TRENDING:

'लग्न नको फक्त बेडवर पुरूष...' अभिनेत्री तब्बूचं शॉकिंग स्टेटमेन्ट? इंटरनेटवर गदारोळ

Last Updated:
Tabu Shocking Statement on Marriage : अभिनेत्री तब्बूचं एक शॉकिंग स्टेटमेन्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं काय म्हणालीये तब्बू? त्यात किती तथ्य आहे?
advertisement
1/9
'लग्न नको फक्त बेडवर पुरूष...' अभिनेत्री तब्बूचं शॉकिंग स्टेटमेन्ट?
बॉलिवूडची टॅलेंटेड अभिनेत्री तब्बू. वयाची पन्नाशी उलटली तरी लग्न न करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक तब्बू आहे. तब्बू आज 54 वर्षांची आहे. ती आजही अविवाहीत आहे. तब्बू लग्न कधी करणार असा प्रश्न अनेक वर्ष तिच्या चाहत्यांना पडला आहे.
advertisement
2/9
अनेकदा तिला लग्नाविषयी प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान तब्बूच्या नावाने एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यात तिने लग्नाविषयी शॉकिंग स्टेटमेन्ट केलं आहे.
advertisement
3/9
टेलिचक्करने एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये तब्बूने म्हटलंय, "मला सध्या लग्न करायचं नाही. मला फक्त झोपण्यासाठी एक पुरुष हवा आहे. मी माझं सिंगल आयुष्य एन्जॉय करत आहे."
advertisement
4/9
अभिनेत्री तब्बू असं वक्तव्य करू शकते यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये. हे वक्तव्य खरंच तब्बूने केलं आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
advertisement
5/9
अशातच आणखी एक पोस्ट समोर आली आहे ज्यात हे स्टेटमेन्ट तब्बूचं नसल्याचं सांगण्यात आलंय. ही चुकीची माहिती असल्याचं तब्बूच्या टीमने सांगितलं आहे. त्याचबरोबर तब्बू असं बोलल्याचा कोणताही पुरावा नाहीये. तिचा कोणताही व्हिडीओ किंवा पोस्ट नाहीये. त्याचप्रमाणे तब्बूने देखील यावर अद्याप कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.
advertisement
6/9
याआधी 2025 मध्येही तब्बूने असं स्टेटमेन्ट केल्याची माहिती समोर आली होती तेव्हा तिच्या टीमकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. ज्यात त्यांनी म्हटलं होतं, "अनेक वेबसाइट्स आणि सोशल मीडिया हँडल्सनी तब्बूच्या नावाने काही अपमानास्पद विधानं चुकीच्या पद्धतीने सादर केली आहेत. आम्ही स्पष्ट करू इच्छितो की तब्बूंनी अशी कोणतीही विधानं कधीही केलेली नाहीत आणि प्रेक्षकांची दिशाभूल करणं हे नैतिकतेचं गंभीर उल्लंघन आहे. आम्ही मागणी करतो की या वेबसाइट्सनी बनावट विधानं तात्काळ हटवावीत आणि आपल्या कृत्यांसाठी औपचारिक माफी मागावी"
advertisement
7/9
अभिनेत्री तब्बूचं नाव आजपर्यंत अनेक अभिनेत्यांबरोबर जोडलं गेलं आहे. अभिनेते नागार्जून यांच्याबरोबर तब्बूचं अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. पण त्यांची कधीच या बातम्यांना दुजोरा दिला नाही.
advertisement
8/9
इतकंच नाही तर तब्बूचं नाव अभिनेता अजय देवगणबरोबरही जोडलं गेलं होतं. पण दोघेही एकमेकांचे बेस्ट फ्रेंड असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र कामही केलं आहे.
advertisement
9/9
तब्बू आगामी 'दृश्यम 3' या सिनेमात दिसणार आहे. अभिनेता अजय देवगण तिच्याबरोबर या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. आधीच्या दोन्ही पार्टमध्ये अजय आणि तब्बूच्या जोडीने थिएटर गाजवलं आहे. आत तिसऱ्या पार्टकडूनही प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'लग्न नको फक्त बेडवर पुरूष...' अभिनेत्री तब्बूचं शॉकिंग स्टेटमेन्ट? इंटरनेटवर गदारोळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल