 'तिकिट टू फिनाले'साठी एक विशेष टास्क दिला होता. प्रत्येक सदस्याचा फोटो एका टीव्ही स्क्रीनवर होता. ज्याचा टीव्ही फुटणार, त्याचं फिनालेचं स्वप्न धुळीला मिळणार. या टास्कमध्ये राकेशने विशालच्या नावाचा टीव्ही फोडला.
advertisement
3/7
राकेशने विशालला नॉमिनेट करण्याचं कारण सांगताना म्हटलं की, "मला त्याचा गेम पहिल्या दिवसापासून आवडत नाही. त्याचा उद्धटपणा आवडत नाही, त्याला तो स्वाभिमान म्हणतो. माझ्याबद्दल तो आजपर्यंत जे बोलला आहे ते मला आवडलेलं नाही. विशाल नेहमी बाहेरच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलतो, जे मला पटत नाही."
advertisement
4/7
हे ऐकताच विशालचा पारा चढला. विशाल ओरडून म्हणाला, "तू माझ्या वयाबद्दल बोलतोस ते चालतं का? मग मी तुझ्या डिव्होर्सबद्दल बोलतो." आपल्या एक्स वाइफला वादात आणल्याने राकेशचा राग अनावर झाला होता. तो खूप भडकला आणि दोघांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली आणि परिस्थिती हाणामारीपर्यंत पोहोचली. हा वाद इतक्या विकोपाला गेला की दोघंही एकमेकांवर धावून गेले.
advertisement
5/7
त्यानंतर परिस्थिती हाताळण्यासाठी बिग बॉसला हस्तक्षेप करावा लागला. बिग बॉसने दोघांनी शिक्षाही दिली. राकेशला या आठवड्यासाठी थेट नॉमिनेट करण्यात आलं आहे. तसंच त्याला यापुढील कॅप्टन्सी कार्यातूनही बाद करण्यात आलं आहे.
advertisement
6/7
दरम्यान आपल्या वयावरून राकेश बोलतो तेसुद्धा पर्सनल आहे हा मुद्दा धरून भांडणाऱ्या विशालचा जुन्या एपिसोडमधील एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यावर राकेशची बहीण शीतल बापटने कमेंट केली आहे.
advertisement
7/7
शीतल विशालला म्हणाली, "विशाल एक किलो बदाम पाठवते. मेमरी लॉस होतोय तुला, रोज खा जरा!" राकेशच्या बहिणीची विशालला आरसा दाखवला आहे. कारण राकेश आपल्या वयावरून बोलतो हे वैयक्तिक आहे, म्हणून त्याच्याशी भांडणारा विशाल स्वत:ही राकेश आणि रेवाच्या वयावरूनही या व्हिडीओत बोलताना दिसतो आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : राकेशसोबत राडा! तरी RB ची बहीण देणार विशालसाठी 'खास गिफ्ट'; 'तुला एक किलो...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल