किती दिवस लेकराला रिमोटच्या गाड्या देणार? Hero ने आणली खास Bike, किंमतही कमी
- Published by:Sachin S
Last Updated:
हिरोने ईलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी vida च्या मदतीने भारतात आता dirt e k3 ही एक ईलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे.
advertisement
1/8

भारतातील सर्वात मोठी बाईक उत्पादक कंपनीपैकी एक असलेल्या हिरो मोटोकॉर्पने आता ईलेक्ट्रिक सेगमेंटमध्येही एकापेक्षा एक बाईक आणि स्कुटर लाँच करत आहे. हिरोने ईलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी vida च्या मदतीने भारतात आता dirt e k3 ही एक ईलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. ही बाईक ४ ते १० वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी आहे. सुरुवातीला पहिल्या ३०० ग्राहकांसाठी या बाईकची किंमत फक्त ६९,९९० (एक्स-शोरूम) पासून सुरू होतेय.
advertisement
2/8
हिरो मोटर्सच्या vida ने पहिल्यांदा ही बाइक EICMA २०२५ मध्ये लाँच केली. vida dirt e k3 मध्ये अॅडजस्टेबल चेसिस आहे, ज्यामुळे व्हीलबेस, हँडलबारची उंची आणि राइडची उंची कमी जास्त करू शकता. यामध्ये ३ स्टेज सेटिंग दिले आहे.
advertisement
3/8
ज्याामुळे मुलाची उंची कमी असेल तर लो लेव्हलवर बाईक वापरू शकतो. उंची वाढली किंवा मोठा मुलगा असेल तर बाइकची सेटिंगमध्ये चेंज करून हाईट वाढवू शकता.
advertisement
4/8
या बाइकच्या सीटची उंची लहान सेटिंगमध्ये ४५४ मिमी, मध्यम सेटिंगमध्ये ५४४ मिमी आणि मोठ्या सेटिंगमध्ये ६३१ मिमी आहे. विशेष म्हणजे, vida dirt e k3 बाइकचं वजन फक्त २२ किलोग्रॅम इतकंच आहे.
advertisement
5/8
vida dirt e k3 च्या अनेक चांगले असे फिचर्स दिले आहे. vida dirt e k3 मध्ये सायकल चालवताना चालण्यासाठी काढता येण्याजोगे फूटपेग, अपघात झाल्यास शॉक कमी करण्यासाठी हँडलबारवर चेस्ट पॅड, मॅग्नेटिक किल स्विच आणि मागे मोटर कव्हर दिलं आहे.
advertisement
6/8
vida dirt e k3 मध्ये फक्त डिफॉल्टनुसार मागील ब्रेक येतो, परंतु फ्रंट ब्रेक, मोठी चाकं, मागील सस्पेंशन, मोठे फ्रंट सस्पेंशन आणि रोड-स्पेक टायर्स सारखी अॅक्सेसरीज खरेदी करता येईल.
advertisement
7/8
vida dirt e k3 मध्ये 500W ची मोटर आणि 360Wh काढता येणारी लिथियम-आयन बॅटरी दिली आहे. बाईक 500W मोटर आणि 360Wh काढता येणाऱ्या बॅटरीसह येते. vida dirt e k3 मध्ये ३ रायडिंग मोड आहेत. लो, मीडियम आणि हाय स्पीड असे पर्याय दिले आहे.
advertisement
8/8
एवढंच नाहीतर vida dirt e k3 ही मोबाईलमध्ये अॅपने कनेक्ट करता येते. ज्यामुळे पालक सुद्धा बाइकची स्पीड मर्यादा सेट करू शकते. मुलाने किती किमी बाइक चालवली याची आकडेवारीही ट्रॅक करू शकतो. विशेष म्हणजे, vida dirt e k3 ला आंतरराष्ट्रीय स्तरावर बेस्ट असा डिझाइन पुरस्कार मिळाला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
किती दिवस लेकराला रिमोटच्या गाड्या देणार? Hero ने आणली खास Bike, किंमतही कमी