माही विजची नवी सुरुवात, जय भानुशालीसोबतच्या घटस्फोटानंतर 18 दिवसांतच घेतलं नवीन घर PHOTOS
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Mahhi Vij New Home : जय भानुशालीसोबतच्या घटस्फोटानंतर 18 दिवसांतच माही विजने नवीन आलिशान घर खरेदी केलं आहे. माहीच्या नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
1/7

माही वीज आणि जय भानुशाली यांनी 4 जानेवारी 2026 रोजी घटस्फोटाची घोषणा केली होती. अनेक दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची बातमी त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली. त्यांच्या घटस्फोटाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
advertisement
2/7
माही विजने आता जय भानुशालीसोबतच्या घटस्फोटानंतर 18 दिवसांतच नवीन सुरुवात केली आहे. देव आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने तिने ही नवी सुरुवात केली आहे. घटस्फोटानंतर तिने आता हक्काचं नवीन आलिशान घर घेतलं आहे.
advertisement
3/7
माही विजने नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये #NewBeginnings असं लिहिलं आहे.
advertisement
4/7
माही विजला चाहते नव्या घरासाठी आणि नव्या आयुष्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत.
advertisement
5/7
माही विजने गृहप्रवेशादरम्यान नवीन घरात एका छोट्या पूजेचं आयोजन केलं होतं. यावेळी तिचे आई-वडीलदेखील उपस्थित होते.
advertisement
6/7
माहीने नुकतंच घटस्फोटाबाबत भाष्य केलं होतं. माही म्हणालेली,"मला वाटतं की हे मुलांसाठीही एक अतिशय चांगलं उदाहरण आहे की जर नात्यात काही गडबड झाली, तर वेगळे होण्याची वेळ आली तरी नात्याला नकारात्मकतेकडे नेऊ नये. एकमेकांना कोर्टात ओढू नये, वाईट वर्तन करू नये आणि मुलांनाही यात ओढू नये. मला वाटतं की माझ्या मुलांना माझ्यावर आणि जयवर अभिमान कायम राहील की जरी आई-वडील लग्न टिकवू इच्छित नव्हते, तरीही त्यांनी हे सगळं शांतपणे आणि अधिक चांगल्या पद्धतीने हाताळलं.”
advertisement
7/7
पोटगीच्या अफवांवर बोलताना माही म्हणाली,"सध्या मी सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पाहतेय. अपूर्ण माहितीच्या आधारावर मत बनवू नका. मी अशा गोष्टी वाचतेय की माहीने पोटगी म्हणून 5 कोटी रुपये घेतले. लोक फक्त लाईक्स आणि कमेंट्ससाठी जुने व्हिडिओ काढत आहेत. हे खूप दुःखद आहे. कारण आमचे आई-वडील आणि मुलेही इन्स्टाग्राम पाहतात.”
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
माही विजची नवी सुरुवात, जय भानुशालीसोबतच्या घटस्फोटानंतर 18 दिवसांतच घेतलं नवीन घर PHOTOS