घरांचं छत उडालं, यात्रेचा मंडप कोसळला; पुण्यात अवकाळीचा कहर, तासात होत्याचं नव्हतं झालं! PHOTOS
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune Rain: वादळी वाऱ्यासह गारांचा मारा इतका तीव्र होता की अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. तर वादळामुळे घरांचे छत उडून गेले.
advertisement
1/9

मार्चअखेर महाराष्ट्रावर अस्मानी संकट घोंघावत आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीनं काही ठिकाणी थैमान घातल्याचं चित्र आहे. आता पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळीनं कहर केला आहे. यामध्ये शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालंय.
advertisement
2/9
भोर तालुक्यातील वडगाव डाळ गावात वादळी पाऊस अन् गारपीट झाली. यामध्ये गावातील सात घरांच्या छतावरील पत्रे आणि कौलं उडून गेले आहेत. काही घरांच्या भिंती कोसळल्यामुळे नागरिकांना मोठा फटका बसला आहे. या संपूर्ण घटनेत सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
advertisement
3/9
अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वादळी वाऱ्यासह गारांचा मारा इतका तीव्र होता की अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे घरात साठवून ठेवलेले अन्नधान्य तसेच दैनंदिन वापराच्या वस्तू पूर्णपणे भिजून खराब झाल्या आहेत.
advertisement
4/9
गावात सुरू असलेल्या यात्रेनिमित्त ग्रामदैवताच्या मंदिरासमोर उभारण्यात आलेला मोठा मंडपही या गारपिटीमुळे कोसळला. पावसादरम्यान मोठ्या प्रमाणावर गारा मंडपाच्या छतावर साठल्या. त्या गारांचे वजन न पेलल्याने मंडप अचानक खाली कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले आहे.
advertisement
5/9
अस्मानी संकटात काही कुटुंबांचे संसार अक्षरशः उघड्यावर आले आहेत. गावातील योगेश निकम यांच्या घराचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
advertisement
6/9
वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने पावसाचे पाणी थेट घरात शिरले. घरातील अन्नधान्य, कपडे आणि इतर संसार उपयोगी वस्तू पूर्णपणे भिजल्यामुळे मोठी हानी झाली.
advertisement
7/9
विशेष म्हणजे गारपिटीची तीव्रता इतकी होती की पाऊस थांबून जवळपास दीड तास उलटल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर गारा त्या परिसरात साठलेल्या दिसून येत होत्या. गावकऱ्यांनी यापूर्वी अशा प्रकारची गारपीट क्वचितच पाहिल्याचे सांगितले.
advertisement
8/9
या घटनेनंतर गावकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
advertisement
9/9
प्रशासनाने लवकरात लवकर परिस्थितीचा आढावा घेऊन नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
घरांचं छत उडालं, यात्रेचा मंडप कोसळला; पुण्यात अवकाळीचा कहर, तासात होत्याचं नव्हतं झालं! PHOTOS