TRENDING:

2-3 दिवस घराबाहेर जाताय? हिवाळ्यात फ्रिजची ही सेटिंग अवश्य बदला, होईल फायदा

Last Updated:
हिवाळ्यात घराबाहेर जाताना फ्रिजची सेटिंग बदलणे गरजेचे आहे. यामुळे वीज बिलही कमी येते आणि कंप्रेसरही सुरक्षित राहते.
advertisement
1/6
2-3 दिवस घराबाहेर जाताय? हिवाळ्यात फ्रिजची ही सेटिंग अवश्य बदला, होईल फायदा
Refrigerator Winter Settings: हिवाळ्यांत तुम्ही काही दिवसांसाठी बाहेर गावी जात असाल तर तुम्ही घराला लॉक लावता, खिडक्या बंद आहेत का पाहतात, गॅसही चेक करता. पण तुम्ही घराबाहेर पडताना कधीच फ्रिजकडे लक्ष दिलं आहे का? 90 टक्के लोक याकडे लक्ष देत नाहीत. पण तुम्ही फ्रिजच्या एका सेटिंगकडे लक्ष दिल्यास तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. कारण फ्रिजची चुकीची सेंटिग ही वीज बिल वाढते यासोबतच मशीनवर अतिरिक्त दबाव टाकते. अशावळी छोट्याशा बदलाने तुम्ही वीज बिलही वाचू शकता. यासोबतच फ्रिजलाही सुरक्षित ठेवू शकता.
advertisement
2/6
तापमान सामान्य ठेवा : हिवाळ्यात, वातावरण आधीच थंड असते, त्यामुळे रेफ्रिजरेटर जास्त थंड ठेवण्याची गरज नाही. तुम्ही काही दिवसांसाठी बाहेर जात असाल तर रेफ्रिजरेटर सर्वात कमी सेटिंगवर सेट करा. अनेक रेफ्रिजरेटरमध्ये ही सेटिंग 1 ते 5 किंवा Cold ते Coldest अशा प्रमाणात असते. या प्रकरणात, तुम्ही ते 1 किंवा 2 वर सेट करू शकता. तापमान कमी ठेवल्याने कंप्रेसरवर दबाव पडत नाही आणि वीज वापर कमी होतो. यामुळे रेफ्रिजरेटर सुरळीतपणे चालतो आणि बिल कंट्रोलमध्ये राहते.
advertisement
3/6
हॉलिडे मोड देईल दिलासा : आजकालच्या लेटेस्ट फ्रिजमध्ये हॉलिडे मोड किंवा व्हॅकेशन मोडचा ऑप्शन दिला जातो. हा मोड ऑन केल्यास फ्रिज स्वतःचा असं ताबमान कायम ठेवतो. ज्यामुळे दुर्गंदी, ओलाव्याची समस्या येत नाही. तुमच्या फ्रिजमध्ये ही सुविधा उपलब्ध असेल तर बाहेर जाण्यापूर्वी ती अवश्य अॅक्टिव्हेट करा. हा मोड विशेषतः अशा लोकांसाठी तयार करण्यात आला आहे, जे लोक दीर्घकाळासाठी घराबाहेर राहतात. यामुळे वीज बिलाचीही बचत होते आणि फ्रिजही सुरक्षित राहतो.
advertisement
4/6
डिफ्रॉस्टिंगमुळे मशीनचे आयुष्य वाढेल : तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये डायरेक्ट कूल टेक्नॉलॉजी असेल आणि मागे काळी जाळी असेल, तर सुट्टीवर जाण्यापूर्वी ते डिफ्रॉस्ट करणे महत्वाचे आहे. मॅन्युअल डिफ्रॉस्टिंगमुळे फ्रीजरमधील अतिरिक्त बर्फ काढून टाकला जातो. जास्त बर्फ जमा झाल्यामुळे कंप्रेसरवरील भार वाढतो, परिणामी वीज वापर जास्त होतो. डिफ्रॉस्टिंगमुळे रेफ्रिजरेटर सुरळीत चालण्यास मदत होते आणि त्याचे आयुष्य वाढते.
advertisement
5/6
रेफ्रिजरेटर रिकामा ठेवणे महागात पडू शकते : बरेच लोक बाहेर जाताना त्यांचे रेफ्रिजरेटर रिकामे करतात, परंतु हा योग्य मार्ग नाही. तांत्रिकदृष्ट्या, पूर्ण भरलेला रेफ्रिजरेटर थंडी चांगल्या प्रकारे टिकवून ठेवतो. तुम्ही अन्न आणि पेये काढून टाकत असाल तर रेफ्रिजरेटरमध्ये काही पाण्याच्या बाटल्या सोडा. या बाटल्या थर्मल मास म्हणून काम करतात आणि आत स्थिर तापमान राखतात. यामुळे कंप्रेसर वारंवार चालू राहण्यापासून वाचतो, ज्यामुळे वीज वाचते.
advertisement
6/6
6 इंच अंतर खुप महत्त्वाचे : फ्रिज नेहमी मागच्या बाजूने गरम हवा काढतो. मग वातावरण कसंही असो. याच कारणामुळे घराबाहेर जाण्यापूर्वी फ्रिज आणि भिंतीमध्ये किमान 6 इंच अंतर ठेवावं. यामुळे हीट सहज बाहेर पडते आणि कंप्रेसरवर दबाव पडत नाही. शक्य असेल तर स्मार्ट प्लगचा वापर करा. ज्यामुळे तुम्ही बाहेर राहूनही फ्रिजला काही वेळासाठी ऑन किंवा ऑफ करु शकाल. यामुळे फ्रिजला ब्रेक मिळेल आणि बीलाचा खर्चही काही प्रमाणात कमी होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
2-3 दिवस घराबाहेर जाताय? हिवाळ्यात फ्रिजची ही सेटिंग अवश्य बदला, होईल फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल