भारतात लॉन्च झाली ही दमदार इलेक्ट्रिक SUV, सिंगल चार्जमध्ये चालते 635km पर्यंत; लूकही भारी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
BMW iX xDrive50 भारतात लॉन्च करण्यात आली आहे. याची WLTP-सर्टिफाइड रेंज 635km आहे. चला जाणून घेऊया इतर डिटेल्सविषयी...
advertisement
1/5

नवी दिल्ली : BMW ने भारतात iX चे नवीन हाय स्पेक व्हेरिएंट xDrive50 लॉन्च केलेय. याची एक्स-शोरुम किंत 1.40 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. या टॉप व्हेरिएंटमध्ये मोठी बॅटरी देण्यात आलीये. ज्यात जास्त रेंजही मिळेल. यासोबतच पॉवरफूल मोटर्सही देण्यात आलेय. iX xDrive40 च्या तुलनेत छोटे-मोठे बदल इंटीरियर आणि एक्सटीरियरमध्ये करण्यात आले आहेत. xDrive40 च्या तुलनेत xDrive50 19 लाख रुपये जास्त महाग आहे.
advertisement
2/5
नावावरुनच समजू शकतं की, iX xDrive50 में 111.5kWh बॅटरी पॅक देण्यात आलंय. याची WLTP-सर्टिफाइड रेंज 635km आहे. येथे प्रत्येक एक्सलवर दोन इलेक्ट्रिक मोटर देण्यात आलेय. जे ऑल व्हील ड्राइव्हच्या माध्यमातून कंबाइंड 523hp ची पॉवर आणि 765Nm चं पीक टॉर्क जनरेट करते. ही ऑल-इलेक्ट्रिक SUV केवळ 4.6 सेकेंड्समध्ये 100kph ची स्पीड पकडते.
advertisement
3/5
BMWने म्हटलं की, 195kW DC चार्जरच्या माध्यमातून 35 मिनिटात याची बॅटरी 10-18 टक्के चार्ज केली जाऊ शकते. तर 50kW DCच्या माध्यमातून 97 मिनिटांत, 22kW AC चार्जरच्या माध्यमातून 5.5 तासात आणि 11kW AC चार्जरच्या माध्यमातून 11 तासात एवढी चार्जिंग केली जाऊ शकते.
advertisement
4/5
तर iX xDrive 50 आणि xDrive40 कमोबेश एक सारखे दिसतात. यासोबतच यामध्ये जवळपास एक सारखे फीचर्स आणि सेफ्टी किट करण्यात आले आहेत.
advertisement
5/5
iX xDrive 50 मध्ये नवीन 22-इंच अलॉय व्हील्स आणि अडाप्टिव्ह सस्पेंशन स्टँडर्ड म्हणून देण्यात आलेय. तर लेजरलाइट हायलाइट्स, टायटेनियम ब्रॉन्ज एक्सटीरियर फिनिश आणि अॅक्टिव्ह सीट व्हेंटिलेशन ऑप्शनल म्हणून ऑफर केले जातील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
भारतात लॉन्च झाली ही दमदार इलेक्ट्रिक SUV, सिंगल चार्जमध्ये चालते 635km पर्यंत; लूकही भारी