TRENDING:

Citroen Basalt की Kia Sonet, फीचर्सच्या बाबतीत कोणती SUV बेस्ट? पाहा फरक

Last Updated:
भारतीय बाजारात Citroen Basalt आणि Kia Sonet दोन्हीही पॉवरफूल एसयूव्ही आहेत. चला दोन्ही SUVs च्या फीचर्स, इंजिन ऑप्शन, सेफ्टी स्पेशिफिकेसन्स आणि किंमतीसंबंधित डिटेल्स जाणून घेऊया.
advertisement
1/6
Citroen Basalt की Kia Sonet, फीचर्सच्या बाबतीत कोणती SUV बेस्ट? पाहा फरक
भारतात कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंट वेगाने प्रसिद्ध होत आहे आणि या सेगमेंटमध्ये Citroen Basalt आणि Kia Sonet समोरा-समोर आहेत. Citroen Basalt एक कूपे-स्टाइल एसयूव्ही आहे. जी आपल्या यूनिक डिझाइन आणि आरामदायर ड्राइव्हसाठी ओळखली जाते.
advertisement
2/6
तर Kia Sonet पहिल्यापासूनच या सेगमेंटची मजबूत आणि विश्वासार्ह एसयूव्ही मानली जाते. दोन्हीही गाड्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आल्या आहेत. अशावेळी चला जाणून घेऊया फीचर्सच्या बाबतीत कोणती एसयूव्ही जास्त दमदार आहे.
advertisement
3/6
फीचर्सच्या बाबतीत कोण बेस्ट? : सिट्रोएन बेसाल्टमध्ये आराम आणि आवश्यक टेक्नॉलॉजीचा चांगला मिलाफ आहे. यात मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि आरामदायी सीट्स आहेत. त्याची बूट स्पेस देखील बरीच मोठी आहे, ज्यामुळे कुटुंबाच्या ट्रिप आणि लॉन्ग ड्राइव्ह करणे सोपे होते. ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि रिअर एसी व्हेंट्स सारख्या फीचर्समुळे ती एक प्रॅक्टिकल एसयूव्ही बनते.
advertisement
4/6
दुसरीकडे Kia Sonet फीचर्सच्या बाबतीत जास्त प्रीमियम फील देते. यामध्ये वेंटिलेटेड सीट्स, सनरुप, वायरलेस चार्जिंग, प्रीमियम साउंट सिस्टम आणि अनेक स्मार्ट फीचर्स मिळतात. रोजच्या वापरात हे फीचर्स Sonet ला जास्त बेस्ट बनवतात.
advertisement
5/6
इंजीन आणि ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स : Citroen Basalt मध्ये पेट्रोल इंजिनचे ऑप्शन मिळतात. जे स्मूद ड्राइव्ह आणि चांगल्या मायलेजसाठी ओळखले जातात. याचा सस्पेंशन खुप सॉफ्ट आहे. ज्यामुळे खराब रस्त्यांवरही प्रवास आरामदायक राहतो. तर Kia Sonet इंजिन ऑप्शनमध्ये पुढे आहे. यामध्ये पेट्रोल आणि डीझेल दोन्ही इंजिन मिळतात. सोबतच मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा ऑप्शनही उपलब्ध आहे. जास्त पॉवर आणि परफॉर्मेंस हवा असेल तर Sonet बेस्ट ठरते.
advertisement
6/6
सेफ्टी : सिट्रोएन बेसाल्टमध्ये सहा एअरबॅग्ज आणि इतर आवश्यक सेफ्टी फीचर्ससह येते. किआ सोनेट सुरक्षिततेच्या बाबतीत एक पाऊल पुढे आहे, ज्यामध्ये ADAS, 360-डिग्री कॅमेरा आणि ब्लाइंड-व्ह्यू मॉनिटर सारखी प्रगत फीचर्स आहेत. दोन्हीची किंमत सारखीच असली तरी, किआ सोनेट त्याच्या फीचर्समुळे आणि सुरक्षितता फीचर्स व्हॅल्यू फॉर मनी वाटते. तुम्ही एक यूनिक डिझाइन आणि आरामदायी ड्राइव्ह शोधत असाल, तर सिट्रोएन बेसाल्ट हा एक चांगला पर्याय आहे. तसंच, अधिक फीचर्स, इंजिन ऑप्शन्स आणि सेफ्टी फीचर्ससह, किआ सोनेट अधिक शक्तिशाली एसयूव्ही असल्याचे सिद्ध होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Citroen Basalt की Kia Sonet, फीचर्सच्या बाबतीत कोणती SUV बेस्ट? पाहा फरक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल