TRENDING:

Car Driving : हँड ब्रेकचा योग्य वापर अजूनही अनेकांना माहित नाही, अनेक गाडीमालक करतात अशा चूका

Last Updated:
हँड ब्रेक वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, त्या जाणून घेऊया.
advertisement
1/9
हँड ब्रेकचा योग्य वापर अजूनही अनेकांना माहित नाही, अनेक गाडीमालक करतात अशा चूका
प्रत्येक कारमध्ये हँडब्रेक असतोच, गाडी चालवताना किंवा पार्क करताना हँड ब्रेकचा वापर योग्य पद्धतीनं करणं खूप महत्त्वाचं असतं. पण बऱ्याच वेळा लोकांना याच्या वापराबद्दल योग्य माहिती नसते ज्यामुळे तो याकडे दुर्लक्ष करतो. चला तर मग, हँड ब्रेक वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, त्या जाणून घेऊया.
advertisement
2/9
1. हँड ब्रेक पूर्णपणे लावाकधी कधी आपण गडबडीत फक्त अर्धा ब्रेक खेचतो किंवा नीट लावतच नाही. अशा वेळी गाडी स्थिर राहत नाही. त्यामुळे हँड ब्रेक लावताना नेहमी खात्री करा की तो पूर्णपणे लावला आहे.
advertisement
3/9
2. उतरत्या रस्त्यावर पार्क करताना कसा कराल हँड ब्रेकचा वापर?चाकांची दिशा योग्य ठेवा: गाडी जर चढावर किंवा उतारावर पार्क करत असाल, तर चाक वळून ठेवा. यामुळे गाडी घसरली तरी ती लगेच अडवली जाऊ शकते.
advertisement
4/9
गियरमध्ये ठेवा:मॅन्युअल गाडी असल्यास, पहिल्या गियरमध्ये किंवा रिव्हर्स गियरमध्ये गाडी पार्क करा. यामुळे गाडी अनवधानानं पुढे-पाठी हलणार नाही.
advertisement
5/9
3. हँड ब्रेकची वेळोवेळी तपासणी कराहँड ब्रेक व्यवस्थित चालावा यासाठी त्याची वेळोवेळी तपासणी आणि गरजेनुसार दुरुस्ती गरजेची आहे.हँड ब्रेक जाम झाला, तर संपूर्ण ब्रेकिंग सिस्टमवर परिणाम होतो. त्यामुळे असा काही प्रकार झाल्यास तो त्वरित दुरुस्त करून घ्या.
advertisement
6/9
4. गाडी दीर्घकाळ पार्क करत असाल तर...गाडी जास्त वेळ पार्क करत असाल, तर हँड ब्रेक लावलेला ठेवा.थंड हवामानात हँड ब्रेक जाम होण्याची शक्यता असते. अशा वेळी व्हील चॉक्सचा (Wheel Chocks) वापर करा किंवा ब्रेक शूज योग्य प्रकारे अ‍ॅडजस्ट करून घ्या.
advertisement
7/9
5. आपत्कालीन परिस्थितीत हँड ब्रेकचा वापरजर कधी फुट ब्रेक फेल झाला, तर हँड ब्रेकचं वापर करता येतं. पण लक्षात ठेवा – तो हळूहळू खेचा. अचानक खेचला, तर गाडी थेट थांबू शकते आणि टायर्स लॉक होऊ शकतात.
advertisement
8/9
6. हँड ब्रेक सुटलेला आहे ना, हे तपासाड्रायव्हिंग सुरू करण्यापूर्वी हँड ब्रेक काढलेला आहे का हे नक्की बघा. अनेकदा लोक ते विसरतात आणि त्यामुळे गाडीची परफॉर्मन्स कमी होते आणि ब्रेकिंग सिस्टमलाही नुकसान होऊ शकतं.
advertisement
9/9
थोडक्यात काय?हँड ब्रेकचा योग्य वापर म्हणजे केवळ एक सवय नाही, तर तुमच्या आणि इतरांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे कोणतीही घाईगडबड न करता, हँड ब्रेक योग्य रितीनं लावा, वापरा आणि वेळोवेळी तपासा
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Car Driving : हँड ब्रेकचा योग्य वापर अजूनही अनेकांना माहित नाही, अनेक गाडीमालक करतात अशा चूका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल