नागपूरमध्ये अग्नितांडव, शोरूमच्या काचा फोडून मर्सिडीज आणि BYD च्या आलिशान गाड्या काढल्या बाहेर, PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
एमआयडीसी मधील 'मयूर इंडस्ट्रीज' या कपूर तयार करणाऱ्या कारखान्याला आग लागली होती. कारखान्याच्या समोरील भागात मर्सिडीज आणि बीवायडी BYD या महागड्या गाड्यांचं शोरूम (उदय तिमांडे, प्रतिनिधी)
advertisement
1/5

नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. नागपूरच्या हिंगणा एमआयडीसीमधील कपूर कारखान्याला आज भीषण आग लागली. या कारखान्याच्या समोरच मर्सिडिज आणि BYD गाड्याचं शोरूम होतं. आग लागल्यानंतर अक्षरश: शोरूमच्या काचा फोडून गाड्या बाहेर काढल्या होत्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
advertisement
2/5
एमआयडीसी मधील 'मयूर इंडस्ट्रीज' या कपूर तयार करणाऱ्या कारखान्याला दुपारी साडे तीनच्या सुमारास ही आग लागली होती. कारखान्याच्या समोरील भागात मर्सिडीज आणि बीवायडी BYD या महागड्या गाड्यांचं शोरूम आहे.
advertisement
3/5
कपूर कारखान्याला आग लागल्यानंतर एकच गोंधळ उडाला. आगीने रौद्ररुप धारण केल्यानंतर मर्सिडिज आणि बीवायडी शोरूमध्ये धावपळ उडाली. आग लागल्याबरोबर शोरूम मधून गाड्या शो रूमच्या काचा फोडून बाहेर काढण्यात आल्या.
advertisement
4/5
आगीची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन विभाग आणि मनपाच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र कापूर हा ज्वलनशील पदार्थ असल्याने पाण्यासह फोम चा देखील वापर अग्निशमन दलाला करावा लागला.
advertisement
5/5
आज सुट्टीचा दिवस असल्याने कारखाना बंद होता, त्यामुळे सुदैवाने जीवहानी झाली नाही. आगीमुळे कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून आगीचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
नागपूरमध्ये अग्नितांडव, शोरूमच्या काचा फोडून मर्सिडीज आणि BYD च्या आलिशान गाड्या काढल्या बाहेर, PHOTOS