मारुती सुझुकीची पहिली ई-एसयूव्ही eVitaraची एंट्री! फक्त 21 हजारांत करु शकता बुक
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Maruti Suzuki e Vitara Price: मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही eVitara ही 17 फेब्रुवारीला लॉन्च झाली आहे. या कारची सुरुवातीची किंमत 10.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. जी बॅटरी-ऐज-ए-सर्व्हिस मॉडलसह येते. या मॉडलमध्ये बॅटरीला वेगळी रेंटवर घेतली जाऊ शकते. ज्यामुळे गाडीची सुरुवातीची किंमत कमी होते. ग्राहक ही गाडी 21,000 रुपये देऊन बुक करु शकता. या कारच्या फीचर्सपासून परफॉर्मेंसचे पूर्ण डिटेल्स आपण जाणून घेऊया.
advertisement
1/7

Maruti Suzuki e Vitara Launch: मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही eVitara आज 17 फेब्रुवारीला लॉन्च झाली आहे. या कारची सुरुवातीची किंमत 10.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत बॅटरी-ऐज-ए-सर्व्हिस म्हणजेच BaaS मॉडलसह आहे. ज्यामध्ये बॅटरी वेगळी रेंटवर घेतली जाऊ शकते. यामुळे कारची किंमत कमी होते आणि ग्राहकांना फायदा मिळू शकतो. या गाडीला ग्राहक फक्त 21,000 रुपयांमध्ये बुक करु शकता.
advertisement
2/7
e-Vitara मध्ये दोन बॅटरी पॅक ऑप्शन देण्यात आले आहेत. लहान बॅटरी 49 kWh ची आहे आणि मोठी 61 kWh ची आहे. लहान बॅटरीच्या व्हेरिएंटमध्ये सिंगल मोटर आहे जी फ्रंट व्हील्सला ड्राइव्ह करते.
advertisement
3/7
मोठ्या बॅटरीमध्ये ड्यूल मोटर सेटअप आहे. जिला AllGrip-e नाव दिलं आहे आणि ती ऑल-व्हील ड्राइव्ह देते. मोठ्या बॅटरीच्या व्हेरिएंटमध्ये ड्रायव्हिंग रेज 543 किलोमीटरपर्यंत आहे. जी ARAI सर्टिफाइड आहे. ही रेंज खुप चांगली आहे आणि मोठ्या प्रवासासाठी बेस्ट ठरेल. लहान बॅटरीच्या रेंजमध्ये थोडी कमी असेल मात्र शहराच्या ड्रायव्हिंगसाठी पुरेसी आहे.
advertisement
4/7
कारसाठी एक वेगळा लूक : बाहेरून, eVitara जुन्या Vitara SUV सारखी दिसते, परंतु इलेक्ट्रिक टचसह. पुढच्या भागात हेडलाइट्समध्ये इंटिग्रेटेड तीन-पॉइंट मॅट्रिक्स LED DRL आहेत. बंपर पियानो काळ्या रंगात फिनिश केलेले आहेत आणि 18-इंच एरोडायनामिक अलॉय व्हील्स ब्लॅक आउट आहेत. मागील भागात स्कल्प्टेड तीन-पॉइंट मॅट्रिक्स LED टेल लॅम्प आणि एक ठळक 3D प्रोफाइल आहे. हे भविष्यवादी आणि आधुनिक लूक देते, तरीही मारुतीची सिग्नेचर SUV स्टाईलिंग टिकवून ठेवते.
advertisement
5/7
इंटीरियर आहे यूनिक : इंटीरियर विषयी बोलायचं झाल्यास eVitara कम्फर्ट आणि टेक्नॉलॉजीवर फोकस करते. समोर व्हेंटिलेटेड सीट्स आहेत. ड्राइव्हरचे सीट 10-व्या पॉवर अॅडजस्टेबल आहे. मागचे सीट्स फ्लेक्सिबल आहेत जेणेकरुन जास्त प्रॅक्टिकल होतील. सेफ्टीसाठी सात एयरबॅग्स आहेत. लेव्हल-2 ADAS आहे ज्यामध्ये ऑटोनॉमस फंक्शन जसं की, लेन कीप असिस्ट, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल इत्यादीचा समावेश आहे. 360 डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जिंग, कीलेस एंट्री. हायड-बाय-वायर टेक्नॉलॉजी आणि एम्बिएंट लायटिंगने केबिन प्रीमियम फील देते.
advertisement
6/7
ही कार मारुतीच्या NEXA डीलरशिपवर विकली जाईल. मारुतीने सांगितले आहे की, ईविटारा भारतात तयार केली जाईल आणि अनेक देशांमध्ये निर्यात केली जाईल. इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये कंपनीची ही पहिली मोठी एन्ट्री आहे. ग्राहकांना चांगली रेंज, मजबूत सुरक्षा आणि आराम मिळत आहे. 5-स्टार भारत एनसीएपी रेटिंग देखील आहे, जे सेफ्टीवरील आत्मविश्वास वाढवते.
advertisement
7/7
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक एसयूव्ही विभागात ई-विटारा एक मोठे आव्हान निर्माण करेल. 10.99 लाख रुपयांपासून सुरुवातीची किंमत असल्याने, ती अनेकांसाठी परवडणारी असेल, विशेषतः तिचे BaaS मॉडेल पाहता. ही कार शहर आणि महामार्ग वापरासाठी योग्य आहे. बुकिंग सुरू आहे आणि लवकरच डिलिव्हरी सुरू होतील. मारुतीचे सर्व्हिस नेटवर्क चार्जिंग आणि देखभाल सोपे करेल. भारतातील इलेक्ट्रिक कारसाठी हे एक मोठे पाऊल आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
मारुती सुझुकीची पहिली ई-एसयूव्ही eVitaraची एंट्री! फक्त 21 हजारांत करु शकता बुक